Pimpri-Chinchwad : भाजप आमदारांसह शिवसेनेच्या खासदाराचा स्वच्छतेच्या उपक्रमात सहभाग; पण राष्ट्रवादीच्या आमदाराची दांडी

BJP-Shivsena-NCP: चाळीस हजार नागरिकांनी एका तासात उद्योगनगरी केली चकाचक, आमदार,खासदारांनीही हातात घेतला झाडू
BJP-Shivsena-NCP, MLA, MP
BJP-Shivsena-NCP, MLA, MP Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Pimpri News: गांधी जयंतीच्या पूर्वसंध्येला देशभर राबविण्यात आलेल्या एक तास स्वच्छतेच्या उपक्रमात पिंपरी-चिंचवडमध्ये चाळीस हजार नागरिकांनी सहभाग घेतला. शहरातील भाजपचे तिन्ही आमदार, शिवसेनेचा एक खासदार त्यात सहभागी झाले होते. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) खासदार डॉ.अमोल कोल्हे आणि याच पक्षाचे (अजित पवार गट) पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे, मात्र, महापालिकेच्या या मोहिमेत न दिसल्याने त्याची चर्चा झाली.

भाजप, शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादी असे सर्वपक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपला एक तास शहर स्वच्छतेसाठी दिला. शहराचे खासदार शिवसेनेचे मावळचे श्रीरंग बारणे, भाजपच्या विधानपरिषद सदस्या उमा खापरे, चिंचवडच्या आमदार अश्विनी जगताप, भोसरीचे महेश लांडगे यांनी हातात झाडू घेऊन स्वच्छता केली. मात्र, या मोहिमेत सामील व्हा असा व्हिडिओ बनवून त्याव्दारे शहरवासियांना तसे आवाहन केलेले आमदार बनसोडे हे त्यात दिसले नाहीत.

BJP-Shivsena-NCP, MLA, MP
Hatkanangle Politics : शेट्टींचे 'एकला चलो रे', राष्ट्रवादीची वेगळीच चाचपणी; 'इंडिया'चा उमेदवार ठरेना ?

तसेच खासदार कोल्हे यांचीही अनुपस्थिती जाणवली. त्यामुळे सर्वपक्षीय सहभागी झालेल्या या अराजकीय कार्यक्रमातील त्यांच्या गैरहजेरीची चर्चा झाली. शरद पवार हे आज शिरुरच्या दौऱ्यावर होते. त्यात आळंदीपासून खासदार कोल्हे हे सामील झाल्याने त्यांना या मोहिमेत भाग घेता आला नसल्याचे समजते.

मात्र, आमदार बनसोडे का सहभागी झाले नाही, हे कळू शकले नाही. कारण त्यांच्याशी याबाबत संपर्क करण्याचा प्रयत्न करुनही तो झाला नाही. पक्षाच्याच नाही, तर महापालिकेच्याही कार्यक्रमाला ते उपस्थित राहत नसल्याची त्यांच्याच पक्षात अगोदरच चर्चा आहे.

BJP-Shivsena-NCP, MLA, MP
Supriya Sule News : सुप्रिया सुळेंच्या निशाण्यावर शिंदे अन् फडणवीस; म्हणाल्या, " दिल्लीतील अदृश्य शक्तीनं..."

दरम्यान, या मोहिमेत सामील झालेल्यांनी स्वच्छता राखण्याची शपथही घेतली. पिंपरी-चिंचवड शहर हे स्वच्छ सुंदर शहर करण्याच्या दृष्टीकोनातून महापालिका सतत प्रयत्नशील असून त्यासाठी सर्व शहरवासियांचा सहभाग आवश्यक असल्याचे मत आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी यावेळी व्यक्‍त केले.

तसेच आजच्या स्वच्छता उपक्रमात हजारोंच्या संख्येने सहभागी झाल्याबद्दल त्यांनी नागरिकांचे तसेच लोकप्रतिनिधींचे आभार मानले. शहरातील आठही क्षेत्रीय कार्यालयनिहाय हा उपक्रम तेथील स्थानिक आजी, माजी लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत घेण्य़ात आला.

त्यात विद्यार्थी, शिक्षक, महिला बचतगट, स्वच्छतादूत तसेच अधिकारी, कर्मचारी, अशासकीय व शासकीय संस्था, औद्योगिक कंपन्या, रिक्षा संघटना, टपरी, पथारी हातगाडी संघटना, फेरीवाले, धार्मिक संस्था, गणेश मंडळे, पर्यावरण प्रेमी, ज्येष्ठ नागरिक संघ, व्यावसायिक, स्वयंसेवी संस्था आदींनी सक्रीय सहभाग नोंदविला आणि शहर स्वच्छतेचा संदेश दिला.

Edited By- Ganesh Thombare

BJP-Shivsena-NCP, MLA, MP
Supriya Sule News : सुप्रिया सुळेंच्या निशाण्यावर शिंदे अन् फडणवीस; म्हणाल्या, " दिल्लीतील अदृश्य शक्तीनं..."

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.