Nagpur Mayor : नागपूर महापालिकेतील भाजपचा 'पहिला' कारभारी ठरला; मुख्य चेहऱ्याचे नाव मात्र गुलदस्त्यात

Nagpur Municipal Corporation : नागपूर महापालिकेत भाजपने नरेंद्र बोरकर यांची गटनेतेपदी घोषणा केली असून, महापौर पदाचे नाव अद्याप जाहीर न केल्याने राजकीय उत्सुकता वाढली आहे.
BJP leaders and corporators attending a party meeting in Nagpur, where Narendra Borkar was announced as ruling party leader while the mayor’s name remained undisclosed.
BJP leaders and corporators attending a party meeting in Nagpur, where Narendra Borkar was announced as ruling party leader while the mayor’s name remained undisclosed.Sarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : नागपूरचा महापौर कोण होणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. शुक्रवारी (ता.30) रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. भाजप कोअर कमिटीचे सदस्य यावेळी उपस्थित होते. मात्र कोणाचेच नाव जाहीर करण्यात आले नव्हते. त्यानंतर आज सर्व नगरसेवकांची बैठक शहराध्यक्ष यांनी बोलावली होती. यावेळी मात्र फक्त गटनेत्याचे नाव भाजपने जाहीर केले असून महापौरांचे नाव मात्र गुलदस्त्यात ठेवले आहे.

नागपूर महापालिकेतील सत्तापक्ष गटनेता म्हणून भाजपने नरेंद्र बोरकर यांचे नाव जाहीर केले आहे. शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी त्यांचे नाव बैठकीत घोषित केले. बोरकर हे यापूर्वी स्थायी समितीचे सभापती, परिवहन समितीचे सभापती होते. यावेळी त्यांचे प्रमोशन करण्यात आले आहे. आरक्षणाच्या सोडतीत नागपूरचे महिलेकडे गेले आहे. सध्या नीता ठाकरे, दिव्या धुरडे, शिवानी दाणी यांची नावे आघाडीवर आहे.

आजच्या शुक्रवार (ता.31) बैठकीत महापौर, उपमहापौर तसेच स्थायी समितीचे सभापती भाजपतर्फे जाहीर केले जातील अशी अपेक्षा सर्वांना होती. मात्र ही सर्व नावे गुलदस्तात ठेवून उत्सुकता आणखीच वाढवली आहे. येत्या 6 जानेवारीला महापौरपदाची निवडणूक घेण्यात येणार आहे. भाजपचे 102 नगरसेवक निवडून आले आहेत.

BJP leaders and corporators attending a party meeting in Nagpur, where Narendra Borkar was announced as ruling party leader while the mayor’s name remained undisclosed.
Chandrapur Congress Crisis : 'ते' नगरसेवक धानोरकर की वडेट्टीवारांचे ? चंद्रपूरमध्ये वाद वाढला, सत्ता जाण्याच्या भीतीने काँग्रेसमध्ये अस्वस्थता

असे असताना अद्याप भाजपने गटाची नोंदणी विभागीय आयुक्तांकडे केलेली नाही. सोमवारी नरेंद्र बोरकर यांच्या नेतृत्वात भाजपची गटनोंदणी केली जाणार आहे. त्यानंतरच महापौराचे नाव जाहीर केले जाईल अशी माहिती आहे. काँग्रेसचे 34 नगरसेवक निवडूऩ आले आहे. गटनेता आणि विरोधी पक्षनेता म्हणून काँग्रेसने संजय महाकाळकर यांचे नाव जाहीर केले आहे.

BJP leaders and corporators attending a party meeting in Nagpur, where Narendra Borkar was announced as ruling party leader while the mayor’s name remained undisclosed.
Nagpur Mayor Election : 5 नगरसेवक वाढताच काँग्रेसचा धक्कादायक निर्णय; भाजपसाठी बिनविरोध वाटणाऱ्या महापौरपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट

महापौर निवडून येतील एवढे संख्याबळ काँग्रेसकडे नाही. असे असतानाही महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीत काँग्रेसने आपले उमेदवार उभे करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार नाही हे स्पष्ट झाले आहे. स्थायी समितीचे सभापती म्हणून संजय बालपांडे यांच्या नावाची चर्चा आहे. बोरकर, बालपांडे यांची निवडणूक भाजपने जातीय समीकरण डोळ्यासमोर ठेवून केल्याचे दिसते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com