MLC Election : पुण्यातून कोण अर्ज मागे घेणार? फितुरी रोखण्याचे आव्हान; सणस, खांडेकर, बांगर, त्रिगुणाईत यांच्या भूमिकेकडे लक्ष!

Pune Graduate And Teachers Constituency Election : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या आश्‍विनी कदम यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे. तसेच शिवसेनेचे अधिकृत उमेदवारासह अपक्षांना अर्ज मागे घेण्यासाठी तयार करण्याचे मोठे आवाहन भाजपसमोर असणार आहे.
Pune Graduate Teachers MLC Election 2026
Graduate Teachers Constituency Election 2026 nomination withdrawal dateSarkarnama
Published on: 
Updated on: 

Pune News : विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मंगळवारी (ता.6) शेवटचा दिवस होता. पक्षांनी अधिकृत उमेदवार जाहीर केले. मात्र, महायुतीमध्ये फूट पडल्याचे चित्र आहे. महाविकास आघाडीमध्ये देखील बंडखोरी झाली आहे. शिवाय अपक्ष म्हणून मैदानात उतरणाऱ्यांची संख्या देखील अधिक आहे. यामध्ये फितुरी रोखण्याचे आव्हान सर्वाच पक्षांसमोर आहे. 9 तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत.

शिक्षक मतदारसंघासाठी काँग्रेसकडून विद्यमान आमदार जयंत आसगावकर यांनी अर्ज दाखल केला. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या आश्‍विनी कदम यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे. कदम यांची समजूत काढण्याची जबाबदारी महाविकास आघाडीतील नेत्यांवर असणार आहे.

शिवसेनेत बंडखोरी

महायुतीमध्ये ही जागा भाजपकडे असल्याची चर्चा होती. मात्र, शिक्षक मतदारसंघातून भाजपपाठोपाठ शिवसेनेही उमेदवारी दिली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मंगेश चिवटे यांनी पक्षाकडून अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र, उपमुख्यमंत्री शिंदेंचा पाठिंबा असल्याचा दावा करत सहसंपर्क प्रमुख सुदर्शना त्रिगुणाईत यांनीही आपला अर्ज दाखल केला. तसेच उद्योगमंत्री सामंत यांचे स्वीय सहायक सचिन सानप यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यामुळे शिवसेनेचे अधिकृत उमेदवारासह अपक्षांना अर्ज मागे घेण्यासाठी तयार करण्याचे मोठे आवाहन भाजपसमोर असणार आहे.

भाजप सावध...

पदवीधर मतदारसंघात भाजपच्या अधिकृत उमेदवार स्मिता पाटील-जाधव यांच्या विरोधात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे सचिन बांगर, राणी सुजीत खुर्चे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर, महाविकास आघाडीत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील शिवाजी खंडेकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर भाऊसाहेब आंधळकर यांनीदेखील अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. भाजपने बंडखोरांना थांबवण्यासाठी अॅक्शन प्लॅन तयार केला असून मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे निवडणुकीच्या प्रभारीपदाची धुरा सोपविली आहे. तर प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे यांची निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com