Ajit Pawar : "साहेबांचा नंबर झाल्यावर..." बारामती विधानसभेच्या निकालावरून अजितदादांचा शरद पवारांसह बंधू श्रीनिवास पवारांना टोला

Ajit Pawar On Baramati Assembly Election Result : "लोकसभेला कमी जागा आल्यामुळे विधानसभेला 25 टक्के जागा घेतल्या. मी जास्तीच्या जागा मगितल्या नाहीत. सध्या आमचं चांगलं सुरू आहे. पण सरकारला कोणी दृष्ट लावू नये, म्हणून देवगिरीवर काळी बाहुली बांधतो."
Ajit Pawar, Sharad Pawar, Srinivas Pawar
Ajit Pawar, Sharad Pawar, Srinivas PawarSarkarnama
Published on
Updated on

Baramati News, 11 Jan : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सर्वात जास्त लक्षवेधी निवडणूक बारामती (Baramati) विधानसभा मतदारसंघाची ठरली. कारण या मतदारसंघात ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नातू युगेंद्र पवार आणि पुतणे अजित पवार यांच्यात प्रमुख लढत झाली. युगेंद्र पवार या निवडणुकीत अजित पवारांचे प्रतिस्पर्धी असले तरी देखील ही निवडणूक अजित पवार विरुद्ध शरद पवार अशीच होती.

त्यामुळे लोकसभेप्रमाणे बारामतीकर अजित पवारांना (Ajit Pawar) डावलणार की काय? अशा चर्चा राज्यभरात सुरू होत्या. मात्र, बारामतीकरांनी देखील लोकसभेला ताई आणि विधानसभेला दादा या सूत्रानुसार अजित पवारांना लाखाच्या मताधिक्याने विजयी केलं. त्यामुळे 'बारामतीचे दादा' अजित पवारांचं असल्याचं सिद्ध झालं.

मात्र, आता निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन दोन महिने झाल्यानंतर अजित पवारांनी काका शरद पवार (Sharad Pawar) आणि बंधू श्रीनिवास पवार यांना टोला लगावला आहे. "माझ्या भावाला (श्रीनिवास पवार) मी निरोप पाठवला होता, 'माझ्याविरोधात मुलाला उभा करु नकोस' पण त्यांना वाटलं साहेबांच्या मागे बारामती आहे. पण त्यांना काय माहिती की साहेबांच्यानंतर बारामती अजित पवारांच्या मागे आहे", अशी मिश्किल टिप्पणी अजितदादांनी केली.

Ajit Pawar, Sharad Pawar, Srinivas Pawar
Jaydeep Apte : मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरणी जयदीप आपटेला जामीन मंजूर, हायकोर्ट म्हणालं "कुणीही जखमी..."

ते म्हणाले, "माझ्या भागात लोकसभेला आमचा उमेदवार 48 हजारांनी पडला. मी माझ्या भावाला निरोप पाठवला, "अरे माझ्याविरोधात तुझ्या पोराला उभं करू", तर तो, 'अरे नाय बारामती साहेबांच्या मागं आहे', असं मला म्हणाला. त्यावर मी म्हटलं, "आहे की, मी कुठे नाही म्हणतोय. पण, साहेबांचा नंबर झाल्यावर बारामती दादांच्या मागे आहे." म्हणूनच मला लाखांपेक्षा जास्त मतांनी निवडून दिलं. मी आपला गप्प बसलो. सगळं खानदान माझ्याविरोधात प्रचार करत होतं, असं म्हणत अजित पवारांनी शरद पवारांसह पवार कुटुंबियांना डिवचलं.

Ajit Pawar, Sharad Pawar, Srinivas Pawar
Nitesh rane : नितेश राणेंचे ठीक आहे पण संयमी सुरेश खाडेंकडूनही द्वेषांची भाषा...

लाडकी बहीण योजना अजिबात बंद करणार नाही

तसंच "लोकसभेला कमी जागा आल्यामुळे विधानसभेला 25 टक्के जागा घेतल्या. मी जास्तीच्या जागा मगितल्या नाहीत. सध्या आमचं चांगलं सुरू आहे. पण सरकारला कोणी दृष्ट लावू नये, म्हणून देवगिरीवर काळी बाहुली बांधतो", असंही अजित पवार म्हणाले. तर लाडकी बहिणींनी मी मी म्हणाऱ्यांना घरी बसवलं, आता व्यवस्थित कारभार होईल. लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) अजिबात बंद करणार नाही, आधी म्हणायचे दीड हजारात काय होतं? आता दिसलं दीड हजारात काय होते ते, असा टोलाही त्यांनी यावेळी विरोधकांना लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com