Malegaon President Election : माळेगाव कारखाना अध्यक्षपदाची निवडणूक तहकूब, नेमकं कारण काय? सुनेत्रा पवारांची निवड लांबणीवर!

Sunetra Pawar Malegaon Sugar Factory President : माळेगावच्या नवनिर्वाचित संचालिका तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार या प्रथमच संस्था प्रतिनिधी ब वर्ग मतदारसंघातून संचालक झाल्यानंतर बैठकीस उपस्थित राहिल्या.
Malegaon Sugar Factory .
Sunetra Pawar declared unopposed director of Malegaon Cooperative Sugar Factory during special board meeting in Baramati.Sarkarnama
Published on
Updated on

Malegaon News : राज्याच्या सहकार क्षेत्रात अग्रगण्य मानल्या जाणाऱ्या माळेगाव सहकारी साखर कारखाना अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी बोलाविण्यात आलेली संचालक मंडळाची महत्त्वाची बैठक तहकूब करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी वैभव नावडकर यांची प्रकृती अचानक बिघडल्याने ही सभा पुढे ढकलण्यात आल्याची अधिकृत माहिती देण्यात आली.

दिवंगत लोकनेते अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर कारखान्याच्या अध्यक्षपदाची जागा रिक्त झाली होती. त्या पार्श्वभूमीवर नवीन अध्यक्षाची निवड करण्यासाठी आज रविवारी बैठक आयोजित करण्यात आली होती. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार अध्यक्षपदी असतील, हे स्पष्ट झाले होते. मात्र, प्रांताधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे निवडणूक प्रक्रिया राबविता आली नाही. पुढील तारखेची घोषणा लवकरच करण्यात येणार असल्याचे कार्यकारी संचालक अशोक पाटील यांनी सांगितले.

दरम्यान, माळेगावच्या नवनिर्वाचित संचालिका तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार या प्रथमच संस्था प्रतिनिधी ब वर्ग मतदारसंघातून संचालक झाल्यानंतर आजच्या बैठकीस उपस्थित राहिल्या. त्यांनी संचालक मंडळातील सदस्यांची ओळख करून घेत कारखान्याच्या कामकाजाची माहिती जाणून घेतली.सध्या सुरू असलेल्या गाळप हंगामाचा आढावा घेताना साखर कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांवरही त्यांनी चर्चा केली. कार्यकारी संचालक अशोक पाटील यांनी कारखान्याच्या आर्थिक स्थिती, गाळप क्षमता आणि साखर उत्पादनाबाबत सविस्तर माहिती दिली.

Malegaon Sugar Factory .
Israel Iran War : इराण-इस्रायल संघर्षाचा भडका; तणावपूर्ण स्थितीत भारतीय दूतावासांकडून हेल्पलाईन जारी

बैठकीस उपाध्यक्षा संगीता कोकरे, ज्येष्ठ संचालक बाबासाहेब तावरे यांच्यासह संचालक मंडळाचे सदस्य उपस्थित होते. तसेच छत्रपती सहकारी साखर कारखाना अध्यक्ष पृथ्वीराज जाचक व सोमेश्वर सहकारी साखर कारखाना अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांचीही उपस्थिती होती. दुसरीकडे, माळेगावच्या अध्यक्षपदाच्या निवडीकडे संपूर्ण सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे. पुढील बैठकीत अध्यक्षपदाची धुरा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे देणार आहे, असे संचालक मंडळाने पत्रकारांशी बोलताना जाहीर केले.

Malegaon Sugar Factory .
Eknath Khadse : 'अवैध वाळू उपसा व्यवसायाला सरकारचे संरक्षण असल्यानेच प्रशासन कारवाई करण्यास घाबरते...'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com