Kasba By-Election : कसब्यात प्रचारासाठी स्वत: अमित शाह उतरणार?

Amit Shah : कार्यक्रमाला राजकीय सभेचे स्वरूप!
Amit Shah : Kasba By-Election : Hemant Rasane
Amit Shah : Kasba By-Election : Hemant Rasane Sarkarnama
Published on
Updated on

Kasba By-Election : पुणे पोटनिवडणुकीच्या प्रचारात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) उतरणार असल्याची माहिती हाती येत आहे. १८ व १९ फेब्रुवारी रोजी शाह हे पुण्यात दाखल होणार आहेत. मोदी अॅट ट्वेंटी या पुस्तकाच्या प्रकाशन आणि शिवसृष्टी कार्यक्रमामध्ये ते सहभागी होणार असल्याची माहिती मिळत आहे. यामुळे आता ते कसबा आणि चिंचवड विधानसभा निवडणुकीसाठी सभा व प्रचार करणार का? याबबत चर्चा होऊ लागली आहे.

देशाच्या एका भागतील पोट-निवडणुकीच्या प्रचारात केंद्रीय गृहमंत्र्यानी स्वत: उतरावं खरंतर हे आश्चर्यकारक आहे. मात्र यातून हे ही दिसतं की, पोटनिवडणुकी सारख्या छोट्या निवडणुकीला ही भाजप किती गांभार्याने घेत आहे. पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड या दोन्ही मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली असून , येत्या २६ फेब्रुवारीला येथे मतदान पार पडणार आहे.

Amit Shah : Kasba By-Election : Hemant Rasane
Kasba News : पाठिंबा कुणाला मनसेचे ठरेना: धंगेकर म्हणतात, तिथे तर सारे माझे मित्रच!

मोदींवर आधारित पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाला शाह जरी येत असले तरी, या कार्यक्रमाचं स्वरूप एका राजकीय सभेसारखं असण्याची शक्यता आहे. १९ फेब्रुवारीला शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पेतून शिवसृष्टी साकारण्यात आली आहे. या कार्यक्रमात शाह सहभागी होणार आहेत.

१९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती उत्सव आहे. शिवजयंतीभोवती आपला प्रचार केंद्रित करायचा प्रयत्न भाजप प्रयत्न आहे. याच माध्यमातून भाजप मतदारांना मतांचं आवाहन करण्यात येणार आहे. अमित शहांचं दौऱ्यासाठी शिवजयंतीचं औचित्य भाजपनं निवडणुकीसाठी साधलं आहे.

Amit Shah : Kasba By-Election : Hemant Rasane
Chinchwad by-election : चिंचवडमध्ये अजूनही सस्पेन्स कायम; ठाकरेंचा निरोप घेऊन अहिर कलाटेंना भेटणार...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com