Vanchit Vs Congress : वंचितची उद्धव ठाकरेंशी मैत्री; पण काँग्रेसला डोकेदुखी...

Allotment of seat in Mahavikas Aghadi : महाविकास आघाडीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला, मात्र अजूनही शिक्कामोर्तब नाही.
Uddhav Thackeray, Prakash Ambedkar
Uddhav Thackeray, Prakash AmbedkarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील सगळेच पक्ष जय्यत तयारीला लागले आहेत. वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत सामावून घेण्यासाठी तयारी दाखवली आहे. मात्र, वंचितने अजूनही आपण सहभागी झालेलो नाही, असा दावा केला आहे.

काँग्रेसला डोकेदुखी ?

2019 च्या निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडीने चांगल्या टक्क्यांनी विजय मिळवला होता. प्रत्येक लोकसभा मतदारसंघात वंचितचे उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर होते. त्यामुळे वंचितने इतर पक्षांना तोडीसतोड टक्कर दिली होती. आता आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत होणार आहे.

Uddhav Thackeray, Prakash Ambedkar
Mahayuti News : मोठी बातमी ! 'महायुती'त आणखी एका पक्षाची एन्ट्री; भाजपला किती फायदा होणार ?

भाजप सोबत इतर पक्षांना हरवायचा दावा महाविकास आघाडीतील नेत्यांनी केला आहे. महाविकास आघाडीत सामील होण्यासाठी वंचितने अनेक वेळा आपली इच्छा व्यक्त केली. त्यांना आमच्यात सामील करून घेतलं असल्याचा दावादेखील महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांनी केला आहे. मात्र, आता हीच मैत्री काँग्रेसला डोकेदुखी होण्याची शक्यता आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महाविकास आघाडीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. मात्र, अजूनही शिक्कामोर्तब झालेला नाही. मविआमध्ये अजून 5 जागांसाठी लढत सुरू आहे आणि ज्या 5 जागांसाठी त्यांची लढत सुरू आहे, त्या जागांवर तिसऱ्या क्रमांकावर वंचित विजयी झालेला आहे. त्यामुळे कुठे ना कुठे तरी वंचितसाठी काँग्रेसला या जागांवर त्याग करावा लागेल.

एकच जागा लढवणार ?

वंचित बहुजन आघाडीने 2019 मध्ये लोकसभा निवडणुकांमध्ये चांगलीच मते मिळविली होती. मात्र, महाविकास आघाडीमध्ये आल्यावर त्यांना केवळ 1 किंवा 2 जागा देण्याचा निर्णय आघाडीतील पक्षांनी घेतला आहे. वंचित बहुजन आघाडीसाठी शिवसेना ठाकरे गटाच्या कोट्यातून अकोला लोकसभा मतदारसंघाची जागा सोडल्याची माहिती आहे.

त्यामुळे समसमान 12 - 12 चा फॉर्म्युला देणारी वंचित आघाडी एका जागेवर समाधानी राहणार का? हा मुद्दा आहे. महाविकास आघाडीच्या आतापर्यंत झालेल्या बैठकांमध्ये जवळपास 40 जागांवर कुठला पक्ष, कुठली जागा लढवणार, यावर निर्णय झाल्याचं सांगण्यात येतंय.

(Edited by Amol Sutar)

Uddhav Thackeray, Prakash Ambedkar
Sharad Pawar News : अजित पवारांच्या 'त्या' सहा आमदारांचा शरद पवारांनी आधीच बंदोबस्त केला?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com