PCMC Standing Committee : पिंपरी-चिंचवड स्थायी समिती सदस्यांच्या नावांची घोषणा, अध्यक्षपदासाठी बारणे-कस्पटेंमध्ये चुरस!

PCMC BJP NCP : भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून स्थायी समितीच्या सदस्यांची नावे जाहीर केले आहेत. शिवसेनेकडून स्थायी समितीच्या सदस्यांमध्ये सुलभा उबाळे यांना संधी मिळाली आहे.
PCMC
PCMCSarkarnama
Published on
Updated on

PCMC News : पिंपरी-चिंचवड महापौर आणि उपमहापौर निवडीनंतर विषय समित्यांवर कोणाला संधी मिळणार याची उत्सुकता होती. स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी देखील मोर्चे बांधणी केली जात होती. अखेर शुक्रवारी स्थायी समितीच्या सदस्यांची नावे भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून जाहीर करण्यात आली. वरिष्ठ नगरसेवकांनी विषय समित्यांमध्ये काम करण्यास फारशी उत्सुकता न दाखवल्याने भाजपकडून नवीन चेहऱ्यांना संधी दिल्याचे चित्र आहे.

भाजपकडून स्थायी समितीमध्ये अभिषेक बारणे , शालिनी गुजर, मनीषा चिंचवडे,संदीप कस्पटेबाबासाहेब त्रिभुवन, सारीका गायकवाड, योगिता नागरगोजे, कृष्णा सुरकुले, शीतल वर्नेकर, अर्चना करांडे,मधुरा शिंदे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

भाजपची सदस्यांची नावे पाहाता अध्यक्षपदासाठी अभिषेक बारणे आणि संदीप कस्पटे यांच्यातील एकाला पसंती मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर, ऐनवेळी भाजप नवीन चेहरा देखील पुढे करू शकते, असा देखील अंदाज वर्तवला जात आहे.

शिवसेनेकडून स्थायी समितीच्या सदस्यांमध्ये सुलभा उबाळे यांना संधी मिळाली आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेसकडून सविता आसवानी, संतोष कोकणे, संदीप वाघेरे,विकास साने यांना संधी देण्यात आली आहे.

PCMC
Raigad Politics : ZP वरुन महायुतीत जुंपली, हॉटेल पॉलिटिक्सवर गोगावलेंचा भाजप-राष्ट्रवादीला टोला; म्हणाले, 'सदस्य फुटायची भीती...'

विधी समितीमधील सदस्य

भाजप

ज्ञानेश्वर जगताप

विनायक गायकवाड

कुंदा भिसे

सुजाता बोराटे

श्रुती डोळस

कुशाग्र कदम

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

शेखर चिंचवडे

वर्षा जगताप

तुषार सहाणे

शहर सुधारण समिती

भाजप

अर्चना सस्ते

विनोद नढे

कुणाल वाव्हळकर

संजय (नाना) काटे

सुहास कांबळे

उत्तमराव केंदळे

राष्ट्रवादी काँग्रेस

डॉ. वैशाली घोडेकर - लोंढे

अनंत कोऱ्हाळे

वैशाली काळभोर

क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती

भाजप

कैलास कुटे

शाम जगताप

तानाजी बारणे

धर्मपाल तंतरपाळे

उदय गायकवाड

योगेश लांडगे

राष्ट्रवादी काँग्रेस

भाऊसाहेब भोईर

जितेंद्र ननावरे

प्रमोद कुटे

शिक्षण समितीमधील सदस्य

भाजप

पल्लवी वाल्हेकर

श्रुती वाकडकर

रविना अंघोळकर

कविता भोंगाळे

रीटा सानप

सारिका बोऱ्हाडे

राष्ट्रवादी काँग्रेस

प्रियांका कुदळे

योगिता बारणे

यश साने

PCMC
Briyani Scam News: संपूर्ण देश हादरला...! बिर्याणीची ऑर्डर अन् सुमारे 70 हजार कोटींच्या महाघोटाळ्याचा पर्दाफाश

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com