Shivsena News : खासदार फुटले तरी ठाकरे संपत नसतात; नेते तयार करणारी फॅक्टरी; मेळाव्याप्रसंगी शिवसैनिकांच्या संतप्त भावना

Shiv Sena anniversary News : मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या शिवसेनेच्या 60 व्या वर्धपनादिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्याला मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या शिवसेनेच्या 60 व्या वर्धपनादिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्याला मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी या शिवसैनिकांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील सहा खासदार फुटणार असल्याचं स्पष्ट झाल्याने शिवसैनिकांनी देखील तीव्र शब्दात भावना व्यक्त केल्या. आम्ही राजीनामे मागतोय, गद्दारांना राजीनामा मागतोय, शिवसैनिक पेटून उठलाय, अशा संतप्त प्रतिक्रिया सभेला उपस्थित शिवसैनिकांनी व्यक्त केल्या.

शिवसेनेचा (Shivsena) वर्धापन दिन सोहळा तोंडावर असतानाच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील सहा खासदार फुटणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ठाकरे सेनेचे खासदार संजय जाधव, संजय दिना पाटील, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, भाऊसाहेब वाकचौरे आणि ओमराजे निंबाळकर यांचा समावेश आहे. या मेळाव्याला जमलेल्या शिवसैनिकांनी पक्षातील खासदारांच्या फुटीवर तीव्र भावना व्यक्त केल्या.

Uddhav Thackeray
Shivsena MP News: 'आमच्या एका खासदारासाठी 50 कोटींची डील, 4 कोटी अ‍ॅडव्हान्स, दर महिन्याला 1 कोटी...'; बड्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

शिवसेनेच्या स्थापनेला 60 वर्ष झाली, 50-60 लोक गेल्याने काही फरक पडत नाही. उद्धव ठाकरे डोंगरासारखे उभे आहेत. शिवसेनेवर संकटं आली तरी घाबरत नाही. शिवसैनिकांच्या मनात चीड झालीय ती येणाऱ्या काळात दिसेल. ज्याची लायकी नव्हती त्याला खासदार केले, काँग्रेसमधून आलेला, घरात बसलेल्या माणसाला खासदार केले, मुलगी नगरसेवक झाली, अशा शब्दात शिवसैनिकांनी तीव्र संताप व्यक्त केला.

Uddhav Thackeray
Shiv Sena split : खासदार फुटताच ‘मातोश्री’वर खलबतं; उद्धव ठाकरे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, सुत्र फिरताच बंडखोरांची धडधड वाढली!

उद्धव ठाकरेंचे (Uddhav Thackeray) हात बळकट करण्यासाठी आणि आधार देण्यासाठी आम्ही याठिकाणी आलो आहे. पन्नास खोके घेऊन एवढी मोठी गद्दारी केलीय त्यांना किंमत मोजावी लागणार आहे. 2029 ला हे खासदार म्हणून साधे ग्रामपंचायत निवडणूक लढवण्याच्या लायकीचे नसणार, शिवसैनिक तालुक्यात घरोघरी जाऊन यांचा हिशोब चुकता करणार आहे. ओमराजे निंबाळकरांचा सांगलीहून जाऊन त्यांचा प्रचार केला, अहोरात्र झटलो त्याचा हिशोब चुकता करणार आहे, असे सांगलीहून आलेल्या शिवसेनेच्या तालुकाप्रमुखाने स्पष्ट केले आहे.

Uddhav Thackeray
Shivsena MP Split: उद्धव ठाकरेंच्या बंडखोर 6 खासदारांचा वेगळा गट,'कॅप्टन'ही ठरला? पोलिस पुरवणार थेट 'वाय प्लस' सुरक्षा...

दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून गुरुवारी संसदीय पक्षाची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून सर्व खासदारांना व्हीपही जारी करण्यात आला होता. तसेच या बैठकीकडे खासदारांच्या एकनिष्ठतेची 'लिटमस टेस्ट' म्हणून पाहिले जात होते. या बैठकीला अनिल देसाई, अरविंद सावंत व राजाभाऊ वाजे हे केवळ तीन खासदार उपस्थित राहिले. तर ऑपरेशन टायगरमध्ये शिंदेसोबाबत जाणारे सहा खासदार गैरहजर राहिले. त्यामुळे फूट निश्चित मानली जात आहे.

Uddhav Thackeray
Shivsena MP Split: उद्धव ठाकरेंच्या बंडखोर 6 खासदारांचा वेगळा गट,'कॅप्टन'ही ठरला? पोलिस पुरवणार थेट 'वाय प्लस' सुरक्षा...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com