

Mumbai : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २५ वर्षांच्या राजकीय कारकीर्दीकडे वळून पाहताना मला कधी कधी अतिशय दु:खं होतं. ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल, चंद्राबाबू नायडू, के. चंद्रशेखर राव, आणि जगनमोहन रेड्डी हे स्वत: च्या जीवावर सत्ता आणून मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहचू शकतात. पण या सगळ्यांमध्ये सर्वात उजवे तर शरद पवार आहेत. पण कधी आपल्या स्वत: च्या जीवावर राज्यात आपला पक्ष सत्तेत निवडून आणू शकलो का असा खडा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपस्थित केला. रौप्यमहोत्सवी वर्षातला आनंदांचा दिवस करतानाच आपण आत्मचिंतन, आत्मपरीक्षणही केलं पाहिजे असं म्हणत त्यांनी राष्ट्रवादीच्या नेतेमंडळींसह कार्यकर्त्यांचे कान टोचले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या २५ व्या वर्धापन दिनानिमित्त षण्मुखानंद हाँल येथे मेळावा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात ते बोलत होते. पवार म्हणाले, महाराष्ट्रात २५ वर्ष प्रत्येकानं पक्ष पोहचवण्याचं काम केलं. काही नेते सोबत आहेत, काही नेते आपल्याला सोडून गेले. त्यात काहीजण नाराज झाले. त्यांच्या नाराजीचं कारण समजलं नाही.
पण राष्ट्रवादी काँग्रेस(NCP)चे अध्यक्ष शरद पवार यांनी आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाकरी फिरवण्याचं सांगितलं. ती फिरली पाहिजे. यातच आता प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळे यांची पक्षाच्या कार्यध्यक्षपदी निवड केली. त्यांनी पक्ष मजबूत करण्यासाठी चांगलं काम करणं अपेक्षित आहे असंही पवार म्हणाले.
''तो आपल्या जीवाभावाचा... ''
अजित पवार(Ajit Pawar) म्हणाले, आपली राष्ट्रीय मान्यता गेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर मह्त्वाची जबाबदारी सोपवली. २५ वर्षांच्या काळात मागे वळून पाहिलं तर कितीकाळ सत्ता होती ,किती काळ नव्हतो. अनेक नव्या सहकार्यांना आपलंसं केलं. त्यात खडसे, मुंडे आले. पण संघटनेत कोण कधी आलं याला महत्व नाही. तर पक्ष तळागळापर्यंत पोहचवण्याचं काम करेल तो पक्षाचा जीवाभावाचा आपला सहकारी आहे. ज्याच्याकडे नेतृत्व, कर्तृत्व, संघटन कौशल्य आहे त्याला पक्षात नक्कीच संधी आहे.
''...पण ते इतरांना ते निवडून आणू शकत नाही!''
त्यात जात पात, नाते, गोत्याचा नवा जुना असा भेदभाव केला जाणार नाही. सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या एखाद्या नेत्याला थेट महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी पोहचवू शकतो हे फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच करु शकतो. आता काहीजणांना मंत्रिपदं अनेक वर्ष मिळाली. आणि मंत्रिपदं नसताना संघटनेची जबाबदारी वेगवेगळ्या भागाची प्रत्येकानं उचलली पाहिजे. पण काही जण मंत्री होतात पण ते फक्त स्वत: ला निवडून आणू शकतात. पण ते इतरांना ते निवडून आणू शकत नाही असा टोलाही अजित पवारांनी यावेळी लगावला.
आणि राज्यात सर्वात मोठा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस असेल असं अनेक नेते म्हणाले. भाषणं देऊन फक्त कार्यकर्त्यांमध्ये जोश भरता येतो. पण फक्त भाषणं देऊन पक्ष मोठा होत नाही. त्यामुळे पक्ष मोठा झालेल्यांनी पण आपण आपल्या मतदारसंघात,जिल्ह्यात पक्ष संघटनेचं काम करत आहे. आपल्या जिल्ह्यात किती पक्ष संघटनेचं काम करत आहोत याचंही आत्मपरीक्षण प्रत्येकानं केलं पाहिजे.
तरीही आपण एकहाती सत्ता का आणू शकलो नाही?
२५ वर्षांच्या राजकीय कारकीर्द पाहता मला कधी दु:खं होतं की, ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये, अरविंद केजरीवालां(Arvind Kejariwal)नी दिल्ली आणि पंजाब, चंद्राबाबू नायडू यांनी आंध्र प्रदेश, के. चंद्रशेखर राव यांनी तेलंगणात, आणि जगनमोहन रेड्डी यांनी आंध्र प्रदेशात स्वत: च्या जीवावर सत्ता खेचून आणून मुख्यमंत्रीपदापर्यंत मजल मारली. पण या सगळ्यांमध्ये सर्वात उजवे तर शरद पवार आहेत. पण तरी कधी आपल्या स्वत: च्या जीवावर राज्यात एकहाती सत्ता खेचून आणू शकलो नाही आहे का असा खडा सवाल उपस्थित केला.
आपण विदर्भात, कोकणात, मुंबईत कमी पडतो. पण पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणात आपण कधी कधी आपलं वर्चस्व निर्माण केलं आहे. २५ व्या वर्षात पदार्पण करतोय पण अद्याप मुंबईत पक्षाचा अध्यक्ष नाही. आपल्याला काय परवानगी घ्यायला दिल्लीला जायचंय का असा रोखठोक सवाल उपस्थित केला. पवारसाहेबांशी बोलून आपण निर्णय घेऊ शकतो. त्यामुळे आपण आनंदाचा दिवस साजरा करत असतानाच आपण आत्मपरीक्षण, आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचं मतही पवार यांनी यावेळी व्यक्त करत कार्यकर्त्यांचेही कान टोचले.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.