Pune News: विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील राजकीय हालचालींना कमालीचा वेग आला आहे. महाविकास आघाडीमध्ये पुणे विधान परिषदेची जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वाट्याला अली आहे. याच निवडणुकीचे गणित पक्के करण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी आज थेट पुण्यातील काँग्रेस भवन गाठले आहे.
पुणे महानगरपालिकेतील काँग्रेसच्या माजी नगरसेवकांशी सुप्रिया सुळे यांनी संवाद साधला असून, महाविकास आघाडीची ताकद एकत्र बांधण्यासाठी ही महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. मात्र, या सर्व हायव्होल्टेज ड्रामामध्ये पुण्याच्या पूर्व विभागाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांची अनुपस्थिती सध्या राजकीय वर्तुळात प्रचंड चर्चेचा आणि तर्कवितर्कांचा विषय ठरत आहे.
पुणे महानगरपालिकेत काँग्रेसचे एकूण १५ नगरसेवक आहेत. विधान परिषदेच्या या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून महाविकास आघाडीचा ऐकी दाखवण्यासाठी काँग्रेसच्या या हक्काच्या मतांची बेरीज अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. याच पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे स्वतः काँग्रेस भवनमध्ये दाखल झाल्या आहेत.
मात्र, खासदार सुप्रिया सुळे थेट काँग्रेसच्या कार्यालयात पोहोचलेल्या असताना, कॉग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप मात्र या बैठकीला गैरहजर राहिले. सुळे यांच्यासारख्या बड्या नेत्याच्या महत्त्वाच्या भेटीत शहराध्यक्षच गायब असल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले होते.
अखेर त्यांच्या या गैरहजेरीमागचे खरे कारण समोर आले आहे. याबाबत प्रशांत जगताप यांनी स्वतः खुलासा केला आहे. यात प्रशांत जगताप म्हणले, बारा ज्योतिर्लिंग व चार धाम यात्रेसाठी मी गेल्या ३ महिन्यांपूर्वीच बुकिंग केले होते. यादरम्यान काँग्रेस पक्षश्रेष्ठींच्या संमतीने माझी पुणे (पूर्व) शहराध्यक्षपदी नियुक्ती झाली व त्यानंतर ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणे मी गेल्या ४-५ दिवसांपासून देवदर्शन यात्रेस सुरुवातही केली आहे. या यात्रेबाबतच्या सर्व अपडेट्स माझ्या फेसबुक, इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर उपलब्ध आहेत.
या पूर्वनियोजित देवदर्शन यात्रेत असल्यामुळे मी आज काँग्रेस भवन येथे सुप्रियाताई सुळे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीस उपस्थित राहू शकलो नाही, याची कृपया आपण नोंद घ्यावी. सदर अनुपस्थितीबाबत कोणत्याही प्रकारच्या अफवांवर आपण विश्वास ठेवू नये, प्रशांत जगताप यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.