Ajit Pawar : धसांनी उल्लेख केलेल्या ‘बडी मुन्नी’बाबत अजित पवारांचं भाष्य; म्हणाले, असल्या फालतू...

Suresh Dhas Politics Maharashtra political news : सुरेश धस हे सातत्याने मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधत आहेत. त्यामुळे बीडमधील राजकारण ढवळून निघाले आहे.
Ajit Pawar, Suresh Dhas
Ajit Pawar, Suresh DhasSarkarnama
Published on
Updated on

Pune News : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्याचं राजकारण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणामध्ये भाजप आमदार सुरेश धस यांनी सुरुवातीपासूनच आक्रमक भूमिका घेतली असून सातत्याने ते या प्रकरणाबाबत नवनवीन खुलासे करत आहेत. अशातच त्यांनी ‘राष्ट्रवादीतील बडी मुन्नी’ असा उल्लेख केला आहे. त्यामुळे सुरेश धस हे उल्लेख करत असलेली अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील ही बडी मुन्नी कोण? याबाबत सर्वत्र चर्चा सुरू आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यामध्ये पत्रकारांशी बोलताना यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी आज पुण्यामध्ये प्रशासकीय बैठक घेत विविध प्रकल्पांचा आढावा घेतला. तसेच विकासकामांबाबत प्रशासनाला सूचना देखील केल्या. यानंतर माध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी विविध बाबींवर भाष्य केलं.

Ajit Pawar, Suresh Dhas
Lamborghini Car in Mantralaya : मंत्रालयात आलेल्या लॅम्बोर्गिनी कारचं गुढ वाढलं; एका मंत्र्यांचं नाव चर्चेत

सुरेश धस यांच्याकडून राष्ट्रवादीची बडी मुन्नी असा उल्लेख करण्यात आला आहे. याबाबत विचारलं असता अजित पवार म्हणाले, बडी मुन्नी कोण ते त्यांना विचारा. असल्या फालतू गोष्टींवर मी बोलणार नाही. मी नाव घेऊन बोलणारा व्यक्ती आहे. त्यामुळे ही बडी मुन्नी कोण आहे, ते तुम्ही सुरेश धस यांनाच विचारा, असं अजित पवार म्हणाले. तसेच मी सुरेश धस यांच्या बाबतीत बावनकुळे आणि मुख्यमंत्र्यांना जे सांगायचे ते सांगितले आहे. काय तो योग्य निर्णय घेतील, असं देखील अजित पवार यांनी स्पष्ट केलं.

पुण्यामध्ये वाढत चाललेल्या गुन्हेगारी बाबत बोलताना अजित पवार म्हणाले, सरकार पोलिसांना इतक्या चांगल्या सुविधा देत असताना कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न का निर्माण होत आहे, ही चिंतेची बाब आहे. हे शहराच्या पोलीस प्रमुखाचे हे अपयश आहे. तुम्हाला जमत नसेल तर तसं सांगा, असं म्हणत त्यांनी पुण्यातील पोलीस आयुक्तांना इशारा दिला. तसंच वेळ पडल्यास पुण्यातील माणूस बदलू, असं म्हणत त्यांनी पुण्यातील पोलीस आयुक्त बदलाबाबतचे संकेतही दिले.

Ajit Pawar, Suresh Dhas
Maharashtra Politic's : शरद पवारांचे सात खासदार राष्ट्रवादीत येणार?; तटकरेंच्या फोनबाबत अजितदादांचे भाष्य

बीड प्रकरण आणि धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, बीड प्रकरणाची वेगवेगळ्या यंत्रणांकडून चौकशी सुरु आहे. कोण कुणाशी, कुठल्या पक्षाशी संबंधित आहे, याचा विचार केला जाणार नाही. जो दोषी असेल त्यांना पाठीशी घालणार नाही. त्यांना कठोरात कठोर शिक्षा होईल, यासाठी प्रयत्न करू, असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं.

छगन भुजबळ यांच्या नाराजीबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, छगन भुजबळ हा आमचा पक्षअंतर्गत विषय आहे. त्यावर आम्ही मार्ग काढू. असं अजित पवारांनी यांनी सांगितलं. तसंच दोन्ही पवार एकत्र येणार का? याबाबत मी काही उत्तर देणार नसल्याचे सांगत आम्ही आमचं पाहून घेऊ, असंही अजित पवार म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com