Rupali Chakankar On Kirit Somaiya : सोमय्यांच्या आक्षेपार्ह व्हिडिओ प्रकरणात राज्य महिला आयोगाची 'एन्ट्री' ; चाकणकरांनी दिले महत्वाचे निर्देश

Kirit Somaiya Viral Video Case : '' आतापर्यंत या प्रकरणी आयोगाकडे कोणतीही माहिती आलेली नाही...''
Rupali Chakankar, Kirit Somaiya
Rupali Chakankar, Kirit Somaiya Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Mumbai : भाजपाचे माजी खासदार व नेते किरीट सोमय्या यांनी आत्तापर्यंत अनेक बड्या राजकीय नेत्यांचे घोटाळे बाहेर काढले आहेत. त्यांनी आरोप केल्यानंतर अनेक नेत्यांपाठीमागे चौकशीचा ससेमिरा तर लागलाच शिवाय काहींवर अटकेपर्यंतची कारवाई झाली. एरवी विरोधकांची धाकधूक वाढविणारे सोमय्याच अडचणीत आले आहेत. सोमय्या यांचे आक्षेपार्ह अवस्थेतील व्हिडिओ चॅट समोर आले आहेत. यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. याचवेळी आता या प्रकरणाची राज्य महिला आयोगाने दखल घेतली आहे.

विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातही विरोधकांनी किरीट सोमय्या यांच्या कथित व्हिडिओ प्रकरणावरुन सत्ताधारी पक्षाला चांगलेच धारेवर धरले. आता या प्रकरणाची गंभीर दखल घेत राज्य महिला आयोगाने मुंबई पोलीस आयुक्तांना या संपूर्ण घटनेचा तपास करण्याचे निर्देश दिले आहेत.

Rupali Chakankar, Kirit Somaiya
Sanjay Raut On Kirit Somaiya: संजय राऊतांचा सोमय्यांवर निशाणा; म्हणाले, "आपल्या कर्माने मरणार त्याला...."

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर (Rupali Chakankar)यांनी भाजपा नेते किरीट सोमय्यांच्या आक्षेपार्ह व्हिडिओवर भाष्य करताना महत्वपूर्ण निर्देश दिले आहेत. चाकणकर म्हणाल्या, भाजपा नेते किरीट सोमय्या यांचा जो आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारमाध्यमांमधून प्रसिद्ध झाला तेव्हा महाराष्ट्रातील अनेक संस्थांनी राज्य महिला आयोगाकडे विचारणा केली.

राज्य महिला आयोगाने या घटनेची दखल घेऊन मुंबई पोलीस आयुक्तांना या संपूर्ण घटनेचा तपास करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच या प्रकरणी वस्तूस्थितीदर्शक अहवाल लवकरात लवकर आयोगाला सादर करण्याबाबतही सांगितलं आहे.

Rupali Chakankar, Kirit Somaiya
Pimpri Chinchwad NCP Politics : राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांत जुंपली, शरद पवार गटाने केली शहर पक्ष कार्यालय सोडण्याची मागणी

आतापर्यंत या प्रकरणी आयोगाकडे कोणतीही माहिती आलेली नाही. पोलिसांचा आम्हाला अहवाल येईल तेव्हा त्यावर आम्ही कारवाई करणार असल्याचे चाकणकर यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच पीडित महिला आपल्याकडे तक्रार घेऊन आली, तर आपण कारवाई करतोच. त्याहीपुढे जाऊन सामूहिक बलात्कार किंवा इतर गुन्ह्यांमध्ये आपण स्वतः दखल घेतो. त्यामुळे पीडित महिलांची तक्रार आली, तर त्याची नक्कीच दखल घेतली जाते असेही चाकणकर यावेळी म्हणाल्या.

आक्षेपार्ह व्हिडिओनंतर सोमय्यांची पहिली प्रतिक्रिया...

किरीट सोमय्या(Kirit Somaiya) यांनी व्हायरल आक्षेपार्ह व्हिडिओवर पहिली प्रतिकिया देतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पत्र लिहिलं आहे. त्यात सोमय्या म्हणतात, देवेंद्रजी, आज सायंकाळी एका मराठी वृत्तवाहिनीवर माझी एक व्हिडीओ क्लिप प्रदर्शित करण्यात आली. या निमित्ताने अनेक व्यक्तींनी माझ्यावर अनेक आरोप केले, आक्षेप घेतले आहेत. अशाप्रकारच्या अनेक व्हिडीओ क्लिप्स उपलब्ध आहेत, असेही सांगण्यात आले आहे.

मी अनेक महिलांवर अत्याचार केले, अनेक महिलांच्या तक्रारी आल्या आहेत आणि त्याच्या अनेक व्हिडीओ क्लिप आहेत, असेही दावे केले जात आहेत. तथापि माझ्याकडून कोणत्याही महिलेवर असा अत्याचार झालेला नाही, हे मी याठिकाणी स्पष्ट करतो. त्यामुळे अशा सर्व आरोपांची आपण चौकशी करावी अशी विनंती सोमय्यांनी फडणवीसांकडे केली.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.