Ravindra Dhangekar Setback : रवींद्र धंगेकरांना मोठा धक्का; शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या भाजपमध्ये प्रवेश निश्चित; कसब्यातच घेरलं!

Vaishnavi Kirad Joins BJP Chandrakant Patil : महायुतीत असूनही सासत्याने भाजप नेत्यांच्या विरोधात घेणाऱ्या रवींद्र धंगेकर यांना मोठा धक्का बसला आहे. कसब्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना भाजपने फोडले.
Ravindra Dhangekar Setback
Ravindra Dhangekar Setbacksarkarnama
Published on
Updated on

Pune News : पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघात राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे पुणे महानगर प्रमुख, माजी आमदार रवींद्र धंगेकर यांना कसब्यात मोठा धक्का भाजपकडून दिला जाणार आहे. शिवसेनेतील काही पदाधिकारी आणि कार्यकर्ते आज भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील भाजप कार्यालयात दुपारी १२ वाजता हा पक्षप्रवेश होणार आहे.

नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत रवींद्र धंगेकर यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर यांच्या सोबत एकाच प्रभागातून निवडणूक लढवलेल्या वैष्णवी किराड या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत आणि स्मिता पाटील यांच्या पुढाकाराने हा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती आहे. वैष्णवी किराड यांच्यासोबत काही कार्यकर्ते आणि पदाधिकारीही भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे.

त्यामुळे भाजपचे धंगेकरांच्या विरोधातील 'मिशन कसबा' सुरू झाले आहे का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. विशेष म्हणजे, मनसेतील काही पदाधिकारीही आज चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे.

कसब्यातील शिवसेनेच्या संघटनेतील पदाधिकारी आणि धंगेकर यांच्या राजकीयदृष्ट्या जवळच्या मानल्या जाणाऱ्या व्यक्ती भाजपच्या गोटात दाखल होत असल्याने हा प्रवेश धंगेकरांसाठी राजकीय धक्का मानला जात आहे.

Ravindra Dhangekar Setback
PMC Tender Controversy : पुणे महापालिकेत मर्जीतील कंत्राटदारांसाठी दबावतंत्र; आमदार, नगरसेवकांकडून प्रयत्न; कोट्यवधींच्या निविदा ठप्प!

धंगेकर विरुद्ध चंद्रकांत पाटील संघर्ष

महायुतीत असतानाही रवींद्र धंगेकर यांनी गेल्या काही काळापासून चंद्रकांत पाटील यांच्यावर सातत्याने टीका केली आहे. विविध स्थानिक आणि राजकीय मुद्द्यांवरून दोन्ही नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळाले आहेत. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत कसब्यातील पदाधिकाऱ्यांचा भाजप प्रवेश हा विशेष राजकीय संदेश देणारा ठरण्याची शक्यता आहे.

दरम्यान, बांधकाम कंत्राटदाराच्या आत्महत्या प्रकरणात रवींद्र धंगेकर आणि त्यांच्या पत्नीचे नाव चर्चेत आले होते. या प्रकरणात न्यायालयाने धंगेकरांना दिलासा दिला. मात्र, त्यानंतरही धंगेकर यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करण्याची भूमिका कायम ठेवली आहे.

शिवसेनेला खिंडार?

धंगेकरांच्या बालेकिल्ल्यातील पदाधिकारी भाजपच्या गोटात जात असल्याने कसबा मतदारसंघात भाजपकडून शिवसेनेला खिंडार पाडण्याची रणनीती आखली जात आहे का? याची चर्चा सुरू झाली आहे. आगामी काळात या पक्षप्रवेशाचा कसब्यातील राजकीय समीकरणांवर नेमका काय परिणाम होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Ravindra Dhangekar Setback
Chandrashekhar Bawankule: भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळेंचं 'प्रमोशन',दिल्लीतून सोपवली थेट राष्ट्रीय पातळीवरची मोठी जबाबदारी

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com