Fortuner Car Theft : आलिशान गाडीतून आले अन् सरपंचाची फॉर्च्युनर घेऊन पळाले; चोरी 'सीसीटीव्ही'मध्ये कैद

Ex Sarpanch Koregaon Bhima Fortuner Car : पुणे जिल्ह्यात माजी सरपंचाची फॉर्च्युनर कार घेऊन चोरटे पळाल्याचा सीसीटीव्ही समोर आला आहे.
CCTV captures the moment when ex-sarpanch’s Fortuner car was stolen in Koregaon Bhima.
CCTV captures the moment when ex-sarpanch’s Fortuner car was stolen in Koregaon Bhima. sarkarnama
Published on
Updated on

Pune News : ग्रामीण भागात पूर्वी राजकीय मंडळ ही स्टेट्‍स सिंबल म्हणून स्कॉर्पिओ गाडीची खरेदी मोठ्या प्रमाणात करत होते. मात्र, बदलत्या राजकारणासोबत ग्रामीण भागात फॉर्च्यूनर गाडी ही राजकीय नेत्यांसाठी स्टेट्‍स सिंबल बनली आहे. त्यामुळे सरपंच देखील या गाडीतून तालुक्याच्या ठिकाणी येताना पाहण्यास मिळतात. त्यातच चोरट्यांच्या निशाण्यावर सुद्धा ही गाडी असल्याचे दिसून आले आहे. अशीच काहीशी घटना पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा परिसरात घडली असल्याचा समोर आले आहे.

पुणे जिल्हातील कोरेगाव भीमा परिसरातून आज (गुरुवार) पहाटेच्या सुमारास कोरगाव भीमा गावच्या माजी सरपंचाची आलिशान टोयोटा फॉर्च्युनर कार (MH 12 TH 9955) अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे. विशेष म्हणजे ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

ही घटना यशराज टॉवर परिसरात कोरेगाव भीमा–पुणे नगर रोडवर पहाटेच्या सुमारास घडली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन ते तीन चोरटे एका किया कार (MH 25 AS 1199) मधून येताना आणि नंतर माजी सरपंचांची संदीप ढेरंगे फॉर्च्युनर घेऊन निघून जाताना दिसत आहेत.

CCTV captures the moment when ex-sarpanch’s Fortuner car was stolen in Koregaon Bhima.
Eknath Shinde Satara Tour : सातारा दौऱ्यात एकनाथ शिंदेंनी डाव टाकला; पृथ्वीराजबाबांना धक्का देत काँग्रेसच्या तीन नेत्यांना गळाला लावले

प्राथमिक तपासात पोलिसांना समजले आहे की, चोरट्यांनी अगोदरच परिसराची रेकी केली होती. त्यांनी गाडी पार्क केलेली जागा आणि वेळेचे निरीक्षण करून अगदी काही मिनिटांत कार उचलली. गाडीमध्ये अत्याधुनिक सुरक्षा लॉकिंग सिस्टीम असूनही, चोरट्यांनी इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या साहाय्याने ती सहज सुरू केली, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

CCTV captures the moment when ex-sarpanch’s Fortuner car was stolen in Koregaon Bhima.
Maharashtra Politics : निवडणुकीआधी शेकापने फोडला धक्कादायक बॉम्ब! पनवेलच्या नव्या यादीतच दुबार मतदारांचा महा स्कॅम?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com