Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंना राजकारणात येण्याची कुणी ऑफर दिली का? एक वाक्य अन् दोन शब्दांतच सांगितली 'अनटोल्ड स्टोरी'

Tukaram Mundhe Politics Statement : तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर राज्यभरात अन्न भेसळ करणारे तसेच नियमबाह्य पद्धतीने औषधांची विक्री करणाऱ्यांविरोधात धडक कारवाया सुरू केल्या आहेत. त्यांच्या कामगिरीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
Tukaram Mundhe
Tukaram MundheSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News, 08 Jul : अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची सध्या राज्यभरात जोरदार चर्चा आहे. त्यांनी या विभागाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर राज्यभरात अन्न भेसळ करणारे तसेच नियमबाह्य पद्धतीने औषधांची विक्री करणाऱ्यांविरोधात धडक कारवाया सुरू केल्या आहेत.

या कारवाईदरम्यान भेसळयुक्त दूध, पनीर आणि इतर खाद्यपदार्थांचे मोठे साठे जप्त करून नष्ट करण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांच्या कामगिरीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. धडाकेबाज आणि पारदर्शक कामकाजामुळे तुकाराम मुंढे राजकारणात प्रवेश करणार का, याबाबतही सातत्याने चर्चा होत असते. याच चर्चांवर त्यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत भाष्य केले.

'न्यूज 18 मराठी'ला दिलेल्या मुलाखतीत राजकारणात प्रवेश करण्याच्या प्रश्नासह त्यांनी विविध प्रश्नांवर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. मुलाखती दरम्यान त्यांना, "'नायक' चित्रपट पाहिला आहे का? त्या चित्रपटातील शिवाजीराव गायकवाड यांच्याप्रमाणे तुम्हाला एक दिवसासाठी अमर्याद अधिकार मिळाले, तर तुम्ही काय कराल?" असा प्रश्न विचारण्यात आला.

यावर उत्तर देताना मुंढे म्हणाले, "लोकशाही व्यवस्थेत कोणालाही अमर्याद अधिकार नसतात. सार्वजनिक सेवक म्हणून समाजाला सक्षम करणे, योग्य मार्गदर्शन करणे आणि विकासाच्या दिशेने पुढे नेणे हेच आपले कर्तव्य आहे. समाज जितका विकसित होईल, तितकी देशाची प्रगती, नागरिकांची उत्पादकता आणि आनंदही वाढेल. प्रत्येक क्षणी समाज एक पाऊल पुढे कसा जाईल, या दृष्टिकोनातून काम करणे गरजेचे आहे. हे सर्व करताना पूर्ण पारदर्शकता आणि उत्तरदायित्व असणे तितकेच महत्त्वाचे आहे."

Tukaram Mundhe
KDMC hospital case : "फडणवीसांनी गृहखात्याची पूजा घालावी..."; डॉक्टर-नर्सेस मारहाण प्रकरणात ठाकरेसेनेची एन्ट्री, आदित्य अन् राऊतांचा जोरदार हल्लाबोल

यानंतर, "अनेक जण तुम्हाला 'नायक' चित्रपटातील शिवाजीराव गायकवाड यांच्याशी तुलना करतात," असे सांगितल्यावर त्यांनी उत्तर दिले, "मी एक सार्वजनिक सेवक आहे. माझ्या अधिकारांच्या मर्यादा मला माहिती आहेत आणि त्याच चौकटीत राहून मी काम करण्याचा प्रयत्न करतो. लोकांच्या ज्या भावना आहेत त्या आम्हाला मान्य आहेत. त्या मी चांगल्या दृष्टिकोनातून घेतो आणि मला जास्तीत जास्त चांगलं कसं काम करता येईल या दृष्टीने त्याचा मी प्रयत्न करतो."

राजकारणात येण्याची इच्छा कधी झाली का, असा प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी स्पष्ट शब्दांत, "नाही. राजकारण माझा कप ऑफ टी नाही," असे उत्तर दिले. तसेच, "कोणत्याही राजकीय पक्षाने किंवा नेत्याने तुम्हाला राजकारणात येण्याची ऑफर दिली होती का?" असा प्रश्नही त्यांना विचारण्यात आला.

Tukaram Mundhe
Woman Doctor Assault Case : महिला डाॅक्टर मारहाण प्रकरणात मोठा ट्विस्ट, नगरसेवक रमेश म्हात्रेंचा धक्कादायक दावा, रुग्णाची आईही आली समोर!

त्यावर ते म्हणाले, "एवढ्यात जर मला कोणी बोलल जरी असेल तर ते आता काही रिव्हील करण्याचं काही कारण नाही. पब्लिक प्लॅटफॉर्मवरती हे बोलण्याचं कारण नाही. कारण ते वैयक्तिक लेव्हलला कोणी काही बोललं असेल. परंतु मला माहिती आहे मी सिव्हिल सर्वंट आहे. मी पब्लिक सर्वंट आहे.

माझ्या लिमिटेशन्स मला माहिती आहे. त्याच्यामुळे पॉलिटिक्स इज नॉट माय कप ऑफ टी, असं ते म्हणाले. पण तरीही कधी कोणी असा प्रयत्न केला का? ऑफर दिली का, तसं कोणी कधी बोललं का? असं विचारलं असता त्यांनी 'नो कमेंट्स' म्हणत त्यावर जास्तीचं बोलणं टाळलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com