
Mumbai News : कर्नाटकमधील चित्रदुर्गजवळ महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस कन्नडिगांनी फोडली. तसेच चालकाला कर्नाटकात येताय तर कन्नडच बोलायचं असं म्हणत त्याच्या तोंडाला काळे फासले. यामुळे आता संतापाची लाट उसळली आहे. यानंतर परिवहनमंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी आता कठोर भूमिका घेतली आहे. त्यांनी आधी मी शिवसैनिक असून नंतर मंत्री आहे,असं म्हणत आम्ही काय हातात बांगड्या भरलेल्या नाहीत, अशा आक्रमक भाषेत कन्नडिगांचा समाचार घेतला होता.आता त्यानंतर आता सरनाईकांनी पुढचं आक्रमक पाऊल टाकतानाच महाराष्ट्रातून कर्नाटकला जाणाऱ्या बसच्या फेऱ्या रद्द केल्या आहेत.
राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनीही कन्नडिगांच्या या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला आहे. यानंतर त्यांनी चालक-वाहक यांच्यासह प्रवाशांच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्रातून कर्नाटकला जाणाऱ्या बसेसच्या फेऱ्याच रद्द केल्या आहेत. यावेळी त्यांनी आम्ही काय हातात बांगड्या भरलेल्या नाहीत. उद्या तुमच्याही बसेस आमच्याकडे येतात, असा इशारा त्यांनी केला आहे.
सरनाईक म्हणाले, महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद हा फार पूर्वीपासूनचा आहे. मी शिवसेनेचा मंत्री आहे. आमच्या पक्षाचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दोन महिने बेळगावमध्ये कारावास भोगला आहे. आम्ही काय हातात बांगड्या भरलेल्या आहेत काय हो. मंत्री वैगेरे नंतर आधी आम्ही शिवसैनिक आहोत. आमच्या लोकांना असा कोणी त्रास देणार असेल. सध्या काय गरज नसतानाही वाद निर्माण केला जात आहे, असेही परिवहन मंत्र्यांनी स्पष्ट केले.
एकीकडे महाराष्ट्र एकीकरण समितीने सांगलीतून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून आंदोलन सुरू केले आहे. तर दुसरीकडे आता कन्नडीगांचा उन्माद सुरू झाला आहे. कन्नडीगांनी महाराष्ट्राची आणि मराठी माणसाची छेड काढली आहे. कर्नाटकमधील चित्रदुर्गजवळ महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस चालकाच्या तोंडाला काळे फासत बसचीही तोडफोड करण्यात आली आहे. यामुळे आता सीमावर्ती भागात याचे तीव्र पडसाद उमटायला सुरूवात झाली असून कोल्हापूर शहरात याचा शिवसेना ठाकरे गटाने निषेध केला आहे.
प्रताप सरनाईक म्हणाले, हा वाद वाढू नये, यासाठी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणार आहेत. आमची एसटी बस कर्नाटकात गेल्यानंतर तेथील गावगुंडांनी स्वतःच्या प्रसिद्धीसाठी अडवून चालक आणि वाहकाला मारहाण करून त्यांच्या तोंडाला काळं फासलं. एसटी बसलाही काळं लावण्यात आलं होतं. हे काय बरोबर नाही. उद्या तुमच्याही बसेस आमच्याकडे येतात. आमच्या काही लोकांनी तसं केलं तर मग... प्रवाशांच्या जिवाची काळजी सर्वांना घ्यावी लागणार आहे. चालक-वाहकांना मारहाण करून तुम्हाला काय मिळणार आहे.
मंत्री सरनाईक म्हणाले, आमच्या परिवहन व्यवस्थापकांना त्या गाव गुंड्याच्या विरोधात तक्रार द्यायला लावली आहे. त्यांच्या विरोधात गुन्हाही दाखल झाला आहे. त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, यासाठी पोलिसांना सूचनाही दिलेल्या आहेत. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी याबाबत चर्चा करावी, अशी विनंती मी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना करणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.