Anna Hazare : अण्णा तुम्ही कुठे आहात? मी शोधतेय तुम्हांला; अंधारे असं का म्हणाल्या?

Sushma Andhare : भाजपाने ज्यांना ज्यांना जवळ केले, त्यांना संपवण्याचा प्रयत्न केला...
sushma andhare, anna hazare
sushma andhare, anna hazare sarkarnama

Anna Hazare : शिवसेनेच्या (उध्दव बाळासाहेब ठाकरे) नेत्या सुषमा अंधारे या भाजपसह शिंदेगटावर टीकेची एकही संधी सोडताना दिसत नाही. आता त्यांनी टीकेचा मोर्चा अण्णा हजारेंकडे वळवला आहे. आंदोलन करणारे अण्णा हजारे ( Anna Hazare) आता कोठे गेले आहेत? लवकर उठा अण्णा, तुम्ही आधुनिक काळातील गांधी आहात असे तुम्हांला म्हटले जाते. तुम्ही आता कोठे गेले आहात. मी तुम्हाला शोधत आहे, मला मदत करा असा टोला सुषमा अंधारे यांनी हजारेंना लगावला आहे.

sushma andhare, anna hazare
Chandrakant Patil : भाजप नेत्यांना नेमकं काय झालंय? आता चंद्रकातदादा म्हणाले,फुले, आंबेडकरांनी....

कल्याण पूर्वेतील कर्मवीर दादासाहेब गायकवाड क्रिडांगणावर शिवसेना उपनेत्या अंधारे यांची महाप्रबोधन यात्रा गुरुवारी पार पडली. यावेळी त्या बोलत होत्या. अंधारे म्हणाल्या, भाजप नेत्या चित्रा वाघ यांना जर संजय राठोड हे आता निर्दोष वाटत असतील तर त्यांनी पूजा राठोडची जाणीवपूर्वक बदनामी केली. वाघ यांनी तिची राजकीय शिडी केली असा आरोप देखील अंधारे यांनी केला. तसेच बीकेसीला शिंदे गटाचा दसरा मेळावा झाला. त्यात करोडो रुपयांचा चुराडा झाला तरी किरीट सोमय्या गप्प का? असा सवाल सुध्दा अंधारेंनी या सभेत उपस्थित केला.

sushma andhare, anna hazare
Vasant More News : वसंत मोरेंविषयी मनसेच्या नेत्याचे मोठे विधान : म्हणाले, ‘वसंत मोरे ताकदवान हे....’

भाजपाने ज्यांना ज्यांना जवळ केले त्यांना संपवण्याचा प्रयत्न केला. फडणवीस हेच राज्याचे मुख्यमंत्री आहेत असा टोला लगावत खुद्द मुख्यमंत्री शिंदे यांनीच हे कबुल केल्याचा व्हिडीओ त्यांनी सभेत दाखवला. माझे 40 भाऊ कॉपी करुन पास झाले आहेत. त्यांना कळत नाही सगळी मलिद्याची खाती भाजपकडे गेली आहे. माझ्या भावांकडे कपडे फाडण्याची खाती दिली आहेत असा खोचक टोला त्यांनी यावेळी शिंदे गटातील आमदारांना लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com