Tukaram Mundhe: आता थांबायचं नाय! अन्न व औषधात भेसळ आढळल्यास तुकाराम मुंडेंकडं करा थेट तक्रार! टोल फ्री क्रमांक अन् ई-मेल जारी

Tukaram Mundhe toll free number for complaints: IAS अधिकारी तुकाराम मुंढे हे सध्या अन्न व प्रशासन आयुक्त म्हणून कामकाज पाहत आहेत. दहा दिवसांपूर्वी या विभागात त्यांची बदली झाली आहे, त्यानंतर लगेचच त्यांनी कामाचा धडाका सुरु केला आणि कोट्यवधींचा माल जप्त करत शेकडो जणांना अटकही केली आहे. त्यांच्या या कारवाईमुळं भेसळ करणाऱ्यांचं धाबं दणाणलं आहे.
Tukaram Mundhe food adulteration complaint
Tukaram Mundhe food adulteration complaintSarkarnama
Published on
Updated on

FDA Maharashtra helpline number: IAS अधिकारी तुकाराम मुंढे हे सध्या अन्न व प्रशासन आयुक्त म्हणून कामकाज पाहत आहेत. दहा दिवसांपूर्वी या विभागात त्यांची बदली झाली आहे, त्यानंतर लगेचच त्यांनी कामाचा धडाका सुरु केला आणि कोट्यवधींचा माल जप्त करत शेकडो जणांना अटकही केली आहे.

त्यांच्या या कारवाईमुळं भेसळ करणाऱ्यांचं धाबं दणाणलं आहे. यानंतरही आता ही कारवाई अधिक तीव्र होणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. त्यासाठी त्यांनी आता जनतेला थेट तक्रार करण्याचं आवाहन केलं आहे. यासाठी टोल फ्री क्रमांक आणि ई-मेल आयडी शेअर करण्यात आला आहे.

Tukaram Mundhe food adulteration complaint
Recruitment 2026 : नोकरी हवीये? मग ही बातमी तुमच्यासाठीच! जूनमधील 8 मोठ्या भरती अंतर्गत 46,500+ पदांसाठी सुवर्णसंधी, पाहा डिटेल्स...

अनेकदा आपल्या आजूबाजूला अन्नभेसळ सुरू असते, याची माहिती असते, पण याबाबत कुठे तक्रार करायची आणि कशी करायची याची नागरिकांना माहिती नसते. त्यामुळं अनेक प्रकरणं उजेडातही येत नाहीत. त्यामुळंच आता आयुक्त मुंढे यांनी नागरिकांना थेट त्यांच्याकडेच तक्रार करण्यासाठी एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करुन दिला आहे.

Tukaram Mundhe food adulteration complaint
Congress news : दक्षिणेत काँग्रेसमध्ये फूट; शिवकुमारांच्या शपथविधीला दांडी, बड्या नेत्याने वादग्रस्त मुद्यालाच घातला हात

टोल फ्री अन् ई-मेल

टोल फ्री क्रमांक तसंच ई-मेलद्वारे नागरिकांना अन्नातील आणि औषधातील भेसळीबाबत थेट तुकाराम मुंढे यांच्याकडंच तक्रार नोंदवता येणार आहे. या माध्यमातून थेट मेसेज करण्याचं आवाहन त्यांनी जनतेला केलं आहे. तसंच अशा प्रकारच्या संशयास्पद प्रकारांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे.

Tukaram Mundhe food adulteration complaint
Marathwada Shivsamvad tour: निवडणुकीच्या नादात 22 गुंठे जमीन विकली, भाजप उमेदवाराकडून पराभव; संकटात सापडलेल्या शिवसैनिकाला मदतीचा हात

मुंढेंनी आव्हान स्विकारलं

अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाचा कारभार हाती घेतल्यानंतर अन्न आणि औषधांमधील मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या गैरप्रकारांविरोधात किंवा भेसळीविरोधात कठोर कारवाया करण्याचं सर्वात मोठं आव्हान त्यांच्यासमोर होतं.

हे आव्हान आता तुकाराम मुंढे यांनी स्विकारलं असून तक्रारी आल्यानंतरही त्याला उशीर किंवा त्यांची दखल टाळली जाण्याचे प्रकार लक्षात घेता, थेट फोनद्वारे आणि फोन न उचलला गेल्यास ई-मेलद्वारे तक्रार स्विकारण्यास त्यांनी सुरुवात केली आहे.

Tukaram Mundhe food adulteration complaint
Shivsena Crises : कोल्हापूरच्या शिवसेना आमदाराच्या मुलाचा कॅसिनोत जुगार खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल; उद्धव ठाकरेंच्या जिल्हाध्यक्षाकडून राजीनाम्याची मागणी

परिपत्रकात नेमकं काय म्हटलंय?

"नागरिकांना शुद्ध आणि सुरक्षित अन्न मिळणे हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे. भेसळ, निकृष्ट दर्जाचे अन्न किंवा प्रतिबंधित पदार्थांचे उत्पादन व विक्री आढळल्यास यापुढे आणखी कठोर कारवाई करण्यात येईल,” असा स्पष्ट इशारा अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे. अन्नपदार्थांच्या दर्जाबाबत शंका असल्यास नागरिकांनी अन्न व औषध प्रशासनाशी संपर्क साधावा. यासाठी स्वतंत्र तक्रार नोंदणी अॅप विकसित करण्यात आले आहे.

– टोल फ्री क्रमांक : १८००२२२३६५

– ई-मेल : jc-foodhq@gov.in

तक्रार करताना नाव, पत्ता, संपर्क क्रमांक, संबंधित आस्थापनेचा अचूक पत्ता आणि कोणत्या अन्नपदार्थात भेसळ होत असल्याची माहिती नमूद करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com