Ambadas Danve News : कापून टाकू! उद्धव ठाकरेंच्या आक्रमक शिलेदाराला जीवे मारण्याची धमकी

Ambadas Danve Receives Death Threat: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Ambadas Danve death threat news: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आक्रमक नेते तथा विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना अज्ञातांकडून जीवे मारण्याची धमकी आल्याचा प्रकार समोर आला आहे.

अंबादास दानवे यांनीच ही माहिती दिली. 12 ते 15 फेब्रुवारी दरम्यान, आपल्याला पाच ते सहा वेळा धमक्यांचे फोन आले. सुरूवातीला आपण त्याकडे दुर्लक्ष केले, पण एक फोन मध्यरात्री दोनच्या सुमारास आला. तो मी घेतला तेव्हा समोरून बोलणाऱ्या व्यक्तीची भाषा ऐकून मी हा प्रकार गांभीर्याने घेतल्याचे अंबादास दानवे यांनी सांगीतले.

या फोन धमकी प्रकरणी शहरातील क्रांतीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. ज्या मोबाईलवरून धमकीचे फोन आले, त्याआधारे पोलीस आरोपींचा शोध घेत आहे. विधान परिषदेचे सदस्यत्व संपल्यानंतर महिनाभरापुर्वीच राज्याच्या गृहविभागाने अंबादास दानवे यांची शासकीय पोलीस सुरक्षा काढून घेतली होती. त्यानंतरच हे जीवे मारण्याचे धमकी प्रकरण घडल्याने आता पुन्हा दानवे यांच्या निवासस्थान आणि संपर्क कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

अंबादास दानवे हे आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते म्हणून त्यांनी राज्य सरकार, त्यांचे मंत्री विविध खात्यातील भ्रष्टाचार, गैरप्रकार उघडकीस आणून त्यावर सभागृह दणाणून सोडले होते.

विरोधी पक्ष नेते पदाचा कार्यकाळ संपल्यानंतरही तेच प्रामुख्याने सरकारच्या विरोधात सातत्याने टीकेची झोड उठवत आहेत. अशावेळी त्यांना गेल्या तीन-चार दिवसांपासून जीवे मारण्याची धमकी देणारे फोन येत असल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

Uddhav Thackeray
Sangli Politics: सांगलीच्या राजकारणात मोठा ट्विस्ट! दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, महायुतीतल्या आणखी एका घटक पक्षाचे सदस्य फुटले

या संदर्भात अंबादास दानवे यांनी सविस्तर माहिती माध्यमांना दिली. राजकारणात किंवा सामाजिक कार्य करतांना अनेकदा अशा धमक्यांच्या फोनचा अनुभव येत असतो. अनेकदा दारू पिऊन लोक फोन करतात, शिवीगाळ करतात किंवा तुला बघून घेतो, ठार मारील अशी भाषा वापरली जाते. 12 ते 15 फेब्रुवारी दरम्यान, मला अशा प्रकारचे जीवे मारण्याची धमकी देणारे फोन येत होते. सुरूवातीला मी दुर्लक्ष केले, कोणी तरी खोडसाळपणा करत असेल समजून फार गांभीर्याने घेतले नाही.

Uddhav Thackeray
MNS News: तीन मराठी कलाकार बनले मनसैनिक; राज ठाकरेंच्या उपस्थितीत प्रवेश

परंतु पंधरा तारखेला मध्यरात्री दोन वाजता एक फोन आला. एखाद्या कार्यकर्त्याचा दवाखान्यासाठी किंवा पोलीस स्टेशनच्या कामासाठी फोन आला असेल म्हणून मी तो घेतला. परंतू समोरून बोलणाऱ्या व्यक्तीची भाषा आणि जीवे मारण्याची दिलेली धमकी यातील गांभीर्य माझ्या लक्षात आले. मी फोन कट केल्यानंतर वारंवार ती व्यक्ती फोन करून धमक्या देत होती. मी अशा धमक्यांना भीक घालत नाही, पण या प्रकारामुळे माझ्या कुटुंबातील सदस्यांना काळजी वाटू लागली आहे.

Uddhav Thackeray
Pune News : मसापमध्ये दहा वर्षांनी सत्तापालट! RSSच्या साहित्य संवर्धन आघाडीचे योगेश सोमण अध्यक्षपदी; विद्यमान कार्यकारिणीचा पराभव

पोलीसांना या संदर्भात माहिती दिली आहे, काॅल रेकाॅरर्डिंग, मोबाईल क्रमांक या आधारावर आता त्यांनी तपास करावा आणि सत्य काय ते शोधू काढावे? असे आवाहन अंबादास दानवे यांनी पोलीसांना केले. मी बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक आहे, मरणाला घाबरत नाही. एक दिवस सगळ्यांना जायचेच आहे, पण माझे कुटुंब काळजीत आहे, म्हणून मी या धमकीच्या फोनला महत्व देतोय, असेही दानवे यांनी स्पष्ट केले.

फोनवरून दोन-तीन व्यक्ती बोलत होत्या, कापून टाकू, ठोकून टाकू अशा धमक्या दिल्या जात होत्या. या घटनेमुळे माझ्या व कुटुंबियांच्या सुरक्षेस धोका संभवू शकतो, आपण या घटनेची चौकशी करून कार्यवाही करावी, अशी मागणी दानवे यांनी पोलीस आयुक्तांकडे केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com