Pune News : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावर आले आहेत. आज पुण्यात अजित पवार वेगवेगळ्या विकासकामांची पाहणी आणि आढावा घेणार आहेत. तसेच, कोरोनाबाबत आरोग्य विभागाशीही ते चर्चा करणार आहेत. ते सकाळीच पुण्यात दाखल झाले आहेत. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. (Latest Marathi News)
यावेळी अजित पवारांना शिंदे समितीच्या पदाधिकाऱ्यांवर शासनाचा पैसा खर्च केला जात आहे, असे प्रश्न विचारला गेला. 'शिंदे समितीचे पदाधिकारी आहेत, त्यांना साडेचार लाख रुपये मानधन, बाहेरचे दौरे आणि विमानप्रवासावर खर्च होतोय. जनतेच्या पैशांची उधळपट्टी होत नाही का?'
असा प्रश्न विचारल्यावर अजित पवार म्हणाले, "सर्वसामान्यांच्या पैसा कसा खर्च करायचा, याचं आम्हाला चांगलं ज्ञान आहे. आम्ही हे आजच हे करत नाही. यासंदर्भात एखादी तीव्रता लक्षात घेऊन, कुठल्या गोष्टीला प्राधान्य द्यायचं? यातून राज्याचं हित सांभाळायचं, कायदा सुव्यवस्था सांभाळायची, ही बाब लोकशाही पद्धतीने निवडून आलेलं सरकार घेऊ शकतं."
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
कोरोनाकाळात जनतेने शासनाला उत्तम सहकार्य केले. आता पुन्हा कोव्हीडची परिस्थिती मागच्याएवढी तीव्र नसली तरी काळजी घ्या. आरोग्य विभागाला आवश्यक सूचना दिल्या आहेत. जनतेनेही आता सहकार्य केले पाहिजे. काळजी घेतली पाहिजे. अजूनतरी मास्क वापरण्याच्या सूचना नसल्या तरी, सर्वांनी सतर्कता बाळगली पाहिजे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.