

Uddhav Thackeray: शिवसेनाचा ६० वा वर्धापन दिन आज असून यांपैकी ठाकरेंचा मेळावा षण्मुखानंद सभागृहात पार पडला. यावेळी उद्धव ठाकरेंनी आपल्या फुटलेल्या खासदारांवर भाष्य केलं. त्याचबरोबर या फोडाफोडीच्या राजकारणाला खतपाणी घालणाऱ्या भाजपला उद्धव ठाकरेंनी खडा सवाल विचारला आहे. आता शिवसेना निवडणूकच लढवणार नाही, अशा शब्दांत त्यांनी आपली खदखद व्यक्त केली.
राज्यात पुन्हा एकदा शिवसेनेच्या फुटलेल्या खासदारांवर भाष्य करताना आणि या फुटीला पाठिंबा देणाऱ्या भाजपवर संताप व्यक्त केला. यावेळी ठाकरे म्हणाले, चला एक असा विचार करुन चालतो की यापुढे शिवसेना निवडणूकच लढवणार नाही तुम्ही काय करणार आहात बोला? काय करतील? तुमच्यापैकी किती जण राहतील माझ्यासोबत? बघा एकही तिकीट मिळणार नाही. यावेळी उत्स्फुर्तपणे समोरुन प्रतिसाद आला. कारण का तर मर मर मेहनत तुम्ही करायची, निवडून आपण आणायचं आणि यांना खोक्यावर खोके. शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव नाही, पण आमदार-खासदाराचा हमीभाव ठरलेला आहे.
मला एका गोष्टीचं वैषम्य वाटतंय की, अरे मेहनत तुम्ही केली आहे, मत तुम्ही दिलं आहे. मग जाब विचारण्याचा अधिकार तुम्ही का सोडत आहात. तुम्ही जाब का विचारत नाही? हिंमत कशी होते यांची? जाब विचारण्याचा अधिकार तुमचा आहे पण तुम्ही तो विचारत नाही आहात. विचारा जाब त्यांना..अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी यावेळी मतदारांना आवाहन केलं.
तुम्ही महाराष्ट्राचा विश्वास घात करता त्यावेळी महाराष्ट्रानं त्यांचा अश्वमेध अडवला होता. त्यावेळीही काँग्रेस आपल्यासोबत होतीच ना? काँग्रेसच्या नेत्यांच्या सभा तुम्हाला हव्या होत्या ना? मग आज तुम्हाला एकदम वाटायला लागलं की शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन होणार आहे. शिवसेना विलीन व्हायला जन्माला आलेली नाही तर मराठी माणसाच्या आणि हिंदुत्वाच्या न्याय हक्कासाठी जन्माला आली आहे.
काँग्रेसचा विषय तुम्ही काढलाच आहे तर आपलं अर्ध्याहून अधिक आयुष्य हे काँग्रेससोबत टोकाचं वैर घेतलं होतं. हे वैर आणि टीका कोणासाठी तर भाजप आपल्यासोबत होती म्हणून. अनेकदा शिवसेनाप्रमुखांनी भाजपचे वार आपल्या अंगावर घेतले आहेत. बाबरी पाडली त्यावेळी बाळासाहेब ठाकरेंनी आपल्यावर आरोप घेतले होते, कोणासाठी घेतले होते? तुम्ही विसरलेत का? असे काही तिखट सवाल यावेळी उद्धव ठाकरेंनी केले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.