Shirur Assembly: शिरूरमध्ये बंडखोरीचे पीक जोमात; अजितदादा, फडणवीसांची डोकेदुखी वाढली

Maharashtra Assembly Election 2024: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने माऊली कटके यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. कटके यांच्या उमेदवारीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी विरोध दर्शवला असून शांताराम कटके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
Devendra Fadnavis-Ajit Pawar
Devendra Fadnavis-Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Pune, 29 October : पुणे जिल्ह्यातील शिरूर-हवेली विधानसभा मतदार संघात महायुतीमध्ये बंडखोरी झाली आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील शांताराम कटके यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उमेदवारी नाकारल्याने नाराजी व्यक्त करत कटके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, तर दुसरीकडे भाजपचे प्रदीप कंद हेही बंडखोरीच्या तयारीत आहेत.

शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघात (Shirur Haveli Constituency) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून विद्यमान आमदार अशोक पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने माऊली कटके यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. कटके यांच्या उमेदवारीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी विरोध दर्शवला असून शांताराम कटके यांनी उमेदवार अर्ज दाखल केला आहे.

शांताराम कटके हे वाघोली गावचे माजी उपसरपंच आहेत. त्यांनी मोठे शक्तिप्रदर्शन करत वाघोली ते शिरुरपर्यंत समर्थक कार्यकर्त्यांसह भव्य रॅली काढून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, त्यामुळे शिरूर हवेलीत तुल्यबळ लढत होण्याऐवजी महायुतीमध्ये (Mahayuti) झालेली बंडखोरी ही डोकेदुखी ठरणार आहे.

Devendra Fadnavis-Ajit Pawar
Solapur Mahayuti : ‘आम्ही शिंदेनिष्ठच; पण भाजपला धडा शिकविण्यासाठी निवडणूक लढविणार’: शिंदेसेनेच्या जिल्हाप्रमुखांचा हल्लाबोल

दरम्यान, शिरूर हवेली मतदार संघातून भाजपचे नेते प्रदीप कंद हे देखील अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, त्यामुळे शिरुर विधानसभेची निवडणूक रंगतदार होणार आहे. शिरूरसाठी महायुतीची उमेदवार अजित पवार यांनी जाहीर करताच अनेकांनी नाराजी व्यक्त करून बंडखोरीचे हत्यार उपसले आहे.

Devendra Fadnavis-Ajit Pawar
Pandharpur Politics : शरद पवार पंढरपुरात कोणाच्या हाती देणार तुतारी?; भाजप नेत्याचीही चर्चा!

शिरूर हवेली मतदारसंघातील बंडखोरीमुळे महायुतीच्या नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे. या स्थानिक बंडखोर नेत्यांची बंडखोरी शमवण्याचे मोठे आव्हान उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर उभे ठाकले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com