Pune politics: मनसे, ठाकरे सेनेची पुण्यात वाजली टाळी; महाविकास आघाडीची मात्र आळी मिळी गुपचिळी

Maharashtra political News : पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील नेते आणि मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची आज चाय पे चर्चा झाली.
Raj-Thackeray & Uddhav-Thackeray
Raj-Thackeray & Uddhav-ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Pune News : आगामी पुणे महापालिका निवडणुकीमध्ये मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची युती होणार असल्याचे जवळपास आता निश्चित मानले जात आहे. या दृष्टीकोनातून दोन्ही पक्षांकडून आता पावले उचलली जात असून त्याचाच पहिला टप्पा म्हणून रविवारी दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी अनौपचारिक भेटीगाठी केल्या.

पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील नेते आणि मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची आज चाय पे चर्चा झाली. ठाकरे सेनेच्या कार्यालयात ही बैठक पार पडली. यावेळी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, अशोक हरणावळ, वसंत मोरे, प्रशांत बधे तर मनसेचे शहरप्रमुख साईनाथ बाबर, बाबू वागस्कर, बाळा शेडगे आदी उपस्थित होते.

Raj-Thackeray & Uddhav-Thackeray
Pune BJP : भाजपकडून मुलाखतीची 'दिखावेगिरी', आधीच उमेदवार ठरले, यादी देखील तयार! इच्छुक 'गॅसवर'!

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे सेनेची आणि मनसेची युती होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. त्याच पार्श्वभूमीवर पुणे महापालिका निवडणुकीसाठी दोन्ही पक्षांची पावले पडू लागली आहेत. ठाकरे सेनेच्या कार्यालयात पदाधिकाऱ्यांची भेट झाल्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यामध्ये मनसेच्या कार्यालयात ठाकरे सेनेचे पदाधिकारी जाऊन बैठक घेणार आहेत.

Raj-Thackeray & Uddhav-Thackeray
Shivsena News : शिवसेनेच्या तंबूत भाजप अन् मनसे इच्छुकांची घुसखोरी,अर्जही घेतले! चार तासांत पाचशे फाॅर्म संपले

येत्या बुधवारी ही बैठक होणार असून या बैठकीत दोन्ही पक्षांमध्ये कुठल्या प्रभागात कोणाचे पारडे जड आहे, याचा विचार करून दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये जागावाटपावर चर्चा होणार आहे. मात्र, एकीकडे बुधवारी या दोन्ही पक्षांमध्ये जागा वाटपाची चर्चा होणार असतानाच दुसरीकडे उद्या म्हणजे सोमवारी महाविकास आघाडीची बैठक होणार आहे.

Raj-Thackeray & Uddhav-Thackeray
Pune NCP : महापालिका निवडणुकीसाठी अजितदादांच्या राष्ट्रवादीचं टार्गेट लाडकी बहीण नव्हे तर 'Gen Z'

या महाविकास आघाडीच्या बैठकीला मनसेला निमंत्रण देण्यात आले नसून ठाकरे सेनेचे पदाधिकारी मात्र या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे एकीकडे ठाकरे सेना मनसेची चर्चा करत असतानाच दुसरीकडे महाविकास आघाडीची देखील चर्चा करत असल्याचे पाहायला मिळत आहे.

Raj-Thackeray & Uddhav-Thackeray
Congress Politics : आणखी एका राज्यात काँग्रेसची सत्ता पक्की? ‘या’ निवडणुकीत भाजपसह विरोधकांना दिला झटका

आगामी काळामध्ये मनसेला महाविकास आघाडी घेण्यास काँग्रेसचा विरोध कायम राहिल्यास अशावेळी ठाकरे सेना महाविकास आघाडीसोबत जाणार की मनसे सोबत युती करणार हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा टाकणार आहे. मात्र तूर्तास तरी ठाकरे सेनेकडून दोन्ही दगडांवर पाय ठेवण्यात आले असल्याचे पाहायला मिळत आहे.

Raj-Thackeray & Uddhav-Thackeray
Mahayuti government: महायुती सरकारच्या कारभारावर विरोधकांचा हल्लाबोल; शेतकरी, भ्रष्टाचार आणि महिलांवरील अत्याचारांच्या मुद्द्यावरून घेरले

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com