Pune News : लोकसभा निवडणुकांची मतदान तारीख जशी जशी जवळ येते आहे.तस तशी पुणे जिल्ह्यातील निवडणुकीचे रंगत वाढताना पाहायला मिळत आहे. सर्वच पक्षाकडून तोडफोडीचे राजकारण सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. आज अजित पवारांचे सहकारी असलेल्या दिलीप वळसे पाटील यांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू सोबती असलेले शेखर पाचुंदकर यांनी आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार अमोल कोल्हे यांना आपला पाठिंबा दिला आहे.
पाचुंदकर यांच्यासह देवदत्त निकम आणि कार्यकर्त्यांनी आज शरद पवार गटात प्रवेश केला आहे. हा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंत्री दिलीप वळसे पाटलांना मोठा धक्का दिला असल्याचं बोललं जात आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे.
एकीकडे शरद पवार गटाकडून विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे तर दुसरीकडे शिवसेनेमधून आयात करून अजित पवार गटाने माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना निवडणूक रिंगणात उतरवले आहेत. त्यामुळे अजित पवार आणि शरद पवार या दोन्हीही नेत्यांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे.
त्यामुळे विरोधी पक्षातील समर्थक आपल्याकडे ओढण्याची चढाओढ पाहायला मिळत आहे. शेखर पाचुंदकर यांचे शिरूर लोकसभा मतदारसंघामधील आंबेगाव तालुक्यातील 42 गावामध्ये मोठे वलय आहे. ते माजी जिल्हा परिषद सदस्य देखील आहेत. शेखर पाचुंदकर आणि देवदत्त निकम यांनी कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केल्यानं शिरूर लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाची ताकत वाढली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
शेखर पाचुंदकर हे महाविकास आघाडीचे उमेदवारअमोल कोल्हे यांचा प्रचार करणार आहे. त्यांच्यावरती आंबेगाव विधानसभा क्षेत्राची जबाबदारी देण्यात आली असून याच भागातून त्यांची तालुका अध्यक्षपदावरती देखील वरणी लागण्याची शक्यता आहे.
Edited By : Umesh Bambare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.