Ravi Landge : भाजप महापौरांकडून नियमांचे जाहीरपणे धिंडवडे : स्वतःच शेअर केला फोटो; फडणवीस सरकार पावती फाडणार?

Ravi Landge : पिंपरी-चिंचवडचे महापौर रवी लांडगे यांनी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर वाहन थांबवून फोटो काढला. हे नियमभंग प्रकरण चर्चेत आले असून कारवाईची मागणी होत आहे
Pimpri-Chinchwad mayor Ravi Landge clicks photos on Mumbai-Pune Expressway bridge, sparking controversy over traffic rule violation.
Pimpri-Chinchwad mayor Ravi Landge clicks photos on Mumbai-Pune Expressway bridge, sparking controversy over traffic rule violation.Sarkarnama
Published on
Updated on

Ravi Landge : यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील 'कनेक्टिंग लिंक' (मिसिंग लिंक) प्रकल्पाचे नुकतेच लोकार्पण झाले. त्यानंतर या मार्गावर प्रवासी आणि पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. प्रकल्पातील भव्य केबल स्टेड ब्रिज आणि आधुनिक बोगदे प्रवाशांचे आकर्षण ठरत आहेत. त्यामुळे काही प्रवासी येथे वाहने थांबवून सेल्फी, फोटो आणि रिल्स काढत असल्याचे निदर्शनास आले होते.

मात्र महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने येथे वाहने थांबवण्यास सक्त मनाई केली आहे. हा द्रुतगती मार्ग असून येथे वाहने थांबवण्यास सक्त मनाई आहे. वेगाने येणाऱ्या वाहनांमुळे भीषण अपघाताचा धोका संभवतो. याच पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने केवळ फोटोसाठी स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात घालू नका, असे प्रवाशांना आवाहन केले आहे.

त्यानंतरही अनेक प्रवासी या नियमांचं उल्लंघन करत असल्याचं दिसून येतं आहे. यात भाजपचेच पिंपरी-चिंचवडचे महापौर रवी लांडगे यांनीही येथे थांबून काढलेले फोटो शेअर केले आहेत. ते मुंबईला बैठकीसाठी निघाले होते. त्यावेळी त्यांनी केबल स्टेड ब्रिजवर गाडी थांबवून, खाली उतरवून फोटो काढला आहे. आता त्यांच्यावरही कारवाई होणार का? असा सवाल विचारला जात आहे.

Pimpri-Chinchwad mayor Ravi Landge clicks photos on Mumbai-Pune Expressway bridge, sparking controversy over traffic rule violation.
Sanjay Raut on BJP : मोदी-शाहांना दुसरं काय काम? मित्रपक्ष म्हणून ‘निवडणूक आयोग’ तयारच; पश्चिम बंगालच्या कलांवर संजय राऊतांचा घणाघात!

कनेक्टिंग लिंक हा प्रकल्प प्रवासाचा वेळ वाचवण्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी बनवला आहे. येथे पर्यटन करणे अपघाताला निमंत्रण देणारे ठरू शकते. या प्रकल्पातील दोन्ही बोगदे आणि केबल स्टेड ब्रिजवर २४x७ सीसीटीव्ही यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या गाड्यांचे क्रमांक तात्काळ नोंदवून त्यांच्यावर महामार्ग पोलिसांमार्फत दंडात्मक कारवाई केली जात आहे.

Pimpri-Chinchwad mayor Ravi Landge clicks photos on Mumbai-Pune Expressway bridge, sparking controversy over traffic rule violation.
Nashik Mhada Scam : तहसीलदार नितीन पाटलांना अटक, मुख्यमंत्री फडणवीसांच्या घोषणेनंतर पोलिसांना आली जाग, तब्बल 150 कोटींचा घोटाळा?

MSRDCने प्रवाशांसाठी दिलेल्या महत्त्वाच्या सूचना

1. महामार्गावर कोठेही वाहन थांबवू नका.

2. बोगद्यात किंवा पुलावर सेल्फी, रिल्स काढणे कायद्याने गुन्हा आहे.

3. वेगमर्यादेचे उल्लंघन करू नका.

4. तातडीची मदत लागल्यास महामार्ग पोलिसांच्या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधा.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com