BMC Mayor: मुंबई महापौर निवडणुकीबाबत मोठी घडामोड! ठाकरे सेनेचा भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा; निवडणूक बिनविरोध होणार?

BMC Mayor : मुंबई महापालिकेची निवडणूक आणि महापौर कोण होणार? याची महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभरात उत्सुकतेचा विषय होता.
BJP Mayor Ritu Tawade
BJP Mayor Ritu Tawade
Published on
Updated on

BMC Mayor Election : मुंबई महापालिकेची निवडणूक आणि महापौर कोण होणार? याची महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभरात उत्सुकतेचा विषय होता. त्यानुसार, आता मुंबई महापालिकेत भाजप-शिवसेनेची सत्ता आणि भाजपचा महापौर होणार असल्याचं निश्चित झालं आहे. भाजपनं आपला महापौर आणि उपमहापौरपदाचा उमेदवारही जाहीर केला आहे. पण क्रमांक दोनचा पक्ष ठरलेली ठाकरेंच्या शिवसेनेनं महापौरपदाच्या निवडणुकीबाबत मोठा निर्णय घेतला आहे.

BJP Mayor Ritu Tawade
Adani Vidarbha: अदानी समुहानं विदर्भात केली मोठी गुंतवणूक! फडणवीसांनी सांगितलं विकासाचं टार्गेट

मुंबई महापालिकेच्या महापौरपदाची निवडणूक ११ फेब्रुवारी रोजी पार पडणार आहे. या निवडणुकीनंतर महापौरपदावर शिक्कामोर्तब होईल. या निवडणुकीत क्रमांक दोनचा पक्ष ठरलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेकडूनही कोणता उमेदवार दिला जाईल, याची उत्सुकता होती. पण आता ठाकरेंच्या सेनेकडून महापौरपदासाठी उमेदवार दिला जाणार नसल्याचं समोर आलं आहे. म्हणजेच ठाकरेंच्या सेनेनं भाजपच्या महापौरपदाच्या उमेदवार रितू तावडे यांना पाठिंबा दिला आहे. ठाकरे सेनेच्या नेत्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी मातोश्रीवरील बैठकीनंतर पक्षाची भूमिका माध्यमांसमोर मांडली.

BJP Mayor Ritu Tawade
NCP Merger: राष्ट्रवादीसाठी 12 तारीख महत्वाची! विलिनीकरणाबाबत दादांची इच्छा राजकीय की भावनिक होती? रोहित पवार सगळं सांगणार

पाठिंबा देण्याचं कारण काय?

दरम्यान, ऐकेकाळी दीर्घकाळ मैत्रीत असलेला भाजप हा ठाकरे सेनेचा आता क्रमांक एकचा कट्टर विरोधीपक्ष बनललेला आहे. असं असतानाही मुंबई महापालिकेत भाजपच्याविरोधात मराठी-अमराठी या मुद्द्यावरुन जोरदार प्रचार केलेला असतानाही ठाकरेंच्या सेनेनं भाजपच्या महापौरपदाच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर करण्यामागचं कारणही पेडणेकर यांनी सांगितलं आहे. पेडणेकर यांनी म्हटलं की, "महायुतीनं आता मराठीच महापौर दिला आहे. त्यामुळं आम्ही नक्कीच यासाठी अपशकुन करणार नाही. आम्हाला आकड्यांची गणित मान्य असतात आणि आम्ही सध्याचं महापालिकेतील हे गणित मान्य केलेलं आहे. सक्षम विरोधीपक्ष म्हणून काम करणार आहोत. सत्तेत असताना देखील आम्ही विरोधीपक्षाची भूमिका बजावली होती, आता तशीच प्रत्यक्षात विरोधात असताना बजावू"

BJP Mayor Ritu Tawade
वसंतदादा पाटील यांचे कार्यकर्ते ते पवार काका-पुतण्याचे विश्वासू : सुनील तटकरेंची राजकीय हिस्ट्री

निवडणूक बिनविरोध होणार?

एकूणच भाजपनंतर ठाकरेंची शिवसेना हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पक्ष असल्यानं आणि याच पक्षानं महापौरपदाच्या निवडणुकीतून माघार घेतलेली असल्यानं आता ही निवडणूक बिनविरोध होतेय की काय? अशी स्थिती निर्माण झाली आहे. पण इतरही काही पक्षांकडून या निवडणुकीत उमेदवार दिला जाण्याची शक्यता असली तरी ती केवळ औपचारिकताच ठरेल कारण मजबूत बहुमत सध्या भाजप- शिंदेची शिवसेना या युतीकडं आहे.

BJP Mayor Ritu Tawade
EVM hacking allegations : ईव्हीएमचा घोळ रोखण्यासाठी ठाकरेंच्या शिलेदाराचा 'जालीम' तोडगा! मतदानानंतर सांगितले 'ते' 3 उपाय; विरोधकांची झोप उडाली!

उमेदवार कोण?

मुंबई महापालिकेच्या महापौरपदासाठी भाजपच्या रितू तावडे यांची निवड झाली आहे. रितू तावडे या घाटकोपरच्या वॉर्ड क्रमांक १३२ मधून नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत. हा वॉर्ड गुजरातीबहुल भाग आहे. सलग दुसऱ्यांदा त्या नगरसेविका झाल्या आहेत. त्या भाजपच्या जुन्या कार्यकर्त्या असून त्यांना प्रशासकीय कामाचा अनुभव आहे. तर दुसरीकडं एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नगरसेवक संजय घाडी यांना उपमहापौरपदासाठी उमेदवारी देण्यात आली आहे.

BJP Mayor Ritu Tawade
Ghooskhor Pandat Row: 'घुसखोर पंडत'वरुन युपीच्या राजकारणात खळबळ! CM आदित्यनाथ अन् मायावती आले एकत्र; नेमका प्रकार काय?

BMCत बलाबल कसं?

मुंबई महापालिकेच्या 227 जागांपैकी भाजपचे सर्वाधिक 89 नगरसेवक निवडून आले आहेत. तर, शिंदेंच्या शिवसेनेचे 29 नगरसेवक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा एक विजयी नगरसेवक हा देखील महायुतीसोबत गेला आहे. तर, ठाकरेंच्या शिवसेनेकडे 65 नगरसेवक आहेत. तसेच मनसेकडे 6 नगरसेवक आहेत. तर काँग्रेसचे 24 आणि एमआयएमचे 8 नगरसेवक निवडून आले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com