

Pune News : देशात सध्या कॉकरोच जनता पार्टी चर्चेचा विषय बनली आहे. सोशल मीडियावर तयार झालेल्या या पक्षाने शनिवारी दिल्लीमध्ये केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनाम्याच्या मागणीसाठी मोठ्या प्रमाणात आंदोलन उभारल्याचे पाहायला मिळाले. या पक्षाला सोशल मीडियावर प्रचंड असे समर्थन मिळताना पाहायला मिळत आहे. तर अनेकांनी या पार्टीशी संलग्न होऊन काम करण्याची तयारी दर्शवली आहे. अशातच महाराष्ट्रातील ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी देखील आपण या पक्षाचा पहिला सदस्य होण्यास तयार असल्याचे वक्तव्य केले आहे.
भाजप सरकारने नव्याने मराठा आरक्षणासंदर्भात काढलेल्या जीआरला हाके यांनी प्रचंड असा विरोध केला आहे. याबाबत पुण्यामध्ये त्यांनी माध्यमांशी संवाद साधला लक्ष्मण हाके म्हणाले, 'भाजप नेहमी म्हणत की आमच्या पक्षाचा डीएनए ओबीसी आहे. त्यामुळे त्यांचा डीएनए ओबीसी असेल तर ओबीसीचे आरक्षण वाचवा, नाहीतर तुम्हाला घरी बसवायला आमचा 'जेन जी' तयार आहेत.
एक 'कॉकरोच जनता पार्टी'च्या माध्यमातून अमेरिकेत बसून एका मुलाने आवाज उठवला आणि त्यावर एवढी तरुणाई जर एकत्र आली. आम्ही तर ओबीसी आहोत. आम्ही ५०-६० टक्के लोकसंख्येने आहोत. आमचा ओबीसी एकत्र आला, तर येथील सत्ताधाऱ्यांना, येथील कारखानदारांना, भांडवलदारांना आम्ही घरी बसवू, असा इशारा हाके यांनी दिला.
हाके पुढे म्हणाले, 'मुख्यमंत्री फडणवीस, अजून वेळ गेलेली नाही. निवडणुकीपूर्वी आम्ही जाहीर भूमिका घेत तुम्हाला मदत केली. पण तुम्ही आम्हा ओबीसींना जर वाऱ्यावर सोडणार असाल, तर आमच्याकडे सुद्धा मताचे बटन असून मताचा अधिकार आम्हाला आहे. त्यामुळे आम्ही तुम्हाला निवडणुकीमध्ये बघून घेऊ, असे हाके यांनी इशारा दिला.
कॉक्रोच जनता पार्टीला तुमचे समर्थन आहे का? असे विचारले असता हाके म्हणाले, आमचे समर्थन असू का असू नये? २००० सालानंतर जन्माला आलेल्या म्हणजे २५-२६ वर्षांच्या या जेन जीला सिव्हिक सेन्स असेल त्याला येथील संविधानाबद्दल थोडीशी अस्मिता असेल, त्याला रिझर्व्हेशन पॉलिसीबद्दल रिस्पेक्ट असेल, तर त्या 'कॉकरोच जनता पार्टी'चा पहिला सदस्य व्हायला लक्ष्मण हाके तयार आहे.
त्यासोबतच येत्या काळात जर तरुणाई अशा पद्धतीने एकत्र येत असेल, तर येथील प्रस्थापितांना धडा शिकवायला कुठला कारखानदार येणार नाही, कुठला विरोधी पक्ष येणार नाही, तर आम्ही तरुणाईच्या मदतीने येथील व्यवस्थेला आम्ही घरी बसवू, असेही लक्ष्मण हाके म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.