Pune News : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार ) गटाच्या कर्जत येथे झालेल्या मंथन शिबिरात खासदार प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर हल्लाबोल करत "माझ्याकडे बोलण्यासाठी अनेक मुद्दे आहेत. भविष्यात मीदेखील पुस्तक लिहिणार असून, त्यावेळी मी माझी बाजू मांडणार असल्याचे सांगितले होते. पटेलांच्या त्या आगामी पुस्तकावर भाष्य करताना पवारांनी थेट मी वर्मावरच घाव घातला आहे. मी त्यांच्या पुस्तकाची वाट पाहत असून, पटेलांनी पुस्तकात ईडी अधिकारी दिल्ली, मुंबईतील घरी का आले होते? याचा खुलासा करावा, असा खोचक सल्ला पटेल यांना दिला होता.
कर्जतच्या शिबिरात उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांनी शरद पवारांवर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे हल्लाबोल केल्याचे पाहायला मिळाले. यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी पुण्यामध्ये आमदार-खासदारांची बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. या वेळी एकनाथ खडसे, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड आदी नेते उपस्थित होते. या वेळी अजित पवार गटाने केलेल्या आरोपांबाबत शरद पवारांनी आपल्या खास शैलीत समाचार घेतला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
या वेळी प्रफुल्ल पटेल यांच्या पुस्तकाबाबत प्रश्न विचारला असता, शरद पवार म्हणाले, पटेलांच्या पुस्तकाची मी वाट बघतोय. प्रफुल्ल पटेलांकडे पुस्तक लिहिण्यासाठी अनेक मुद्दे आहेत. पटेलांनी लोक पक्ष सोडून का जातात, यावर त्यांनी पुस्तक लिहावं. ईडीच्या कारवाईवरही पुस्तक लिहावं आणि त्यात ईडी अधिकारी घरी का आले हेही लिहावं, असा सल्ला देत टीका केली.
या पत्रकार परिषदेदरम्यान अनिल देशमुख यांना अजित पवार आणि हसन मुश्रीफ यांनी केल्या विधानांबाबत विचारलं असता देशमुख म्हणाले, ज्यांनी मला फसवलं (भाजप) त्यांच्यासोबत मला जायचं नव्हतं. आमच्यासोबत चला म्हणून माझ्या घरी हसन मुश्रीफ पाच तास बसून होते. मला पाहिजे ते मंत्रिपद द्यायलासुद्धा तयार होते, असा दावा अनिल देशमुख यांनी केला.
(Edited By Sudesh Mitkar)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.