Pune NCP News: पुण्यात मोठी राजकीय घडामोड! राष्ट्रवादी लवकरच हादरणार? अजितदादांचा कट्टर समर्थक माजी आमदार भाजपच्या वाटेवर

Pune NCP News: दिलीप मोहिते व त्यांचे समर्थक कार्यकर्ते, पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. जिल्हा परिषद गटात, पंचायत समिती निवडणुकीवेळी झालेल्या काही पक्षप्रवेशांमुळे दिलीप मोहिते आणि त्यांच्या समर्थकांमध्ये अस्वस्थता वाढली होती.
Ajit Pawar- BJP
Ajit Pawar- BJP Sarkarnama
Published on
Updated on

Pune News: राज्यातील राहुरी आणि बारामतीच्या पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. याचदरम्यान, राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकीकडे कोल्हापुरात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मोठा फटका बसला आहे. समरजित घाटगेंनी पुन्हा घरवापसी करत भाजपप्रवेश केला आहे. याचदरम्यान,आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीला पुणे जिल्ह्यात मोठा हादरा बसण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे खेडचे माजी आमदार आणि अजित पवारांचे कट्टर समर्थक दिलीप मोहिते पाटील भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून पुणे जिल्ह्याच्या राजकारणात जोरदारपणे सुरू आहे. या चर्चांना आता मोठं बळ मिळालं आहे.

कारण पुण्यात मोहिते पाटलांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये यावेळी सुमारे तासभर चर्चा झाली. या भेटीचा चर्चेचा तपशील समोर आला नसला,तरी मोहिते पाटील भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

पुण्यातील एका खासगी कार्यक्रमात भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांची भेट झाली. त्यांच्यात झालेल्या चर्चेनंतर माजी आमदार दिलीप मोहिते भाजपच्या वाटेवर आहेत का अशा चर्चांना तालुक्यात उधाण आले होते.याबाबत माजी आमदार दिलीप मोहिते म्हणाले, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व आम्ही सभागृहात एकत्र काम केलेले आहे. त्यामुळे ते माझे चांगले मित्र आहेत. माझ्या एका नातेवाईकाचा कार्यक्रम होता. त्यामुळे मी तिथे गेलो होतो, आमची चर्चा झाली. परंतु मी भाजपात प्रवेश करणार नसल्याचं मोहिते पाटील यांनी म्हटलं आहे.

Ajit Pawar- BJP
Baramati By Election: बारामती पोटनिवडणुकीत धक्कादायक ट्विस्ट, काँग्रेसच्या नव्या गौप्यस्फोटामुळे खळबळ; 'भाजपनं आमच्याशी संपर्क...'

मात्र, पुणे जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीदरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विश्वासात न घेतल्याचा आरोप करत माजी आमदार दिलीप मोहिते यांच्यासह त्यांच्या समर्थकांमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे. त्यामुळे आगामी काळात मोहिते पाटील वेगळा निर्णय घेण्याची दाट शक्यता वर्तवली जात होती.

पण त्याचदरम्यान, माजी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अपघाती निधन झाल्यामुळे राष्ट्रवादी शोकसागरात बुडाली होती.पण आता राजकीय हालचालींनी पुन्हा वेग पडकल्याचं दिसून येत आहे.

पुणे जिल्ह्यातील खेड आळंदी मतदारसंघात सध्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा आमदार आहे. यामुळे आगामी 2029 च्या विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवत दिलीप मोहिते पाटील यांच्याकडून भाजप प्रवेशासाठी जोरदार प्रयत्न सुरू केल्याचं पाहायला मिळत आहे. मोहिते पाटलांसारख्या मुत्सद्दी,अनुभवी आणि दांडगा जनसंपर्क असलेल्या नेत्याच्या पक्षप्रवेशामुळे या मतदारसंघात भाजपची ताकद वाढण्याची शक्यता आहे.

Ajit Pawar- BJP
Jayant Patil Setback : सांगली बाजार समितीचे त्रिभाजन! भाजपचा महाविकास आघाडीला जोरदार धक्का; पडळकरांकडून 'करेक्ट कार्यक्रमा'ची परतफेड

महाराष्ट्र विधानसभेच्या 2024 च्या निवडणुकीत खेड-आळंदी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) दिलीप मोहिते पाटील यांचा पराभव झाला होता. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या बाबाजी काळे यांनी त्यांचा धक्कादायकरित्या पराभव केला होता. मोहिते पाटील यांना 98,409 मते, तर विजयी काळे यांना 1,50,152 मते मिळाली होती. या पराभवानंतरही त्यांनी कार्यकर्त्यांना धीर दिला आहे.

दिलीप मोहिते व त्यांचे समर्थक कार्यकर्ते, पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. जिल्हा परिषद गटात, पंचायत समिती निवडणुकीवेळी झालेल्या काही पक्षप्रवेशांमुळे दिलीप मोहिते आणि त्यांच्या समर्थकांमध्ये अस्वस्थता वाढली होती.

Ajit Pawar- BJP
Baramati ByPoll: मोठी बातमी! बारामतीत काँग्रेस उमेदवारासाठी वंचितही करणार प्रचार; 'या' अटीवर थेट प्रकाश आंबेडकरांना...

याबाबत दिलीप मोहिते पाटील यांनी तत्कालीन उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यावर टीका करतानाच आम्हाला विश्वासात न घेता ते प्रवेश देत असल्याचं म्हटलं होतं. या पक्षप्रवेशामुळे कार्यकर्ते, पदाधिकारी नाराज होत असून निवडणुकीत उमेदवारीचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे मी कार्यकर्त्यांना काय उत्तर देणार असल्याचा मुद्दाही त्यांनी मांडला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com