Maharashtra Politic's : शरद पवारांचे सात खासदार राष्ट्रवादीत येणार?; तटकरेंच्या फोनबाबत अजितदादांचे भाष्य

NCP Political News : खासदार नीलेश लंके, अमर काळे आणि अजून कोणीतरी माध्यमांन प्रतिक्रिया दिलेली आहे. आमच्याशी खासदार सुनील तटकरे किंवा अन्य कोणीही संपर्क साधलेला नाही आणि तुम्ही म्हणता की अजित पवारांनी केलं. पण, तीच लोकं म्हणत आहेत की तसं काही झालेलं नाही तर मोकळेच कशाकरीता आरोप करायचे
Sharad Pawar-Sunil Tatkare-Ajit Pawar
Sharad Pawar-Sunil Tatkare-Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Pune, 09 January : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील खासदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करावा, यासाठी प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी संबंधित खासदारांना फोन केल्याच्या बातमीने महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. खुद्द सुप्रिया सुळे यांनी खासदार प्रफुल पटेल यांना फोन करून नाराजी व्यक्त केल्याचे सांगितले जात आहेत. तटकरेंनी कथित फोनबाबत आणि खासदारांच्या प्रवेशाबाबत खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच मोठे भाष्य केले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी महापालिका अधिकारी आणि पोलिस प्रशासन यांची पुण्यात बैठक घेतली. त्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना अजितदादांनी विविध विषयांवर भाष्य केले. शरद पवार यांच्या पक्षातील खासदारांना सुनील तटकरे यांनी फोन केल्याबाबतचा प्रश्न विचारण्यात आला होता. तो मध्येच तोडत अजित पवार म्हणाले, तुम्ही धांदात खोटं बोलत आहात. तीन ते चार खासदारांचा बाईट मी स्वतः ऐकला आहे.

खासदार नीलेश लंके, अमर काळे आणि अजून कोणीतरी माध्यमांना प्रतिक्रिया दिलेली आहे. आमच्याशी खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) किंवा अन्य कोणीही संपर्क साधलेला नाही आणि तुम्ही म्हणता की अजित पवारांनी केलं. पण, तीच लोकं म्हणत आहेत की तसं काही झालेलं नाही तर मोकळेच कशाकरीता आरोप करायचे, असा सवालही अजित पवार यांनी उपस्थित केला.

Sharad Pawar-Sunil Tatkare-Ajit Pawar
Ajit Pawar PC : पुणे पोलिसांना अजितदादांनी जाहीररित्या फटकारले; ‘तुम्हाला जमत नसेल तर पद सोडा...’

शरद पवार यांच्या पक्षातील खासदार स्वतः सांगत आहेत की, आमच्याशी कोणीही संपर्क केलेला नाही. ते खासदार वीस ते बावीस लाख लोकांचं प्रतिनिधीत्व करतात, असेही पवार यांनी स्पष्ट केलं.

Sharad Pawar-Sunil Tatkare-Ajit Pawar
Ajit Pawar PC : बबनदादा, अशोक पवारांच्या भेटीचे अजित पवारांनीच सांगितले कारण....

धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर अजित पवार काय म्हणाले?

संतोष देशमुख खूनप्रकरणी एसआयटी, सीआयडी आणि न्यायालयीन चौकशी सुरू आहे. जो कोणी दोषी आहे, हे सिद्ध झाल्यास त्याच्यावर कारवाई केली जाईल. पक्ष न बघता जो कोणी दोषी असेल तर कोणाचीही गय करण्याची आवश्यकता नाही, हे मी मुख्यंत्र्यांना सांगितले आहे. अशा घटना आम्ही खपवून घेणार नाही. सरकारने या प्रकरणात गांभीर्याने लक्ष घातले आहे. या प्रकरणात कोणालाही मोकळं सोडलं जाणार नाही. पुरावे दिले तर कितीही मोठा असला तरी आम्ही कडक कारवाई करू, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com