Mumbai News : शिवाजी पार्कवरील दसरा मेळावा ही शिवसेनेची वर्षानुवर्षे ओळख राहिली आहे. मात्र, शिवसेनेतील बंडाळीनंतर शिंदे गट आणि ठाकरे गटाकडून दोन वेगवेगळे मेळावे घेण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे मागील वर्षी दोन्ही गटात दसरा मेळाव्यावरुन चांगलाच वाद उफाळला होता. पण यंदा ठाकरे गटाचा शिवतीर्थवरील दसरा मेळाव्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यानंतर शिंदे गटाकडून दसरा मेळाव्यासाठी जागेचा शोधाशोध सुरू होता. अखेर शिंदे गटाचा दसरा मेळावा मुंबईतील आझाद मैदानावर होणार आहे.
दसरा मेळाव्यासाठीच्या मैदानावरून चालेल्या वादातून अखेर शिंदे गटाने माघार घेतली होती. त्यामुळे शिवसेनेच्या उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाला दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. यानंतर शिंदे गटाकडून दसरा मेळाव्यासाठी जागेची शोधाशोध सुरु केली. पण आता शिंदे गटाचा यंदाचा दसरा मेळावा हा आझाद मैदानात दसरा मेळावा घेण्याची शक्यता आहे. शिंदे गटाच्या नेत्यांनी तसे संकेत दिले होते.
पण आता शिंदे गटाचा दसरा मेळावा आझाद मैदानावर असल्याचे निश्चित झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसरा हा हिंदुंचा सण आहे.या सणात कुठेही वाद होता कामा नये,विघ्न येऊ नये.हिंदुंचा सण आनंदात साजरा झाला पाहिजे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांचे म्हणणे आहे.
याचमुळे शिंदे यांनी समजूतदारपणा दाखवत आझाद किंवा क्रॉस मैदानात दसरा मेळाव्याची तयारी करण्याचे आदेश दिल्याची माहिती शिंदे गटाचे नेते सदा सरवणकर यांनी दिली होती. यानंतर त्यांनी महापालिकेकडे शिवाजी पार्कसाठी केलेला अर्ज देखील मागे घेतला होता. त्यामुळे ठाकरे गटाचा शिवाजी पार्कमधील दसरा मेळावा (Dasara Melava) विनासायास पार पडण्याचा मार्ग मोकळा झाला होता. आता शिंदे गटाचा यंदाचा दसरा मेळावा आझाद मैदानावर होणार आहे.
गेल्या वर्षी मेळाव्यासाठी दोन्ही गटाने अर्ज केल्याने वाद झाला होता. हा वाद न्यायालयात गेला. न्यायालयात सुनावणी होऊन ठाकरे गटाला शिवाजी पार्क मिळाले होते. असाच वाद यंदाही होतो की काय अशी चर्चा होती, पण बीएमसीच्या परवानगीमुळे शिवाजी पार्कवर मेळावा घेण्यात ठाकरे गटाचा मार्ग मोकळा झाला आहे.बीएमसीने ठाकरे गटाला मेळावा घेण्यास परवानगी दिली आहे.
दसरा मेळाव्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे गट पुन्हा आमने-सामने आले होते. मात्र, आमदार सदा सरवणकर यांनी शिंदे गटाचा अर्ज मागे घेतला. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका महत्त्वाची ठरली आहे.
हिंदुत्वाचा विचार मांडण्यासाठी आम्हाला शिवाजी पार्क मैदान हवे होते. मात्र, आझाद मैदान किंवा क्रांती मैदानातून हा विचार मांडता येईल, अशी भूमिका मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतली, त्यामुळे आम्ही अर्ज मागे घेतला, असे आमदार सरवणकर यांनी म्हणाले होते.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.