Political horoscope : राजकीय उलथापालथी, सामाजिक रोषाची शक्यता

horoscope : या जोडीला रवी-प्लुटो योग होत असल्यामुळे राजकीय क्षेत्रात मोठ्या व्यक्ती अडचणीत येतील. मोठ्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई होईल. राजकीय व्यक्ती किंवा उद्योग क्षेत्रातील व्यक्तीचा मृत्यू या काळात संभवतो.
Political Horoscope
Political HoroscopeSarkarnama
Published on
Updated on

सिद्धेश्वर मारटकर

Bhavishynama : 14 जानेवारीच्या पौर्णिमान्त कुंडलीमध्ये वृश्चिक लग्न उदित असून अष्टम स्थानी पुनर्वसू नक्षत्रात पौर्णिमा होत आहे. धनस्थानी रवी, बुध, तृतीयेत प्लुटो, चतुर्थात शुक्र-शनी, पंचमात राहू- नेप्च्यून, षष्ठात हर्षल, सप्तमात गुरू, अष्टमात चंद्र, भाग्यस्थानी मंगळ व लाभस्थानी केतू अशी ग्रहस्थिती आहे

ग्रहस्थितीचा विचार करता मंगळ प्लुटो प्रतियोग धार्मिक/जातीय तणाव दर्शवितो. या योगामुळे महत्त्वाच्या व्यक्तींवर होणारे हल्ले, अपघात, घातपात यासारख्या घटना वाढण्याची शक्यता असून यावरून जातीय/धार्मिक तणाव निर्माण होवू शकतो. मोठ्या व्यक्तींवर आरोप होतील. महत्त्वाच्या पदावर असणाऱ्या व्यक्तींना राजीनामे द्यावे लागतील. या जोडीला रवी-प्लुटो योग होत असल्यामुळे राजकीय क्षेत्रात मोठ्या व्यक्ती अडचणीत येतील. मोठ्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई होईल. राजकीय व्यक्ती किंवा उद्योग क्षेत्रातील व्यक्तीचा मृत्यू या काळात संभवतो.

Political Horoscope
Devendra Fadnavis : राणें-खाडेंची विधाने ठरणार का फडणवीसांच्या वाटेतले काटे?

मोठ्या व्यक्तीविरोधात सामाजिक रोष अनुभवास येईल. सरकारमधील व्यक्तीविरोधात बंद निदर्शने होतील. या काळात गुन्हेगारीमध्ये वाढ होण्याची शक्यता असून खून / दरोडे / हिंसा यामध्ये वाढ होईल. महत्त्वाच्या व्यक्तींवर हल्ले होतील. नवम स्थानातून मंगळ वक्री होत असल्यामुळे धार्मिक/सामाजिक व्यक्ती तसेच धार्मिक स्थळी घातपात / अपघात संभवतात. धार्मिक स्थळे किंवा व्यक्तींवरून मोठे वादविवाद होण्याची शक्यता या काळात राहील. पुढील काळात मंगळ अष्टमात वक्री होणार असल्यामुळे भूकंप/वादळे या सारख्या घटनांमधून हानी संभवते. या काळात वाहने/रेल्वे/विमान दुर्घटना यामधून सामुहिक मृत्यूच्या घटना संभवतात.

Political Horoscope
CM Devendra Fadnavis : 'मी, राऊतांसारखा रिकामटेकडा नाही', फडणवीस यांची बोचरी टीका

विशेष करून महाराष्ट्रातील राजकारण या काळात तापण्याची शक्यता असून मोठे वादविवाद, मोठे अपघात, गुन्हेगारी, खून, हत्या यांचे प्रमाण मोठे राहील. या योगामुळे महत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेत वाढ होईल. मोठ्या व्यक्ती, मोठे शहर, मंदिरे यांना धोका या काळात संभवतो.

या योगामुळे दहशतवादी किंवा नक्षलवादी संघटना यांच्याकडून घातपाताचे प्रयत्न होतील किंवा धमक्या दिल्या जातील. मोठे गुन्हेगार, दहशतवादी पकडले जातील किंवा चकमकीत ठार मारले जाण्याची शक्यता राहील. पोलिस, खेळाडू यांच्यासाठी पुढील काळ त्रासदायक राहील. त्यांच्यावर हल्ले होण्याची शक्यता राहील.

Political Horoscope
BJP Political News : भाजपची गाडी सुसाट,महापालिका स्वबळावरच लढणार! युतीचा प्रस्ताव फेटाळला..

या योगामुळे भारतीय खेळाडूंना मोठ्या अपयशाचा सामना करावा लागेल. ज्येष्ठ खेळाडूचा मृत्यू किंवा निवृत्तीच्या, बडतर्फीच्या घटना संभवतात. नेतृत्वात बदल होईल. पोलिस अधिकारी यांच्या बदलीची किंवा निलंबनाची कारवाई होईल.

तृतीय स्थानावरून मंगळ-प्लुटोचा योग शेजारील राष्ट्रात हिंसा किंवा सत्तापालट दर्शवितो. बांगलादेश/चीन/पाकिस्तान या देशातील अशांतता वाढेल. चीनमधील विषाणूमुळे मोठ्या प्रमाणावर मृत्यू होण्याची शक्यता राहील. तर पाकिस्तान, तालिबानी संघर्ष वाढेल. बांगलादेशात हिंदू-मुस्लिम संघर्ष वाढण्याची शक्यता राहील. दोन एप्रिलपर्यंत या घटनांची तीव्रता अधिक राहू शकते. तरुणांसाठी हा काळ प्रतिकूल राहील

Political Horoscope
Anjali Damania : वाल्मिक कराडला कोण वाचवतंय; आठव्या आरोपीला मकोका का लावला नाही? अंजली दमानियांचा सवाल

महाराष्ट्रातील राजकारणात अचानक मोठे बदल संभवतात. सत्ताधारी युतीमधील संघर्ष/ मतभेद वाढताना दिसेल. शाब्दिक युद्ध वाढेल. मंत्र्याच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढेल. एखादा गट सत्तेतून बाहेर पडण्याची शक्यता राहील. मंत्रिमंडळ विस्तार, पालकमंत्री यांची नियुक्तीवरून वादविवाद वाढतील.

महाराष्ट्रातील मोठ्या राजकीय व्यक्तीचा मृत्यू या काळात संभवतो. सत्ताधारी पक्षासाठी जानेवारी महिना कटकटीचा राहील. विरोधी पक्ष आक्रमक होऊन सरकारला कोंडीत पकडण्यात यशस्वी होतील. या जोडीला महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या पक्षात फूट पडेल. विशेषकरून मुंबईमध्ये मोठ्या घडामोडी होण्याची शक्यता राहील. पक्षांतराच्या घटना वाढतील. आघाडी, युतीमधील मित्र पक्षांमधील विसंवाद वाढण्याची शक्यता असून स्वतंत्र लढण्याची घोषणा होईल

Political Horoscope
Santosh Deshmukh Murder Case : बीड पोलिस, 'CID', 'SID'कडून निसटला 'हा' गंभीर मुद्दा; राष्ट्रीय मानवाधिकार आयोग 'अ‍ॅक्शन मोड'वर

सावधगिरी बाळगा, साथीपासून दूर राहा

या काळात बुध-मंगळ प्रतियोग होत असल्यामुळे साहित्य संमेलनात शाब्दिक युद्ध अनुभवास येईल. लेखक/ साहित्यिकांमधील मतभेद अनुभवास येईल. वादग्रस्त वक्तव्य किंवा लिखाणावरून मोठे वाद होतील. प्रसार माध्यमे/ सोशल मीडिया/ पत्रकार/ साहित्यिक यांच्यासाठी जानेवारी महिना प्रतिकूल राहील. या क्षेत्रातील मोठ्या व्यक्ती अडचणीत येतील. धार्मिक नेत्यांची वक्तव्ये वाद वाढविणारी राहतील.

शेअर बाजारासाठी हा महिना गोंधळ निर्माण करणारा राहील. गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता असून तज्ज्ञांचे अंदाज चुकण्याची शक्यता राहील. सोन्या-चांदीच्या भावात मोठी घसरण होईल. वाहन, सोने-चांदीच्या वस्तू, वस्त्र, अलंकार यांच्यावरील करवाढीमुळे या वस्तू महाग होतील.

Political Horoscope
Santosh Deshmukh Murder Case : संतोष देशमुख खूनप्रकरणी सीआयडीची मोठी कारवाई; सातही आरोपींवर मोकाची कारवाई

षष्ठस्थानी हर्षल असल्यामुळे या काळात विचित्र आजाराची साथ/ चीनमधील विषाणूची दहशत वाढण्याची शक्यता राहील. सावधगिरीचे निर्देश देण्यात येतील. लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी लागेल. मात्र गुरूची लग्न स्थानावर दृष्टी असल्यामुळे भारतामध्ये याचा धोका कमी राहील.

पंचमातील राहू-नेपच्यून विद्यार्थीवर्गासाठी गोंधळ निर्माण करणारा राहील. महत्त्वाच्या परीक्षेबाबत संभ्रम राहील. परीक्षेचे वेळापत्रक ऐनवेळेला बदलले जाईल. परीक्षा केंद्रावरून मोठा गोंधळ होण्याची शक्यता राहील. विद्यार्थी/लहान मुलांचे लैंगिक शोषण/फसवणूक/अपहरण या सारख्या घटना या काळात संभवतात. विद्यार्थी वर्गासाठी मनस्ताप वाढविणारा काळ दर्शवितो. लहान मुले विद्यार्थी यांची काळजी घ्यावी लागेल.

Political Horoscope
Shivsena UBT News : हात जोडतो, पाया पडतो कोणी कुठेही जाऊ नका; शिवसैनिकांच्या मेळाव्यात खैरेंचे साष्टांग दंडवत!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com