MLC election: पदवीधर-शिक्षक मतदारसंघाचं जागावाटप ठरलं? पुणे-नागपूर भाजपला, अमरावती शिवसेनेकडे; संभाजीनगर राष्ट्रवादीला?

Mahayuti seat sharing in Maharashtra MLC election 2026: पुणे पदवीधर व शिक्षक, नागपूर औरंगाबाद यां पदवीधर तर अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी महायुतीमध्ये प्रचंड चुरस निर्माण झाली आहे.
Mahayuti seat sharing in Maharashtra MLC election 2026
Mahayuti seat sharing in Maharashtra MLC election 2026sarkarnama
Published on: 
Updated on: 

Kolhapur News: राज्यातील विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांची तारीख नुकतीच जाहीर झाली. त्यानंतर राजकीय पक्षांच्या मध्ये मॅरेथॉन बैठका सुरू आहेत. पुणे पदवीधर व शिक्षक, नागपूर, औरंगाबाद हे पदवीधर तर अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी महायुतीत प्रचंड चुरस आहे. त्यामुळे उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांनी आतापासूनच मुंबई गाठत नेत्यांकडे पूर्ण ताकतीनिशी फिल्डिंग लावली आहे. जागा वाटपासंदर्भात प्राथमिक चर्चा पूर्ण झाली आहे. मात्र महायुतीची समन्वय बैठक झाल्यानंतरच निर्णय होणार आहे. पण तिन्ही पक्षांकडून उमेदवारी जोरदार मोर्चे बांधणी सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी भाजप आणि शिवसेनेकडून दावा केला जात आहे. मात्र यात शिवसेनेची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. विद्यमान आमदार किरण सरनाईक यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानं राजकीय समीकरणं बदलली आहेत. सरनाईक यांनी मागील निवडणुकीत अपक्ष राहून विजय मिळवला होता.

Mahayuti seat sharing in Maharashtra MLC election 2026
Shalarth ID Scam: हजारहून अधिक शिक्षकांची भरती, पण एकही मूळ फाइल नाही! हायकोर्टानं शिक्षण विभागाला झाप झाप झापलं

नागपूर पदवीधर मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला समजला जातो. राष्ट्रवादी किंवा शिवसेनेचीही फारशी ताकद नसल्याने साहजिकची ही जागा भाजपकडे जाईल, असा अंदाज व्यक्त होत आहे. मागील निवडणुकीत काँग्रेसचे अभिजित वंजारी यांनी भाजपाच्या संदीप जोशी यांचा पराभव करून भाजप-जनसंघाच्या दीर्घकाळच्या वर्चस्वाला धक्का दिला होता. त्यामुळे पुन्हा या मतदारसंघावर वर्चस्व मिळविण्यासाठी भाजपाकडून मतदार नोंदणी आणि संघटनात्मक बांधणीवर भर दिला जात आहे. माजी आमदार सुधाकर कोहळे आणि अनिल सोले यांच्या नावांची चर्चा आहे.

Mahayuti seat sharing in Maharashtra MLC election 2026
Maharashtra Drought 2026: दुष्काळ जाहीर, आता मदत कधी? पंचनामा ते GPS सर्वेक्षण; GR मध्ये सगळं स्पष्ट

छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघासाठी भाजप व राष्ट्रावादीमध्ये चुरस आहे. राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण यांनी 2020 मध्ये सलग तिसऱ्यांदा विजय मिळविला होता. यंदा त्यांनी पुन्हा शड्डू ठोकला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने आपला दावा कायम ठेवला असला तरीही भाजपाकडून मतदार नोंदणीसह संघटनात्मक तयारीवर भर दिला आहे. भाजपाकडून एम. के. देशमुख आणि किरण पाटील हे इच्छुक आहेत. मात्र ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सुटण्याची शक्यता आहे.

पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघावरून राष्ट्रवादी भाजप आणि शिवसेनेत अंतर्गत स्पर्धा सुरू आहे. शिक्षक मतदारसंघासाठी शिवसेना आणि भाजपने दावा केला आहे. तर पदवीधरसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये चुरस आहे. विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्यकारी संचालक कौस्तुभ गावडे हे भाजपकडून इच्छुक आहेत. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ओएसडी आणि आरोग्य दूत मंगेश चिवटे हे शिवसेनेकडून इच्छुक आहेत.

पुणे पदवीधरमध्ये विद्यमान आमदार अरुण लाड यांचे चिरंजीव शरद लाड यांची भाजपकडून उमेदवारी निश्चित झाल्याचे समजते. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून भैया माने हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची घोषणा मंत्री मुश्रीफ यांनी केली आहे. मात्र हे दोन्ही मतदारसंघ भाजपला सुटणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे घटक पक्षातील उमेदवारांची भूमिका काय असणार? हे महत्त्वाचे आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com