PMPML Bus Hijack : जंगली महाराज रोडवर भर गर्दीत बस हायजॅक करुन भरधाव पळवली! पुणेकरांनी अनुभवला सिनेस्टाईल थरार

PMPML Bus Hijack : पुण्याच्या गर्दीच्या जंगली महाराज रस्त्यावर एक सिनेस्टाईल थरार पुणेकरांना अनुभवायला मिळाला.
PMPML BUs
PMPML BUs
Published on
Updated on

PMPML Bus Hijack : पुण्याच्या गर्दीच्या जंगली महाराज रस्त्यावर एक सिनेस्टाईल थरार पुणेकरांना अनुभवायला मिळाला. मद्याच्या नशेत असलेल्या एका व्यक्तीने पीएमपीएमएल बस थेट हायजॅक करुन भरधाव वेगानं रस्त्यावरून गुडलक चौकपर्यंत पळवली. पण पोलिसांच्या सतर्कतेमुळं आणि झटपट पाठलागाने हा ‘बस हायजॅक’चा ड्रामा अवघ्या काही मिनिटांत संपुष्टात आणला. शनिवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास हा प्रकार घडला.

PMPML BUs
Prashant Padole : खासदार प्रशांत पडोळेंना अंधश्रद्धेचे डोहाळे! दैवी चमत्कारामुळं पळसाच्या झाडातून पाणी, नागरिकांना दर्शनासाठी बोलावलं

गर्दीने गजबजल्या रस्त्यावर MH12 YB 5086 क्रमांकाची पीएमपीएमएल बस पुणे महापालिकेच्या जवळील डेंगळे पूल येथील डेपोमधून तुळशीराम राठोड या मद्यधुंद अवस्थेतील व्यक्तीनं कोणाच्याही नकळत हायजॅक केली. नशेच्या जोरावर त्याने बस थेट जंगली महाराज रस्त्याने गुडलक चौकाकडे वळवली. चौकात बस वळवताना मात्र नियंत्रण पूर्णपणे सुटले आणि त्याची ही ‘स्टंट’बाजी लोकांच्या लक्षात आली त्यामुळं एकच खळबळ उडाली.

PMPML BUs
Parbhani News: परभणी महापालिकेत 'नारी शक्ती'! विषय समित्यांच्या ११ पैकी आठ अध्यक्षपदांवर महिला

परिसरातील पोलिसांना संशय आला आणि त्यांनी तत्काळ पाठलाग सुरू केला. सिग्नलजवळ पोहोचताच पोलिसांनी बस थांबवली आणि चालक तुळशीराम राठोड याला जेरबंद केले. चौकशीत आरोपीने बस चोरी केल्याचे कबूल केले. पोलिसांनी बस ताब्यात घेत डेक्कन डेपोमध्ये सुरक्षितपणे परत आणली. आरोपीला डेक्कन पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले असून, त्याची वैद्यकीय तपासणी सुरू आहे. सुदैवाने या थरारात कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झालेलं नाही.

PMPML BUs
Sanjay Nirupam: आरटीओ अधिकारी ऑटो चालकांची 'मराठीची टेस्ट' घेणार! परप्रांतियांचं धाबं दणाणलं; GRवर निरुपम यांनी व्यक्त केली चिंता

पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, “आरोपीच्या संशयास्पद ड्रायव्हिंगमुळं आमचे लक्ष वेधले गेले. आमच्या टीमने अतिशय वेगाने आणि सतर्कतेने कारवाई केली, त्यामुळे मोठा अनर्थ टळला” सध्या पोलिस आरोपीची चौकशी करत असून नेमका हा प्रकार कशासाठी केला? नशेत केला की विशिष्ट उद्देशाने केला याबाबत पुढील तपास करत आहेत.

PMPML BUs
Sanjay Nirupam: आरटीओ अधिकारी ऑटो चालकांची 'मराठीची टेस्ट' घेणार! परप्रांतियांचं धाबं दणाणलं; GRवर निरुपम यांनी व्यक्त केली चिंता

नेमकी चूक कोणाची?

या बसमध्ये सीएनजी कमी झाला होता म्हणून चालकाने बस डेंगळे पुलावर पार्क केली होती. पार्क केल्यानंतर बसच्या इग्निशन पॉईंटला चावी तशीच ठेवली होती. त्यानंतर पीएमपीएलच्या सिक्युरिटी कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळं अज्ञात व्यक्तीने ही बस चोरून नेली, अशी माहिती मिळते आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com