Abhijeet Dipke : अमेरिकेत PM मोदींसोबत मिटींग झाल्याच्या फोटोवर अभिजीत दिपकेंचं स्पष्टीकरण; म्हणाले, "१५ दिवसांपूर्वी मी..."

Abhijeet Dipke rejects Sanjay Raut's claim : "पार्टी काढण्याचा माझा काही हेतू नव्हता, जर तसा माझा प्लॅन असता तर मी तिकडे गेलो नसतो भारतात बसून हे सर्व केलं असतं. पण २ कोटींपेक्षा जास्त लोक एक प्लॅटफॉर्म तयार करतायत तर ते राजकीय पक्षांना काही इशारा देत आहेत आणि त्यांनी तुमच्याकडून आपेक्षा सोडल्या आहेत"
Cockroach Janata Party | Abhijeet Dipke
Abhijeet Dipke rejects Sanjay Raut's claim of a secret Narendra Modi meeting in the US, calling the alleged photo AI-generated.Sarkarnama
Published on
Updated on

Pune News, 11 Jun : कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अमेरिकेत मिटींग झाली आणि या दोघांमधील भेटीनंतरच दिपके भारतात आल्याचं वक्तव्य ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे.

शिवाय आपण दिपके आणि मोदींच्या गुप्त भेटीचे फोटो बघितल्याचा खळबळजनक दावा देखील राऊतांनी केला आहे. आता राऊतांचा हाच दावा अभिजीत दिपके यांनी फेटाळून लावला आहे. "तो फोटो एआय जनरेटेड असू शकतो. मी मोदींना कसं भेटू शकतो? त्यांना भेटण्यासाठी प्रोटॉकॉल असतो, मी एक साधा विद्यार्थी आहे.", अशी प्रतिक्रिया दिपके यांनी दिली आहे.

अभिजीत दिपके नेमकं काय म्हणाले?

'संजय राऊतांना कोणीतरी तुमच्या आणि पंतप्रधान मोदींच्या भेटीचा फोटो पाठवला आहे. शिवाय या फोटोच्या सत्येतेबाबत आताच सांगता येणार नाही', असं राऊत म्हणाल्याचं पत्रकारांनी दिपके यांना सांगताच ते म्हणाले, "अरे बापरे मी आणि मोदी? मला माहिती नाही तो एआय जनरेटेड फोटो असू शकतो. मी मोदींना कसं भेटू शकतो? तुम्हाला प्रोटॉकॉल तुम्हाला माहिती आहेत.मी एक साधा विद्यार्थी आहे. १५ दिवसांपूर्वी मी यूएसमध्ये जॉबसाठी अप्लाय करत होतो.

Cockroach Janata Party | Abhijeet Dipke
Excise Department : गावात हातभट्टी सापडल्यास सरपंच ग्रामसेवक अन् पोलीस पाटील अडचणीत येणार! राज्य उत्पादन शुल्क विभागाचा मोठा निर्णय

अशी पार्टी काढण्याचा माझा काही हेतू नव्हता, जर तसा माझा प्लॅन असता तर मी तिकडे गेलो नसतो भारतात बसून हे सर्व केलं असतं. पण २ कोटींपेक्षा जास्त लोक एक प्लॅटफॉर्म तयार करतायत तर ते राजकीय पक्षांना काही इशारा देत आहेत आणि त्यांनी तुमच्याकडून आपेक्षा सोडल्या आहेत", असं दिपके यांनी म्हटलं आहे.

Cockroach Janata Party | Abhijeet Dipke
Satara MLC Election : जयंत पाटलांनी सातारच्या दोन राजेंवरून महायुतीवर निशाणा साधताच जयकुमार गोरेंचा पलटवार, म्हणाले "त्यांना त्यांच्या घरात कोणी..."

संजय राऊत काय म्हणाले?

"कॉकरोच जनता पार्टीचा संस्थापक अभिजीत दिपके आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अमेरिकेत मिटींग झाली आणि त्या मिटींगनंतरच दिपके भारतात आहेत. या दोघांच्या भेटीचे फोटो मला एका व्यक्तीने पाठवले आहेत. शिवाय मोदींच्या भेटीनंतर दिपके भारतात आल्याचं लोक बोलत आहेत. याबाबतची माहिती आम्ही घेऊ", असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com