Marathi film controversy: माझ्यावर पाळत ठेवली जातेय; दीपाली सय्यद यांचा गंभीर आरोप, वादग्रस्त चित्रपट चर्चेत

Maharashtra Epstein File News : महाराष्ट्रामध्ये नाशिकमधील भोंदू बाबा खरात याचे प्रकरण गाजत असतानाच आता या प्रकरणावर एक चित्रपट येणार असल्याचे सांगितले जात आहे.
deepali sayyad
deepali sayyad Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : महाराष्ट्रामध्ये नाशिकमधील भोंदू बाबा खरात याचे प्रकरण गाजत असतानाच आता या प्रकरणावर एक चित्रपट येणार असल्याचे सांगितले जात आहे. या चित्रपटात अभिनेत्री दिपाली सय्यद या माजी महिला आयोगाचे अध्यक्ष रूपाली चाकणकर त्यांची भूमिका साकारणार असल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर दीपाली सय्यद यांनी आज पुण्याचे ग्रामदैवत श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले. "माझा आगामी प्रोजेक्ट माझ्या हातून चांगला व्हावा, असे मागणे मी बाप्पाच्या चरणी मागितले आहे," अशी भावना त्यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केली.

सध्या दीपाली सय्यद (Dipali Sayyad) यांच्या आगामी 'महाराष्ट्र एप्सटीन फाईल' या चित्रपटावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. या चित्रपटात दीपाली सय्यद मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारत असून, चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच राजकीय वर्तुळात आणि समाजमाध्यमांवर यावरून जोरदार चर्चा सुरू आहेत. कारण त्या रूपाली चाकणकर यांची भूमिका या चित्रपटात वटवणार असल्याचे देखील सांगितले जात आहे.

deepali sayyad
Maharashtra Politics Update: दिवसभरात देश-विदेशात काय राजकीय घडामोडी घडल्या? जाणून घ्या एका क्लिकवर

राजकीय दबाव आणि धमकीचे फोन

चित्रपटाबाबत बोलताना दीपाली सय्यद यांनी अत्यंत खळबळजनक खुलासा केला आहे. त्या म्हणाल्या, "या चित्रपटातील एक पात्र काही बड्या राजकीय व्यक्तींशी साधर्म्य दाखवणारे असल्याने मला सध्या धमकीचे फोन येत आहेत आणि मोठा राजकीय दबावही टाकला जात आहे. काही महिला नेत्यांनी मला ही भूमिका न करण्याची थेट ताकीद दिली आहे. इतकेच नाही तर माझ्यासोबत काम करणाऱ्या लोकांना माझे लोकेशन विचारून माझ्यावर पाळत ठेवली जात आहे."

deepali sayyad
Maharashtra News Live Update : खरात प्रकरणात मोठी अपडेट; शिर्डी पोलिसांनंतर आता ईडी प्रतिभा चाकणकरांची चौकशी करणार

..तरीही चित्रपट करणारच!

धमक्यांना भीक न घालता आपल्या भूमिका करण्यावरती ठाम असल्याचे दिपाली सय्यद यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, "चित्रपट येण्याआधीच एवढ्या चर्चा आणि वाद सुरू आहेत, त्यामुळे आता मी हा चित्रपट शंभर टक्के करणारच. मी अशा धमक्यांना अजिबात घाबरत नाही." चित्रपटातील कलाकारांविषयी बोलताना त्या म्हणाल्या, "या चित्रपटात हिरोईन मी आहे, पण हिरो कोण असावा हे अजून ठरलेले नाही. ज्या खऱ्या व्यक्तीवर हे पात्र आधारित आहे, तसाच हुबेहूब हिरो शोधण्याचे काम सध्या सुरू आहे."

deepali sayyad
Maharashtra News Live Update : खरात प्रकरणात मोठी अपडेट; शिर्डी पोलिसांनंतर आता ईडी प्रतिभा चाकणकरांची चौकशी करणार

नाशिक प्रकरणावर आधारित चित्रपट

हा चित्रपट नाशिकमध्ये घडलेल्या एका संपूर्ण प्रकरणावर आधारित असून, ते सत्य महाराष्ट्रासमोर आणण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे. "अशा प्रकारच्या भोंदू बाबांवर आजही लोक विश्वास ठेवतात, हे अत्यंत दुर्दैवी आहे. या विषयाचा सखोल अभ्यास करावा लागणार आहे. कारण यात अनेक जण अडकलेले असून, काही बड्या राजकीय नेत्यांचाही यात समावेश आहे." या वादामुळे 'महाराष्ट्र एप्सटीन फाईल' या चित्रपटाविषयीची उत्सुकता आता कमालीची वाढली आहे.

deepali sayyad
Ashok Kharat Cinema: भोंदू खरातवर सिनेमा, त्यात चाकणकरांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीला धमकीचे फोन; कोण आहेत दीपाली सय्यद?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com