टीईटी प्रकरणात ५ कोटींचा गैरव्यवहार? अमिताभ गुप्ता

टीईटी प्रकरणात सुखदेव डेरे आणि आश्विनकुमार यांना अटक केल्यानंतर अमिताभ गुप्ता यांनी या प्रकऱणाची माहिती दिली आहे.
Ameetabh Gupta 

Ameetabh Gupta 

Published on
Updated on

पुणे : शिक्षक पात्रता परीक्षेतील (Teacher Eligibility Test) गैरव्यवहार प्रकरणात परीक्षा विभागाचे माजी आयुक्त सुखदेव डेरे याला अटक केली. याचवेळी जी.ए. सॉफ्टवेअर टेक्नोलॉजी कंपनीच्या बंगलोर येथील कारवाईत पोलिसांनी तत्कालीन संचालक अश्विनकुमार यालाही अटक केली आहे. या अटकेनंतर शिक्षण विभागात चांगलीच खळबळ माजली आहे. या प्रकरणाच्या खोलात जाण्यासाठी या प्रकरणाचा अधिक तपास सुरु असल्याची माहिती पुणे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे.

2018 मध्ये झालेल्या परिक्षेतील गैरव्यवहार प्रकरणाची अमिताभ गुप्ता यांनी माहिती दिली आहे. टीईटी गैरव्यवहार सुखदेव डेरे आणि अश्विनकुमार यांना अटक करण्यात आली आहे. परीक्षा गैरव्यवहार प्रकरणात ५ कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा अंदाज आहेत तर प्रकरणात साधारण ५०० लोकांचा सहभाग असल्याचा आम्हाला प्राथमिक अंदाज आहे. सुखदेव डेरे आणि आश्विनकुमार यांच्या कडे जे लॅपटॉप, पेनड्राईव्ह मधून काही पुरावे आमच्या हाती लागले. त्यावरुन या प्रकरणात त्यांचा सहभाग असल्याचे आढळून आल्यानंतर आम्ही ही कारवाई केली आहे. बाकीच्या आरोपींना टप्प्याटप्प्याने ताब्यात घेऊ, अशी माहिती अमिताभ गुप्ता यांनी अटक केली आहे.

<div class="paragraphs"><p>Ameetabh Gupta&nbsp;</p></div>
राज्यातील नगरपंचायत निवडणूक मतदानाला आजपासून सुरुवात

जी ए सॉफ्टवेअर कंपनीकडे या परिक्षेचे कॉन्ट्रक्ट होते.त्यावेळीही सुखदेव डेरे आणि आश्विनकुमार यांचा यांनी परिक्षेत गैरव्यवहार केल्याचे पुरावे आम्हाला मिळाले आहेत. या आपल्याकडे काही पुरावे आहेत, या पुराव्यांच्या आधार ही कारवाई सुरु असल्याची माहिती यावेळी अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे. या प्रकरणात एकूण आठ गुन्हेगार आहेत. प्रितेशला बंगळूरमध्ये अटक केली आहे. त्यालाही महाराष्ट्रात आणले जात आहे.

दरम्यान, पुणे पोलिसांनी 'टीईटी' प्रकरणी आतापर्यंत महाराष्ट्र परीक्षा मंडळाचे अध्यक्ष तुकाराम सुपे, तांत्रिक सल्लागार अभिषेक सावरीकर यांना अटक केली आहे. त्यातच पोलिसांनी सुपे यांच्या घरावर टाकलेल्या छापेमारी सुमारे 3 ते 4 कोटी रुपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे. पोलिसांच्या तपासामध्ये या गैरव्यवहार प्रकरणात आतापर्यंत बरेच मोठमोठे अधिकारी असल्याची माहिती समोर आली आहे. त्यात आता सुखदेव डेरेंचेही नाव पुढे आले आहे.

दरम्यान, पुणे पोलिसांनी सोमवारी (२० डिसेंबर) सुखदेव डेरेला चौकशीसाठी बोलावले होते. त्याची कसुन चौकशी केल्यानंतर त्यांचाही या गैरव्यवहारात सहभाग असल्याची आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी मंगळवारी सकाळी त्याला अटक केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com