Election Commission news : निवडणूक आयोगाविरोधात आंदोलन सुरू असतानाच मिळाले नवे उपायुक्त; खरे, मोरे यांच्यासह एकाचवेळी 27 वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या

Election Commission of India, Deputy Election Commissioner, Prakash Rajpurohit, central government reshuffle : १९९६ च्या तुकडीचे भारतीय दूरसंचार सेवेतील अधिकारी विवेक खरे यांची राष्ट्रीय चाचणी संस्थेत सहसचिवपदी वर्णी लागली आहे.
Election Commission controversy
Election Commission controversy Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Senior officers transfers : केंद्रीय निवडणूक आयोगाविरोधात मागील काही दिवसांपासून विरोधी पक्षांसह विविध संघटनांकडून देशभरात आंदोलने केली जात आहे. निवडणूक आयुक्तांमधील कथित मतभेद समोर आल्यानंतर आंदोलनांना धार आली आहे. याच पार्श्वभूमीवर शनिवारी दिल्लीत एकाचवेळी तब्बल २७ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. निवडणूक आयोगालाही नवे उपायुक्त मिळाले आहेत.

मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने सहसचिव आणि समकक्ष दर्जाच्या २७ सनदी अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांना मंजुरी दिली आहे. कार्मिक मंत्रालयाच्या आदेशानुसार, प्रकाश राजपुरोहित यांची केंद्रीय निवडणूक आयोगात उप निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्त करण्यात आली आहे. आधीचे उपायुक्त संजय कुमार यांची ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस बदली करण्यात आली होती. राजपुरोहित हे २०२० च्या तुकडीचे राजस्थान केडरचे अधिकारी आहेत.

खरे, मोरे यांचीही बदली

१९९६ च्या तुकडीचे भारतीय दूरसंचार सेवेतील अधिकारी विवेक खरे यांची राष्ट्रीय चाचणी संस्थेत सहसचिवपदी वर्णी लागली आहे. नीट पेपरफुटीनंतर NTA ही संस्था बरीच चर्चेत आली होती. त्यानंतर या संस्थेच्या प्रशासनात मोठे बदल करण्यात आले आहेत. मुळचे महाराष्ट्रातील IAS अधिकारी आशिष मोरे यांची राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणात अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर बदली करण्यात आली आहे. ते २००५ च्या तुकडीचे AGMUT केडरचे अधिकारी आहेत.

Election Commission controversy
संसदेत एकही दिवस न जाताच खासदारकीचा राजीनामा, आता 'या' महिला नेत्याची भाजपला भुरळ

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मंत्रालयालाही नवे अधिकारी मिळाले आहेत. त्यामध्ये आयएएस रवि शंनाकर IRS चित्तरंजन दास, आयएसएस पी. मनोज कुमार आणि आयएसएस अभिषेक भगोटिया यांची गृह मंत्रालयात सह सचिवपदी नियुक्त करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे वरिष्ठ आयएएस ब्रिजेश पांडे हे कॅपिटल डेव्हलपमेंट विभागात आता सहसचिव असतील.

Election Commission controversy
माझे प्रमोशन थांबवा! ACP विवेक भगत यांचे आयुक्तांना पत्र, गृह मंत्रालयातून निघालेली ऑर्डर

आयआरएस निखील वर्मा, आयएएस तन्वी सुंद्रीयाल, इंद्रजित सिंग, अय्याज तांबोळी यांच्याही बदल्या झाल्या आहेत. आयआरएसएमई सेवेतील राजेश मलिक, रजनीश कुमार तोमर, आयएएस मोहम्मद वाय सफीरुल्ला के, वामली डेका, एम. रामाचंदू, सी मुरूगन, मनीषा त्रिगतिहा, आयआरएस रितू शर्मा, निशिता तिवारी, अविनाश जैन, पवन कुमार, आयआरपीएस नवीन अगरवाल, आयईएस सोनिया पंत, सीएसएस नितीन कुमार आणि आयए अॅन्ड एएस अनिता शहा अकेला यांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com