नार्वेकर ठाकरे की शिंदे गटात; चर्चा झडत असताना नार्वेकर बालाजीच्या भक्तीत दंग

Shivsena : गुलाबराव पाटील यांनी केल्याने विधानामुळे अधिकच चर्चा रंगली...
Milind Narvekar Latest News
Milind Narvekar Latest NewsSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : दसरा मेळाव्याच्या निमित्ताने माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शक्तीप्रदर्शनाची जय्यत तयारी केली असतानाच काही नेते ठाकरेंकडून सीमोल्लंघन करत शिंदेंकडे जाणार असल्याची जोरदार चर्चा आहे.

आज त्यात उध्दव ठाकरे यांचे उजवे हात आणि त्यांच्या गटाचे सचिव मिलिंद नार्बेकर हे स्वत:च शिंदे गटात जाणार असल्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी आज जाहीर केले. (Milind Narvekar Latest News)

Milind Narvekar Latest News
शिवसेनेचा भाजपला मोठा धक्का; भाजप युवा मोर्चाचा नेता गळाला...

दिवसभर माध्यमांमध्ये ही चर्चा रंगत असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नार्वेकर येणार आहेत का ते मला माहित नाही, असे उत्तर दिले. शिंदे आणि नार्वेकर यांचे परस्परांशी उत्तम संबंध आहेत. मात्र विधान गुलाबराव पाटील यांनी केल्याने चर्चा अधिकच रंगली. शिंदे यांनी नार्वेकर येणार का माहित नाही. पण माझे तरी काहीच लपून नसते, असेही सांगून टाकले. ते गणपतीला नार्वेकरांच्या घरी गेल्याचा संदर्भही या विधानाला होता. शिंदे गटातील या चर्चेनंतर उध्दव ठाकरे यांच्या गटाच्या प्रवक्त्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी नार्वेकर, असे काही करतील असे वाटत नाही. ते उध्दवजींचे खंदे समर्थक असल्याचे विधान करीत ते सध्या धार्मिक वृत्तीचे झाले आहेत अशी पुस्तीही जोडली.

Milind Narvekar Latest News
Hingoli : राष्ट्रवादी-काॅंग्रेसच्या नेत्यांनी कारखाने, संस्था दिल्या, आम्हाला झुणका-भाकर, शिवभोजन थाळी..

नार्वेकरांशी या काळात संपर्कही होत नव्हता. आता ४० आमदारांपाठोपाठ नार्वेकरही 'मातोश्री' सोडणार की काय?, अशी शंका घेतली जात असतानाच संध्याकाळी मिलिंद नार्वेकर यांच्या ट्विटरवरून ते तिरुपतीला गरुडयात्रेनिमित्त गेल्याचे स्पष्ट झाले. नवरात्रीनिमित्त तेथे सुरु असलेल्या पारंपारिक उत्सवाचा भाग म्हणून ते दोन दिवसांपूर्वी तिरुपती संस्थानाचे अध्यक्ष सुब्बा रेड्डी यांच्यासमवेत कोल्हापूरच्या अंबाबाईला शालू द्यायला गेले होते.

दरम्यान,आज साक्षात तिरुपतीहून गरुडयात्रेत सहभागी झाल्याचे त्यांचे छायाचित्र ट्विटरवर झळकले. त्यांना ट्रस्टवर महाराष्ट्र सरकारने नेमले आहे. आज या यात्रेला हजर असलेल्या भारताचे सरन्यायाधीश उदय लळीत आणि महाराष्ट्राचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांच्या समवेतची नार्वेकरांची छायाचित्रेही ट्विटरवर झळकली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com