Political Horoscope: अनपेक्षित राजकीय घडामोडींचा कालखंड; उपराष्ट्रपतिपदासाठी महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेत्याची निवड?

Astrology Predictions 2 August to 9 August 2025: भविष्यनामा : २ ते ९ ऑगस्ट २०२५ : महाराष्ट्रातील मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होतील. वादग्रस्त मंत्री मंत्रिमंडळातून वगळले जातील किंवा दुय्यम खाते दिली जातील. नवीन उपराष्ट्रपतिपदासाठी महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेत्याची निवड होण्याची शक्यता राहील.
Astrology Predictions 2 August to 9 August 2025
Astrology Predictions 2 August to 9 August 2025Sarkarnama
Published on
Updated on

सिद्धेश्वर मारटकर

ऑगस्ट महिन्यात महत्त्वाचे गृहयोग होत आहेत. नऊ ऑगस्ट रोजी होणारी शनी-मंगळ युती मोठ्या घडामोडी घडविणारी राहील. भारतासह आंतरराष्ट्रीय पातळीवर दहशतवादी हल्ला, मोठी विमान दुर्घटना, युद्ध यांचा धोका दर्शवितो. भारत-पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण करणारी घटना पुन्हा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

‘ऑपरेशन सिंदूर’ थांबले नाही, याचा अनुभव येण्याची शक्यता राहील. भारत-पाकिस्तान, भारत-चीन, इस्राईल-सीरिया, रशिया-युक्रेन यांचा संघर्ष पुन्हा पेटण्याची शक्यता राहील. अनेक ठिकाणी मोठ्या विमान दुर्घटना संभवतात. युद्धासारख्या घटनांमधून रॉकेट, क्षेपणास्त्रांचा मोठ्या प्रमाणावर वापर होईल. पोलिस, लष्करासाठी हा काळ प्रतिकूल असून, जवानांवर हल्ले होतील. मोठे गुन्हेगार, दहशतवादी मारले जातील.

रवी-हर्षल केंद्र योगामुळे राजकीय क्षेत्रात अनपेक्षितपणे मोठ्या घडामोडी अनुभवास येतील. केंद्र व राज्य सरकारमध्ये अचानक मोठे बदल होण्याची शक्यता राहील. मंत्री व मोठ्या पदावरील व्यक्ती बदलल्या जातील. राजकीय क्षेत्रात मोठ्या घडामोडी या काळात संभवतात. राज्य व केंद्रांतील मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होतील.

खातेबदलाबरोबर काही मंत्र्यांचे राजीनामे घेतले जातील. मोठ्या पदांवरील व्यक्ती बदलल्या जातील. महाराष्ट्रातील मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होतील. वादग्रस्त मंत्री मंत्रिमंडळातून वगळले जातील किंवा दुय्यम खाते दिली जातील. नवीन उपराष्ट्रपतिपदासाठी महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेत्याची निवड होण्याची शक्यता राहील. संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये विरोधी पक्ष व सत्ताधारी नेत्यांमध्ये हमरीतुमरीचे प्रसंग निर्माण होतील. गोंधळामुळे अनेक वेळा सभागृह तहकूब केले जातील. काही नेत्यांवर निलंबनाच्या कारवाया होतील.

या काळात काही संसर्गजन्य विकार पसरण्याची शक्यता असून, हवा व वातावरणामध्ये विचित्र बदल होतील. पाण्यातून विचित्र आजार किंवा साथ पसरण्याची शक्यता राहील. लहान मुले, विद्यार्थी यांच्यासाठी ऑगस्टचा पूर्वार्ध प्रतिकूल राहील. विचित्र आजाराची साथ लहान मुलांसाठी त्रासदायक राहील. लहान मुलांचे अपघात, अपहरणाच्या घटना ऑगस्टच्या पूर्वार्धात संभवतात. या काळात चोरी, खून, दरोडे, अपहरण यांसारख्या गुन्ह्यांमध्ये वाढ झालेली अनुभवास येईल. शनी-नेपच्यून योगामुळे त्सुनामी, भूकंप, जहाज दुर्घटना यांतून मोठी हानी संभवते.

Astrology Predictions 2 August to 9 August 2025
Prajwal Revanna: माजी पंतप्रधानांचा नातू, माजी खासदार बलात्कार प्रकरणी दोषी; प्रज्वल रेवन्ना याला कोर्टातच रडू कोसळलं!

शेअर मार्केटमध्ये मोठी घसरण होण्याची शक्यता असून, मार्केटमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण होईल. मोठे आर्थिक घोटाळे या काळात उघडकीस येण्याची शक्यता राहील. या काळात शेतकरी आंदोलन, संप, बंद, मराठा आरक्षण यांवरून मोठी निदर्शने होतील. डॉक्टर, नर्स, सरकारी कर्मचारी यांचे संप होतील. रुग्णालये, तुरुंग या ठिकाणी गोंधळ किंवा हिंसाचाराचे प्रसंग अनुभवास येतील. रुग्णालये, तुरुंग येथील अवैध गोष्टी, भ्रष्टाचार उघडकीस येतील.

भाग्य स्थानातील गुरूमुळे देशात सण, उत्सव मोठ्या उत्साहात साजरे होतील. कला, संगीत, सांस्कृतिक कार्यक्रमांचे मोठ्या प्रमाणावर आयोजन होईल. धार्मिक स्थळांवर मोठी गर्दी आणि उत्साह अनुभवास येईल. पत्रकार, लेखक, साहित्यिक यांना सन्मानित केले जाईल. या क्षेत्रातील व्यक्तींना मोठ्या पदांवर काम करण्याची संधी मिळेल. मात्र, या क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्तींच्या मृत्यूच्या घटना या काळात संभवतात. खेळाडूंसाठी हा काळ प्रतिकूल असून, खेळ आणि स्पर्धांमध्ये पराभवाचा सामना करावा लागेल. खेळाडूंमधील वादविवाद किंवा दुखापतीच्या घटना अनुभवास येतील.

Astrology Predictions 2 August to 9 August 2025
Nagpur News: प्रभाग ठरले! आता उत्सुकता महापालिकेच्या निवडणुकीची

साप्ताहिक राशिभविष्य २ ते ९ ऑगस्ट २०२५

मेष : सप्ताहात होणारा शनी-मंगळ योग मोठे खर्च करणारा राहील. पोटाचे विकार संभवतात. धार्मिक विधी, देवदर्शन होईल. सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग राहील.

वृषभ : कोर्ट-कचेरी, वादविवादापासून दूर राहावे, भागीदारीच्या व्यवसायात कटकटी संभवतात. मात्र, वारसा हक्कातून मोठा लाभ होईल. कमी श्रमातून मोठे लाभ होतील. शेअर्ससारख्या व्यवसायात नुकसान संभवते.

मिथुन : वरिष्ठांशी मतभेद होण्याची शक्यता राहील. घरातील ज्येष्ठांची काळजी घ्यावी लागेल. घर, मालमत्तेवरून वाद संभवतात. कोर्टकचेरीचे प्रश्न सामंजस्याने सुटतील. भागीदारीतील व्यवसायात फायदा होईल.

कर्क : परदेशातील नोकरीसाठी प्रयत्नांना यश मिळेल. व्हिसा-पासपोर्टची कामे होतील. मोठे प्रवास, परदेशगमन होईल. मात्र, या काळात वैवाहिक जीवनात कटकटी संभवतात. भागीदारीमध्ये नुकसान संभवते.

सिंह : जागा, घर, मालमत्तेच्या व्यवहारात कटकटी संभवतात. आर्थिक व्यवहार जपून करावेत. घर, जागेमध्ये पैसे अडकतील. कुटुंबात कलह होण्याची शक्यता राहील.

कन्या : सप्ताहात राशीतून होणारा शनी-मंगळ योग आरोग्याशी संबंधित चिंता वाढविणारा राहील. जोडीदाराशी खटके उडतील. मात्र, घरी धार्मिक विधी होतील. मोठ्या व्यक्तीचा पाहुणचार होईल.

तूळ : सप्ताहात कौटुंबिक कलह संभवतो. मोठे खर्च झाल्याने आर्थिक ताण वाढेल. कर्जाच्या कामात अडथळे येतील. प्रवासात किमती वस्तूंची काळजी घ्यावी, चोरांपासून सावध राहावे. खरेदी-विक्रीमध्ये नुकसान संभवते.

वृश्चिक : सप्ताहात आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. मित्र-सहकाऱ्यांशी मतभेद संभवतात. वसुली, येणे लांबणीवर पडेल. आर्थिक व्यवहार कटकटीचे होतील. मोठे लाभ होतील. पेन्शन, विमा यांतून लाभ होईल.

धनू : वरिष्ठांशी मतभेद टाळावेत. महत्त्वाच्या कामात अडथळे विलंब संभवतात. मात्र, तरुणांचे विवाह जमतील. भागीदारीच्या व्यवसायाची संधी मिळेल. कुटुंबातील ज्येष्ठांची काळजी घ्यावी लागेल.

मकर : येणी वसूल होतील. मात्र, वादविवादातून मोठी कामे होतील. मोठे प्रवास कराल. व्हिसा-पासपोर्टची कामे होतील. नोकरीत चांगले बदल होतील. हाताखालच्या लोकांकडून चांगले सहकार्य मिळेल.

कुंभ : नवीन व्यवसायासाठी प्रयत्न होतील. नोकरीमध्ये खंड पडेल. आरोग्याच्या तक्रारी संभवतात. कामामध्ये दगदग वाढेल. मात्र, मित्र, सहकारी यांची मदत होईल. शेअर्ससारख्या व्यवसायात दिलासा मिळेल.

मीन : नोकरी व्यवसायात उत्साहाचे वातावरण राहील. वरिष्ठ कामावर खूष होतील. घरात धार्मिक कार्य होतील. पाहुण्यांची वर्दळ वाढेल. घर, जागा वाहन यांची खरेदी होईल. समज-गैरसमज संभवतात.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com