Someshwar Sugar Factory: अजितदादांच्या निधनानंतर 'सोमेश्वर' कारखान्याची पहिलीच निवडणूक, शरद पवार बिनविरोध करणार? पार्थ पवारांच्या भेटीनं चर्चा

Baramati News: बारामतीतील सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीत पुन्हा एकदा पवार कुटुंब आमने सामने उभे ठाकण्याची शक्यता आहे. युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी शरद पवार गटाचं पॅनल आणि उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीचं पॅनल समोरासमोर असणार आहे.
Sharad Pawar Parth Pawar Supriya Sule.jpg
Sharad Pawar Parth Pawar Supriya Sule.jpgSarkarnama
Published on: 
Updated on: 

Mumbai News: एकीकडे गणपती विसर्जनाची धामधूम सुरू असतानाच दुसरीकडे राज्यात महत्त्वाच्या राजकीय घडामोडींना घडामोडींना वेग आला आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार पार्थ पवार आणि त्यांचे बंधू जय पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची त्यांच्या मुंबईतील‘सिल्वर ओक’ या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे.पार्थ पवार आणि जय पवार यांच्या या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

बारामतीतील सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीसाठी युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी शरद पवार गटाचं पॅनल तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी अजित पवार गटाचं पॅनल आमने-सामने आहे. तर दुसरीकडे भाजप आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना देखील ही निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे.

मात्र, अजित पवारांच्या निधनानंतर सोमेश्वर साखर कारखान्याची ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी घेतल्याची माहिती समोर येत आहे.

याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी (ता.25)शरद पवार यांच्या उपस्थिती सिल्व्हर ओक या त्यांच्या निवासस्थानी अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली आहे. या बैठकीला खासदार सुप्रिया सुळे,युगेंद्र पवार, पार्थ पवार आणि जय पवार हे उपस्थित होते.

Sharad Pawar Parth Pawar Supriya Sule.jpg
Eknath Shinde News: 'ड्युटी'वर असलेला पोलीस चक्कर येऊन कोसळला, उपमुख्यमंत्री शिंदेंनी दाखवलेल्या तत्परतेमुळे वाचले प्राण,नेमकं काय घडलं..?

राष्ट्रवादी खासदार पार्थ पवार यांनी शरद पवार यांची घेतलेल्या भेटीमागचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. तरी या दोन्ही नेत्यांच्या भेटीबाबत राजकीय तर्कवितर्कांना सुरुवात झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या भेटीत सोमेश्वर साखर कारखाना बिनविरोध करण्यासोबतच पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तसेच इतर जिल्हा बँकांच्या आगामी निवडणुकांबाबत चर्चा झाल्याचं बोललं जात आहे.

तसेच शरद पवार आणि पार्थ पवार यांच्यात राज्यातील पाच शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसंदर्भातही चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मात्र, पार्थ आणि जय पवार हे पुन्हा एकदा शरद पवारांच्या भेटीला पोहोचल्याने पवार कुटुंबातील राजकीय समीकरणांबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

Sharad Pawar Parth Pawar Supriya Sule.jpg
Mayor Election: राजस्थानमधील प्रतिष्ठेच्या 3 महापालिकांच्या महापौर निवडणुकीत भाजपचा ऐतिहासिक विजय, तर काँग्रेस अन् गेहलोतांना धक्का

बारामतीतील सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीत पुन्हा एकदा पवार कुटुंब आमने सामने उभे ठाकण्याची शक्यता आहे. युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी शरद पवार गटाचं पॅनल आणि उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीचं पॅनल समोरासमोर असणार आहे. मात्र ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी भूमिका शरद पवार यांची आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com