Raj Thackeray: राज ठाकरे लवकरच इंडिया आघाडीत? राहुल गांधींशी फोनवरुन चर्चा झाली, उद्धव ठाकरेंचाही दुजोरा

Raj Thackeray: महापालिका निवडणूक संपली तरी ठाकरेंमधील हा बंध कायम राहिला आहे. त्यानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे हे सातत्यानं भाजपविरोधात भूमिका मांडताना दिसत आहेत. पण आता राज ठाकरे यापुढचं पाऊल टाकण्याच्या तयारीत आहेत.
Uddhav Thackeray_Raj Thackeray
Uddhav Thackeray_Raj Thackeray
Published on: 
Updated on: 

Raj Thackeray: राज्यात सध्या कुठल्याही महत्वाच्या निवडणुका नाहीत पण तरीही महत्वाच्या राजकीय घडामोडी मात्र सुरु आहेत. काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या मुंबई महापालिका निवडणुकांसाठी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले. महापालिका निवडणूक संपली तरी ठाकरेंमधील हा बंध कायम राहिला आहे. त्यानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे हे सातत्यानं भाजपविरोधात भूमिका मांडताना दिसत आहेत. पण आता राज ठाकरे यापुढचं पाऊल टाकण्याच्या तयारीत आहेत. ते म्हणजे लवकरच ते राष्ट्रीय स्तरावरील काँग्रेसप्रणित इंडिया आघाडीत सामील होणार असल्याची चर्चा सुरु आहे. उद्धव ठाकरे यांनी देखील याला दुजोरा दिला आहे.

नेमक्या काय घडताहेत हालचाली

राज ठाकरे आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यामध्ये संवाद होत असल्याचा दावा ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. याबाबत ठाकरे बंधुंच्या संयुक्त पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांना विचारलं असता "जरा थांबा हळूहळू सर्व उलगडेल" अस उत्तर दिलं आहे. त्यांच्या या विधानावर बाजुला बसलेल्या राज ठाकरे यांनी हसत प्रतिसाद दिला आहे. त्यामुळं येत्या काळात राज ठाकरे हे इंडिया आघाडीत सामील होतीत अशी परिस्थिती निर्माण झाल्याचं चित्र आहे.

Uddhav Thackeray_Raj Thackeray
New Rules: 1 ऑक्टोबरपासून खिशाला झटका? ATM ते LPGपर्यंत 5 मोठे नियम बदलणार

संजय राऊत यांनी म्हटलं की, आजची इंडिया आघाडीची जी बैठक आहे त्यात त्यांचा मर्यादित अजेंडा सेट आहे, तो म्हणजे मुख्य निवडणूक आयुकत ज्ञानेश कुमार. सध्या राज ठाकरे आणि राहुल गांधी यांच्यामध्ये सुद्धा संवाद सुरु आहे. त्यांच्यात संवाद का असू नये? सर्व विरोधीपक्ष हे एकमेकांशी संवाद साधत आहेत. कालपर्यंत ममता बॅनर्जी या आंदोलनात सहभागी नव्हते पण आता त्यांचा संवाद सुरु आहे, त्या या बैठकीला येणार आहेत. कारण पश्चिम बंगालमध्ये जे सध्याचं वातावरण आहे त्यामुळं त्यांना वाटतंय की, इंडिया आघाडीनं आमच्या पाठीशी असावा आणि आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत.

Uddhav Thackeray_Raj Thackeray
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्तच्या पहिल्या यादीत नसलेल्या तालुक्यांसाठी मोठी बातमी; CM फडणवीसांनी दिला शब्द...

दरम्यान, राज ठाकरे यांनी गेल्या काही दिवसांत सातत्यानं विरोधकांची बाजू लावून धरली आहे. नुकतेच त्यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर झालेल्या आरोपांबाबतही राज ठाकरे यांनी भाष्य केलं. याप्रकरणी चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com