Assam IAS transfer list : ऐन निवडणुकीच्या तोंडावर आसाममधील 15 वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; आयोगाच्या रडारवर प्रशासन?

Political News : गृह विभाग, मुख्यमंत्री सचिवालय आणि अनेक जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांचा (समावेश आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये नवीन उपायुक्तांची नियुक्ती करण्यात आली असून अनेक अधिकाऱ्यांना नवीन विभागांची जबाबदारी देण्यात आली आहे.
Ias transfer
Ias transferSarkarnama
Published on
Updated on

Guvahati News : आगामी काळात आसाममध्ये विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. त्यामुळे येत्या काळात राज्यातील प्रशासकीय व्यवस्था सुधारण्यासाठी आणि सरकारी कामाला गती देण्यासाठी मुख्यमंत्री हिंमत बिस्वा सरमा यांनी प्रशासनाला मोठा संदेश देत राज्य सरकारने मोठे प्रशासकीय फेरबदल केले आहेत. राज्य सरकारने एकाच वेळी राज्यातील 15 वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या केल्या आहेत. यामध्ये गृह विभाग, मुख्यमंत्री सचिवालय आणि अनेक जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांचा (समावेश आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये नवीन उपायुक्तांची नियुक्ती करण्यात आली असून अनेक अधिकाऱ्यांना नवीन विभागांची जबाबदारी देण्यात आली आहे.

राज्यात आगामी काळात होत असलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रशासकीय व्यवस्था सुधारण्यासाठी बदल करण्यात आले आहेत. राज्य कार्मिक विभागाच्या सचिव मोनिता बोरगोहेन यांच्या आदेशानुसार, अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांना विविध जिल्हे आणि विभागांमध्ये नवीन जबाबदाऱ्या सोपण्यात आल्या आहेत.

Ias transfer
BJP municipal politics : भाजप नेत्यांची 'लाडकी' मंडळी वेटिंगवर! पराभूत उमेदवारांना मागच्या दाराने संधी मिळणे अवघड; स्वीकृत नगरसेवक पदासाठी नव्या चेहऱ्यांना प्राधान्य

गृह आणि राजकीय विभागाचे आयुक्त आणि सचिव पार्थ प्रतिमा मजुमदार यांची बाजाली जिल्ह्याचे उपायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. बाजालीचे विद्यमान उपायुक्त मृदुल कुमार दास यांना गृह आणि राजकीय विभाग आणि महिला आणि बाल विकास विभागाचे अतिरिक्त सचिव म्हणून जबाबदारी देण्यात आली.

Ias transfer
BJP Politic's : भाजपचे 7 पंचायत समितीत सत्ता स्थापनेच्या दिशेने एक पाऊल पुढे; 'या' नेत्यांवर गटनेत्याची जबाबदारी!

त्यासोबतच रोजगार आणि हस्तकला प्रशिक्षण संचालक नरेंद्र कुमार शाह यांना मुख्यमंत्री सचिवालयात सचिव म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. पूर्वी हे पद भूषवणारे आदित्य विक्रम यादव यांना लखीमपूर जिल्ह्याचे उपायुक्त म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. लखीमपूरचे सध्याचे उपायुक्त प्रणवजीत काकोटी यांना कौशल्य, रोजगार आणि उद्योजकता विभागाचे अतिरिक्त सचिव आणि रोजगार आणि हस्तकला प्रशिक्षण संचालक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. गोलाघाटचे उपायुक्त पराग कुमार काकोटी यांना महसूल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागात अतिरिक्त सचिव आणि आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

Ias transfer
Eknath Shinde : 'माझे कुटुंब-माझी जबाबदारी' या भूमिकेमुळेच शिवसेचं नुकसान; मुख्यमंत्री शिंदेंची टीका

या अधिकाऱ्यांना दिली नवीन उपायुक्त म्हणून नियुक्ती

बक्सा जिल्ह्याचे उपायुक्त गौतम दास यांना पंचायत आणि ग्रामीण विकास विभागात सचिव म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. धीरज सौद यांना बक्सा जिल्ह्याचे नवीन उपायुक्त म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. चिरांगचे उपायुक्त जतिन बोरा यांना सामान्य प्रशासन विभागात सचिव म्हणून नियुक्त करण्यात आले आहे आणि गोकुल चंद्र ब्रह्मा यांना चिरांगचे नवीन उपायुक्त म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

Ias transfer
Congress News: भाजपचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळांना बालेकिल्ल्यातच मोठा धक्का; एकाचवेळी जिल्ह्यातील बड्या नेत्यांनी हाती घेतलं कमळ

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com