NCP Alliance: राष्ट्रवादीच्या गोटातून महत्त्वाची अपडेट..! चर्चा अंतिम टप्प्यात,येत्या दोन दिवसांत मोठा निर्णय होणार

Pune Municipal Election : पुणे महापालिका निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा अंतिम टप्यात आहे. अजित पवार व शरद पवार गट घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवू शकतात.
NCP leaders Ajit Pawar and Sharad Pawar as discussions intensify over a possible alliance for the Pune Municipal Corporation elections under the clock symbol.
NCP leaders Ajit Pawar and Sharad Pawar as discussions intensify over a possible alliance for the Pune Municipal Corporation elections under the clock symbol.Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन निवडणुका लढवणार असल्याच्या चर्चा केल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. या चर्चांना दोन्ही पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी अधिकृत दुजोरा देखील दिला असल्याचं पाहायला मिळतंय. मात्र दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्र येण्यास काही नेते अनुकूल नसल्याचे देखील चित्र पाहायला मिळाला आहे. त्या पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादीच्या आघाडीचं काय होणार याकडे संबंध महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

अशातच आता राष्ट्रवादीच्या माजी महापौराने दोन दिवसांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबतची घोषणा होणार असल्याचा चर्चेला दुजोरा दिला आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि माजी महापौर दत्ता धनकवडे यांनी ही माहिती दिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीनंतर दत्ता धनकवडे यांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या आघाडी संदर्भात केलं मोठं वक्तव्य केलं आहे.

याबाबत बोलताना दत्ता धनकवडे म्हणाले, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार आहेत. याची चर्चा पूर्ण झाली आहे. फक्त घोषणा होणे बाकी आहे. ती घोषणा लवकरच होईल. त्या माध्यमातून लवकरच चांगली बातमी आपल्याला मिळणार आहे असं धनकवडे म्हणाले.

NCP leaders Ajit Pawar and Sharad Pawar as discussions intensify over a possible alliance for the Pune Municipal Corporation elections under the clock symbol.
Ajit Pawar : पुणे जिल्ह्यात अजित पवारच ‘दादा ’ : 17 पैकी 10 नगराध्यक्ष राष्ट्रवादीचे, भाजपाला अवघ्या 3 जागा

पुढील दोन दिवसांमध्ये दोन्ही राष्ट्रवादीच्या युतीची घोषणा होणार आहे.दोन्ही पक्षाच्या नेत्यांचे यासंदर्भात बोलणे झालेले असून याबाबतची घोषणा दोन्ही पक्षातील नेते लवकरच करणार आहेत. काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचा दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यास विरोध आहे. याबाबत बोलताना धनकवडे म्हणाले, प्रशांत जगताप हे फक्त या शहराचे अध्यक्ष आहेत.मात्र देशाचे अध्यक्ष अजित पवार आणि शरद पवार आहेत.

NCP leaders Ajit Pawar and Sharad Pawar as discussions intensify over a possible alliance for the Pune Municipal Corporation elections under the clock symbol.
PMC Election: भाजपकडूनच युतीधर्माचं पालन होत नसेल, तर आपणही...?'राष्ट्रवादीच्या बैठकीत वातावरण तापलं

तसेच खासदार सुप्रिया सुळे या कार्याध्यक्ष आहेत. वरिष्ठ स्तरावर याची चर्चा होऊन निर्णय जाहीर केला केला जाणार आहे. याबाबत सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांची चर्चा झालेली आहे. त्यानुसार घड्याळ या चिन्हावर पुढील निवडणुका लढवल्या जातील. शरद पवार यांच्या पक्षाचे उमेदवार देखील तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावरत निवडणुका न लढवता घड्याळ या चिन्हावरतीच निवडणुका लढवणार आहेत असं धनकवडे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com