

Baramati, 15 March : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी अपघाती मृत्यूनंतर बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. ही निवडणूक बिनविरोध होणार की निवडणूक लागणार? याची उत्सुकता आहे. तालुक्यातील पवारांच्या पारंपारिक विरोधकांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बारामती (Baramti) पोटनिवडणुकीसाठी येत्या 23 एप्रिल रोजी मतदान होणार असून 4 मे रोजी मतमोजणी होणार आहे. बारामती विमानतळावर 28 जानेवारी रोजी अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला होता. नियमानुसार रिक्त मतदारसंघात सहा महिन्यांत पोटनिवडणूक घ्यावी लागते, त्यानुसार ही पोटनिवडणूक होत आहे.
बारामतीतून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) याच निवडणूक लढवणार, हे जवळपास स्पष्ट आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी अपेक्षा बोलून दाखविल्याने प्रमुख पक्ष आपले उमेदवार या निवडणुकीत उतरविणार नाहीत, असा अंदाज आहे.
अजित पवार यांचे सर्वच राजकीय पक्षांमधील नेत्यांसोबत घनिष्ठ संबंध होते. त्यांच्या अकाली मृत्यूबाबत सर्वच स्तरातील नेत्यांनी हळहळ व्यक्त केली होती. महायुतीतील घटक पक्षांकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना संपूर्ण पाठिंबा आहे, महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष देखील बारामतीत सुनेत्रा पवार यांच्या विरोधात उमेदवार देतील, अशी चिन्हे दिसत नाहीत.
अजित पवार यांनी गेल्या चार दशकांच्या काळात महाराष्ट्राच्या सर्वांगिण विकासासाठी जे काम केले, त्याची दखल घेत सुनेत्रा पवार यांना बारामतीतून विधानसभेत बिनविरोध पाठविण्याबाबत राजकीय एकमत होऊ शकते. या संदर्भात छोटे पक्ष किंवा अपक्ष काय भूमिका घेतात, याकडेच आता प्रामुख्याने लक्ष असेल.
अजित पवार यांच्या बारामतीतीलही प्रमुख पारंपरिक विरोधकांकडून काय भूमिका घेतली जाते, याकडे सर्वांचे लक्ष आहे. त्यांच्या निधनानंतर सर्वच स्तरातील घटकांनी शोक व्यक्त केला होता, त्यामुळे सुनेत्रा पवार यांना बिनविरोध निवडून देण्याबाबत त्यांची काय भूमिका असेल, हे पाहणे महत्वाचे ठरेल.
पार्थ पवार राज्यसभेवर खासदार म्हणून निवडून गेले असल्याने सुनेत्रा पवार याच उमेदवार असतील, हे निश्चित आहे. राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी त्यांनी शपथ घेतलेली असल्याने त्यांना सहा महिन्यांत विधानसभा अथवा विधान परिषद या दोन्हीपैकी एका सभागृहाचे सदस्य व्हावे लागेल, त्या मुळे त्याच उमेदवार असणार हे निश्चित आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.