

Pune News : वरिष्ठ आयएएस अधिकारी आणि अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याशी जवळचे संबंध असल्याचे भासवून शासकीय कामे करून देण्याचे आमिष दाखवणाऱ्या पुण्यातील एका नामांकित डॉक्टरवर कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. डॉ. हिमांशू अजवाणी (वय 48, रा. पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित डॉक्टरचे नाव आहे.
नेमकं प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. हिमांशू अजवाणी यांनी एका व्हॉट्सअॅप ग्रुपवर एक मेसेज पाठवला होता. या मेसेजमध्ये त्यांनी स्वतःची ओळख 'अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांचे वैयक्तिक डॉक्टर' अशी करून दिली. एवढेच नव्हे तर, तुकाराम मुंढे यांच्यासोबत असलेल्या या कथित ओळखीचा आणि सलगीचा वापर करून आपण लोकांची शासकीय कामे करून देऊ शकतो, असा दावाही त्यांनी या मेसेजमध्ये केला होता.
व्हिडिओ आणि मेसेज व्हायरल, एफडीएकडून थेट कारवाई
हा व्हॉट्सअॅप मेसेज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. ही बाब अन्न व औषध प्रशासन विभागाच्या निदर्शनास आली. आयएएस तुकाराम मुंढे यांच्यासारख्या डॅश आणि कडक शिस्तीच्या अधिकाऱ्याच्या नावाचा असा खोटा वापर केल्यामुळे त्यांच्या आणि विभागाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचू शकतो, हे लक्षात घेऊन एफडीए विभागाने तात्काळ पावले उचलली.
पोलिसात तक्रार दाखल
एफडीए विभागाच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणी थेट पुणे येथील कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात धाव घेत डॉ. अजवाणी यांच्याविरोधात अधिकृत तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी फसवणुकीचा प्रयत्न आणि आयटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.