Maharashtra Politics: मोठी राजकीय घडामोड! संजय राऊतांनी कट्टर विरोधक नेते नितेश राणेंना लिहिलं पत्र; कारणही आलं समोर

ShivsenaUBT vs BJP: उद्धव ठाकरेंचे फायरब्रँड नेते संजय राऊत यांनी आता नितेश राणेंना पत्र लिहिल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत खुद्द राऊतांनीच माध्यमांशी संवाद साधताना हा मुद्दा चर्चेत आणला आहे. त्यांनी राणेंना पत्र लिहिताना उद्धव ठाकरेंच्या अयोध्येतील राम मंदिरातील देणगी चोरीविरोधात पुकारलेल्या रामरक्षा आंदोलनाचा विषयही हायलाईट केला आहे.
Nitesh Rane, Sanjay Raut
Nitesh Rane, Sanjay Raut Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही. तसेच राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा मित्र आणि शत्रू नसतो. यात महायुती सरकारमधील मंत्री व भाजप नेते नितेश राणे हे सातत्यानं उद्धव ठाकरे, आणि त्यांच्या पक्षातील नेत्यांवर सडकून टीका करत असतात. तसेच खासदार संजय राऊतही भाजपसह एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिवसेनेतील नेत्यांवर टीका करण्याची एकही संधी सोडताना दिसून येत नाही. पण आश्चर्याचा धक्का म्हणजे खुद्द राऊतांनी मंत्री नितेश राणेंनाच पत्र लिहिलं आहे.

काही दिवसांपूर्वीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी भाजप मंत्री नितेश राणेंचं जाहीर कौतुक केलं होतं. या कौतुकानंतर राणे-राऊत संघर्ष थोड्या फार प्रमाणात कमी झाल्याचं पाहायला मिळालं होतं. अशातच पुन्हा एकदा राणे-राऊतांमधील अपडेट समोर आली आहे.

उद्धव ठाकरेंचे फायरब्रँड नेते संजय राऊत यांनी आता नितेश राणेंना पत्र लिहिल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत खुद्द राऊतांनीच माध्यमांशी संवाद साधताना हा मुद्दा चर्चेत आणला आहे. त्यांनी राणेंना पत्र लिहिताना उद्धव ठाकरेंच्या अयोध्येतील राम मंदिरातील देणगी चोरीविरोधात पुकारलेल्या रामरक्षा आंदोलनाचा विषयही हायलाईट केला आहे.

संजय राऊत यांनी नितेश राणे पत्र लिहिताना उद्धव ठाकरेंनी नुकत्याच घोषणा केलेल्या 'श्रीराम वाचवा' आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. तसेच काँग्रेसपासून भाजपापर्यंतच्या राजकीय प्रवासाचाही उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे या पत्राची राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

Nitesh Rane, Sanjay Raut
Maharashtra Assembly: विरोधकांच्या वादळी लक्षवेधीने सभागृह हादरले; कामकाज ठप्प! विधानसभेत पावसावरून तांडव! नेमकं काय घडलं?

काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीतील घोडेबाजारावरून संजय राऊत यांनी भाजपवर संताप व्यक्त केला होता. तसेच नितेश राणे यांनी राऊत यांना बरनॉल पार्सल पाठवत डिवचलं होतं. याबाबत राऊत यांना विचारण्यात आलं, तेव्हा राऊत यांनी नितेश यांच्यावर टीका करण्याऐवजी त्यांची मुक्तकंठानं स्तुती केली.

संजय राऊत यांनी नितेश राणेंनी यांनी बरनॉल पार्सल पाठवल्यानंतर राज्यातील उत्तम काम करणाऱ्या मंत्र्यांपैकी नितेश हे एक असल्याचं राऊत म्हणाले. तसेच मी काही त्यांना रिटर्न गिफ्ट पाठवणार नाही. त्यांनी दिलेल्या गिफ्टचा मी स्वीकार करेन. अनेक रुग्ण आहेत. त्यांना त्यांनी दिलेलं गिफ्ट पाठवेन. पण त्यांनी बरनॉल का ठेवलं? ते काय जखमी झाले होते का? त्यांना बरनॉल ठेवण्याची गरज का पडली?, असा खोचक टोलाही संजय राऊत यांनी लगावला होता.

Nitesh Rane, Sanjay Raut
EVM Machines: आणखी एका देशात EVM वर निवडणूक होणार : भारतासोबत केला ऐतिहासिक करार, निवडणूक आयोगाकडे मागितली मदत

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com