Sonai Dairy FDA Raid: पुणे जिल्ह्यातील एक नामांकित ब्रँड असलेल्या सोनाई डेअरीवर अन्न व औषध प्रशासनाने मोठी छापेमारी केल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, इतर कारवायांबाबत तत्परतेने माहिती देणाऱ्या एफडीएकडून या अत्यंत महत्त्वाच्या कारवाईची माहिती अजूनही सार्वजनिक करण्यात न आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या पार्श्वभूमीवर एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी प्रतिक्रिया दिली असून, "कारवाई पूर्ण झाल्यानंतरच आम्ही अधिकृत माहिती देऊ," असे स्पष्ट केले आहे.
मुख्यमंत्र्यांच्या पुणे दौऱ्यादरम्यान गुप्त भेट
ही सर्व घडामोडी सुरू असतानाच, दुसरीकडे काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुणे दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान सोनाई ग्रुपचे संचालक आणि इंदापूर तालुक्यातील भाजप नेते प्रवीण माने यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली आहे. या भेटीचे नेमके कारण अद्याप अधिकृतपणे समोर आलेले नसले तरी, सोनाई डेअरीवर झालेल्या एफडीएच्या कारवाईच्या पार्श्वभूमीवरच ही भेट झाल्याची जोरदार चर्चा रंगली आहे.
विशेष म्हणजे या भेटीदरम्यान प्रवीण माने यांच्यासोबत दौंडचे आमदार राहुल कुल आणि माजी आमदार संग्राम थोपटे हे देखील उपस्थित होते.
प्रवीण माने यांनी विधानसभा निवडणुकीनंतर भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला होता. इंदापूर तालुक्यातील एक महत्त्वाचे आणि वजनदार नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यामुळे त्यांनी घेतलेल्या भेटीमध्ये वेगवेगळी कारणं चर्चिली जात आहेत. त्यामध्ये ही भेट डेअरीवरील कारवाईतून दिलासा मिळवण्यासाठी होती की यामागे इतर काही राजकीय गणितं आहेत, याबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत.
तुकाराम मुंढेंच्या आदेशाने कारवाई
मिळालेल्या माहितीनुसार, एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानंतरच सोनाई डेअरीवर ही छापा टाकण्याची कारवाई करण्यात आली आहे. अत्यंत गोपनीय पद्धतीने ही कारवाई सुरू असल्याने प्रशासनाकडून अद्याप कोणताही अधिकृत अहवाल किंवा पत्रक प्रसिद्ध करण्यात आलेले नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.