Nitesh Rane Gogawale tea offer : 'मर्डर'चा उल्लेख करणाऱ्या गोगावलेंना नितेश राणेंनी दिली चहाची ऑफर, म्हणाले, 'त्यांचे ज्ञान...'

Gogawale murder remark News : शिवसेनेचे नेते भरत गोगावले यांनी भाजप नेते नारायण राणे यांच्याबाबत खळबळजनक वक्तव्य केले आहे.
bharat gogavle, nitesh rane
bharat gogavle, nitesh rane Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेतृत्व करत असलेल्या शिवसेनेचे नेते भरत गोगावले यांनी भाजप नेते नारायण राणे यांच्याबाबत खळबळजनक वक्तव्य केले आहे. राणे यांनी अनेक भानगडी केल्या, मर्डर केले. त्यामुळे ते या उंचीवर पोहोचले आहेत, असे खळबळजनक विधान भरत गोगावले यांनी केले होते. या विधानानंतर भाजप नेते आणि नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांनी भरत गोगावले यांना उत्तर दिले आहे.

कुडाळ पावशी येथे शनिवारी सायंकाळी शिंदे यांच्या शिवसेनेचा (Shivsena) सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकर्ता मेळावा बैठक पार पडली. या बैठकीला कोकणातील शिंदे यांच्या सेनेचे अनेक दिग्गज नेते उपस्थितीत होते. या बैठकीदरम्यान बोलताना भरत गोगावले म्हणाले, 'नारायण राणे राजकारणात एवढ्या उंचीवर सहजासहजी गेलेले नाहीत. त्यांनी अनेक भानगडी केल्या, तुरुंगात गेले, मर्डर केले,' असे खळबळजनक विधान गोगावले यांनी केले होते.

bharat gogavle, nitesh rane
Raj-uddhav Thackeray : ठाकरे बंधूंच्या युतीबाबत मोठी अपडेट; मनसे-उद्धव ठाकरे सेनेच्या ‘या’ दोन बड्या नेत्यांची भेट, बंद दराआड नेमकी काय झाली चर्चा?

दरम्यान, रविवारी नितेश राणे (Nitesh Rane) हे पुणे दौऱ्यावर होते. त्यांनी या दौऱ्या दरम्यान पुण्यातील जगन्नाथ यात्रेला त्यांनी उपस्थिती लावली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. नितेश राणे म्हणाले, 'या कार्यक्रमाला आमंत्रण दिले आणि आरतीचा मला मान मिळाला, याबाबत मी आयोजकांचे आभार मानतो.'

bharat gogavle, nitesh rane
Uddhav Thackeray protest : उद्धव ठाकरे उतरले रस्त्यावर; जीआरची होळी करत म्हणाले, 'सक्ती आम्ही...'

भगवतगीतेमध्ये ताकद आहे. गीता कधीही कोणाचाही द्वेष करणे शिकवत नाही. धर्मांतर करून स्वतःचा धर्म वाढवा, असे गीतेमध्ये लिहिलेले नाही. त्यामुळे गीतेचा प्रचार प्रसार सगळीकडे झाला पाहिजे. मग तो मोहल्यांमध्ये झाला तर त्या ठिकाणच्या लोकांच्या विचारात देखील परिवर्तन होईल आणि आपले हिंदू राष्ट्र अधिक भक्कम होईल, असे नितेश राणे म्हणाले.

bharat gogavle, nitesh rane
BJP Vs NCP : निवडणुकीच्या आधीच रणधुमाळी! भाजप-राष्ट्रवादी आमने सामने; मुश्रीफांच्या दाव्याने महायुतीत मिठाचा खडा?

भरत गोगावले यांनी केलेला विधानाबाबत विचारले असता नितेश राणे म्हणाले, 'मी त्यांचे भाषण ऐकलेले नाही. मात्र, नारायण राणे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले आहेत. मर्डर केसबाबतचे कोणतेही पोलीस रेकॉर्ड नाही. कदाचित गोगावले यांना पूर्ण माहिती नसेल. त्यामुळे आज चहापाण्याच्या निमित्ताने ते जेव्हा माझ्या शेजारी उभे असतील. तेव्हा थोडा चहा त्यांना माझ्यावतीने देतो आणि त्यांच्या ज्ञानात भर टाकतो.'

bharat gogavle, nitesh rane
BJP new state president : पक्षनेतृत्वानं दाखवला मोठा भरवसा; मित्रपक्षाला भिडणाऱ्या भाजपच्या नव्या प्रदेशाध्यक्षांना आता गियर बदलावा लागणार

नारायण राणे यांनी शिवसेना वाढवली. नारायण राणे हे शिवसेनेच्या प्रत्येक शिवसैनिकाबरोबर राहिले म्हणूनच बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना मुख्यमंत्री केले. गोगावले हे त्यांचे जुने सहकारी आहेत. मात्र, कदाचित त्यांना संपूर्ण माहिती नसेल ते मला भेटल्यानंतर मी त्यांच्या ज्ञानात भर टाकेल, असा टोला नितेश राणे यांनी लगावला.

bharat gogavle, nitesh rane
Narayan Rane : 'बाप' काढणाऱ्या नितेश राणेंना बापानेच फटकारले; नारायण राणे म्हणाले‚...

हा देश बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने चालतो संविधानानुसार कोणतीही मर्डर केस नारायण राणे यांच्यावर नाही. त्यामुळे हे राजकीय आरोप-प्रत्यारोप हे असेच सुरू असतात, असेही नितेश राणे म्हणाले.

bharat gogavle, nitesh rane
Uddhav Thackeray Politics : उद्धव ठाकरेंची नाशिकमध्ये मोठी खेळी, 'मामांना' पद देऊन बागूलांना थांबवलं..

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com